राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यादरम्यान गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने ९ गडी राखून विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान काबीज केले. त्यांच्या या विजयाचा शिल्पकार ठरला युवा यशस्वी जयस्वाल! (Jaiswal)
आपल्या तुफानी फटकेबाजीने कोलकाताच्या गोलंदाजांना अगदी सळो की पळो करून सोडणाऱ्या यशस्वी जयस्वालने ४७ चेंडूत तब्बल १३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने तब्बल ९८ धावा ठोकल्या. तत्पूर्वी त्याने अवघ्या १३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज म्हणून त्याच्या नावाची नोंद झाली. यापूर्वी हा विक्रम केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर होता. केकेआरकडून खेळतांना पॅट कमिन्सने तर पंजाब किंग्स कडून खेळतांना केएल राहुल याने १४ चेंडूत अर्धशतक झळकावन्याचा पराक्रम केला होता. त्यांच्यापेक्षा एक चेंडू कमी घेत जयस्वालने (Jaiswal) हा विक्रम आपल्या नावावर केला.
त्याच्या या फटकेबाजीने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली देखील प्रभावित झाला. कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेयर करत यशस्वी जयस्वालचे (Jaiswal) कौतुक केले. विराट कोहलीने जयस्वालचा (Jaiswal) फोटो शेयर करत म्हटले, मागच्या काही काळामध्ये मी पाहिलेली ही सर्वोत्तम फलंदाजी आहे. किती प्रतिभा. यात त्याने यशस्वी जयस्वालला मेन्शन देखील केले आहे.
जयस्वालच्या (Jaiswal) तुफान फटकेबाजीमुळे आणि त्याला कर्णधार संजू सॅमसनने दिलेल्या योग्य साथीमुळे राजस्थानने हा सामना अवघ्या १३.१ षटकात हा सामना जिंकला. संजू सॅमसनने २९ चेंडू खेळत २ चौकार आणि ५ षटकारांसह ४८ धावा ठोकल्या.
तत्पूर्वी यजुवेंद्र चहल याच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर राजस्थानला कोलकात्याचा डाव ८ बाद १४९ धावांवर रोखण्यात यश मिळाले. यजुवेंद्र चहलने ४ षटकात २५ धावा देत ४ बळी आपल्या नावी केले. यासोबतच तो आयपीएल मधील सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला. बोल्टने दोन बळी मिळवत त्याला योग्य साथ दिली.
=======
हे देखील वाचा : भारतीय संघातील खेळाडू फ्लूएंट इंग्रजी कसे बोलतात? हे आहे सिक्रेट
=======
कोलकात्यांच्या फलंदाजांना विशेष कामगिरीचे प्रदर्शन करता आले नाही. वेंकटेश अय्यर सोडला तर बाकीच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. वेंकटेश अय्यरने ४२ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला सन्मानजनक लक्षापर्यंत पोहोचवले होते.