ऑफिसमध्ये महिला आणि पुरुष सहकारी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. अशातच काही पुरुष सहकारी हे खुप चांगले मित्र सुद्धा होतात. परंतु पुरुषांचे बहुतांशवेळा असे होते की, मैत्रिण म्हणून महिला सहकाऱ्याशी बोलताना अडखळल्यासारखे वाटते. अशातच तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर काही गोष्टी सोप्प्या होतीलच. पण तुमचे त्यांच्यासोबतचे संबंध ही सुधारतील. (Office Tips)
महिला सहाकाऱ्यासमोर पुरुष मंडळी बोलण्यास लाजतात. त्यामुळे ते महिलांसोबत खुल्यापणाने बोलू शकत नाहीत. याचा थेट परिणाम तुमच्या कामावर सुद्धा होतो. अशातच काही गोष्टींबद्दल विचार करुन वागले पाहिजे.
-भाषेवर संयम ठेवा
आपल्या ऑफिसमधील कोणत्याही महिला कर्मचाऱ्याशी बोलताना पुरुष मंडळींनी आपल्या भाषेकडे जरुर लक्ष द्यावे. खरंतर पुरुष मंडळी एकमेकांसोबत अरे तुरे च्या भाषेने बोलतात. पण महिला सहकाऱ्याशी तुम्ही असे कधीच बोलू नका. त्यांच्यासमोर तुमची भाषा ही नेहमीच त्यांना कळेल आणि बोलताना ही उत्तम वाटेल अशी ठेवा.
-जरुर हसा
जर महिला सहकाऱ्याशी बोलताना तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे पाहून दूरवरुन हसू शकता. यामुळे काही गोष्टी न बोलताच तुमचे एक्सप्रेशन सर्वकाही सांगून जाईल.
-कामावर लक्ष द्या
महिला सहकाऱ्यासोबत उत्तम नाते बनवण्यासाठी त्यांची मदत मागू शकता. यामुळे तुमचा ऑफिस प्रोजेक्ट लवकर पूर्ण होईल पण कामादरम्यान मजा-मस्ती ही सुरु राहिल. यामुळे तुमच्यातील बाँन्ड सुधारेल. परंतु कामादरम्यान नेहमीच पॉझिटिव्ह रहा आणि आपल्या सहकाऱ्यांची चुगली करण्यापासून दूर रहा.
-प्रोत्साहन द्या
महिला सहकाऱ्याला कामाच्या प्रति प्रोत्साहन देत रहा. यामुळे तुमच्यातील नाते सुधारेल. तसेच त्यांचा आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
-टी ब्रेकवर जा
ऑफिसच्या कामातून मध्येच ब्रेक घ्या. त्यावेळी तुमच्या महिला सहकाऱ्याला सुद्धा विचारा. परंतु दररोज असे करण्यापासून करु नका. (Office Tips)
हेही वाचा- प्रत्येक गोष्टीचा राग करणे तुमच्या आयुष्यासाठी ठरेल धोकादायक
वरील काही गोष्टी पुरुष मंडळींनी महिला सहकाऱ्यांसोबतच्या लक्षात ठेवाव्यातच. पण कामात सुद्धा त्यांची मदत करावी. जेणेकरुन त्या सुद्धा तुमच्या प्रमाणे आपल्या करियर आणि कामात इतरांना मदत करतील. तसेच त्यांना वाईट वाटेल असे काहीही करु नका किंवा वागू नका. या व्यतिरिक्त त्यांना अनकंम्फर्टेबल वाटेल अशा गोष्टी करण्यापासून जरा दूरच रहा. असे केल्याने त्या कधीच तुमच्याशी बोलणार नाहीत.