भारतीय स्वयंपाकघरात रोजच्या जेवणात एक हमखास भाजी असते ती म्हणजे टोमॅटो. टोमॅटो हा सर्व भाज्यांमध्ये सामावणारा आहे. शिवाय टोमॅटोपासून होणारे पदार्थही चवदार असतात. पावभाजी, सूप आदीमध्ये टोमॅटोशिवाय अन्य कुठल्याही भाजीचा विचारही करु शकत नाही. बाजारात टोमॅटो खरेदीसाठी गेल्यावर त्याचा लाल रंग पाहून त्याला पसंती दिली जाते. लाल रंगाचे हे टोमॅटो, भाजी, सार यांची चव वाढवतात आणि त्या भाजी, सलाटला सजवतातही. पण हेच टोमॅटो लाल ऐवजी काळ्या रंगाचे (Black tomato) आले तर. नक्कीच टोमॅटोच्या रंगातील हा बदल टोमॅटो प्रेमींना आवडणार नाही. पण या काळ्या टोमॅटोमध्ये अधिक औषधी गुणधर्म आहेत, हे जाणल्यावर त्यांच्याबाबत उत्सुकता नक्कीच वाटेल. इंग्लडमध्ये रोज टोमॅटो म्हणून या काळ्या टोमॅटोंचा उल्लेख करण्यात येतो. या काळ्या रंगाच्या टोमॅटोमध्ये लाल टोमॅटोपेक्षा जास्त व्हिटामीन सी ची मात्र असते. त्यामुळेच इंग्डलमध्ये या काळ्या टोमॅटोंना (Black tomato) सुपर फूड असेही म्हटले जाते. हे काळे टोमॅटो आता भारतातही होत असून हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काही प्रगतीशील शेतकरी काळ्या टोमॅटोच्या लागवडीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे हे टोमॅटो लावण्यासाठी लाल टोमॅटो एवढाच खर्च येतो. मात्र यातून दुप्पट उत्पादन मिळते. मुळात हे टोमॅटो अधिक काळ ताजे राहत असल्यामुळे शेतक-यांचा फायदा होत आहे. (Black tomato)
स्वयंपाकघरातील भाज्यांचा ट्रे लाल टोमॅटो शिवाय परिपूर्ण होत नाही. मात्र आता काही दिवसांनी या लाल टोमॅटोची जागा काळ्या रंगाचे टोमॅटो (Black tomato) घेणार आहेत. इंग्लड आणि चीनमध्ये असणारे हे काळ्या रंगाचे टोमॅटोचे पिक भारतातही शेतकरी घेत आहेत. भारतात काळ्या टोमॅटोची लागवड प्रथम हिमाचल प्रदेशात सुरू झाली असून अन्य प्रदेशातीलही शेतकरी आता या काळ्या रंग्याच्या टोमॅटोच्या शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे भारताच्या अनेक बाजारपेठांमध्ये काळे टोमॅटो विक्रीस आलेले दिसून येत आहेत. भारतासह संपूर्ण जगात आता काळ्या टोमॅटोची मागणी झपाट्याने वाढली आहे. कारण या टोमॅटोमध्ये औषधी गुणधर्म जास्त असल्याचे आढळून आले आहे. परिणामी टोमॅटोची मागणी वाढली आहे. भारतातील हवामानही काळ्या टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य मानले गेले आहे. काळ्या टोमॅटोच्या लागवडीसाठी उष्ण हवामान सर्वात अनुकूल मानले जाते. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात काळ्या टोमॅटोची लागवड केली जात आहे. या टोमॅटोमध्ये लाल टोमॅटोपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. अनेक आजारांवर हा काळा टोमॅटो रामबाण औषधासारखा लागू होतो. मुख्य म्हणजे काळ्या टोमॅटोची किंमत लाल टोमॅटोपेक्षा जास्त आहे. असे असले तरी या टोमॅटोच्या लागवडीसाठी फार खर्च होत नाही. त्यामुळे भारतात भविष्यात काळ्या टोमॅटोची शेती वाढणार असल्याच अंदाज आहे. भारतात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारमधील अनेक शेतकरी काळ्या टोमॅटोच्या लागवडीकडे वळले आहेत. (Black tomato)
काळ्या टोमॅटोची (Black tomato) लागवड प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली, त्याला येथे सुपर फूड म्हणतात. भारतात या काळ्या टोमॅटोचे बियाणे सुरुवातीस परदेशातून आणले जात होते. परंतु हिमाचल प्रदेशात त्याची लागवड सुरू झाल्यापासून काळ्या टोमॅटोचे बियाणे भारतीय बाजारपेठेतही सहज उपलब्ध झाले आहे. युरोपमध्ये प्रथम काळ्या टोमॅटोची रोपवाटिका तयार करण्यात आली. यामध्ये पर्पल टोमॅटो आणि इंडिगो रोज रेड या बियांचे मिश्रण करून नवीन बियाणे तयार करण्यात आले, ज्यापासून या संकरित टोमॅटोची उत्पत्ती झाली. आता घरबसल्या काळ्या टोमॅटोच्या बिया ऑनलाईन देखील मागवू शकता. त्याच्या बियांच्या एका पॅकेटची किंमत 110 रुपये असून ज्यामध्ये सुमारे 130 बिया असतात.
काळ्या टोमॅटोकडे(Black tomato) शेतक-यांचा कल वाढला आहे, कारण हा टोमॅटो काढणीनंतरही ते बरेच दिवस ताजा राहतो. लाल टोमॅटोच्या तुलनेत त्याची चव काहीशी खारट असते. या टोमॅटोतगोडपणा कमी असल्यामुळे मधुमहे ज्यांना आहे, त्यांच्यासाठी हा टोमॅटो अधिक फायदेशीर मानला जातो. या टोमॅटोमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. काळ्या टोमॅटोमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, सी खनिजे आढळतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय यात फ्री रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता आहे, ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. काळ्या टोमॅटोमध्ये अँथोसायनिनही आढळते, ज्यामुळे ह्दयविकाराचा धोका कमी होतो. तसेच या काळ्या टोमॅटोचे सेवन केल्यास कोलेस्ट्रोलचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
======
हे देखील वाचा : सावधान! प्लॅस्टिकचे तांदूळही बाजारात…
======
काळ्या टोमॅटोमध्ये लाल टोमॅटोपेक्षा जास्त औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याला बाजारात मागमी आहे. अर्थात हे टोमॅटो अगदी मोजक्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्याची किंमतही जास्त आहे. भारतात जसे या काळ्या टोमॅटोच्या शेतीचे प्रमाण वाढल्यास त्याच्या बाजारातील किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे.
सई बने