आपल्या स्वयंपाकघरात काही अशा भाज्या आहेत ज्या खुप कमी प्रमाणात केल्या जातात मात्र त्याचे आपल्या शरीराला खुप फायदे होतात. आणि अनेकांना त्या भाजीचे फायदे माहीत नाहीत. त्यातलीच एक भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगा ज्याला हिंदीमध्ये सहजन फली/ मोरिंगा म्हटल जात तर इंग्लिश मध्ये या भाजीला ड्रमस्टिक बोलतात. फार कमी लोकांची ही भाजी आवडीची असेल.या भाजीचे झाड वर्षातून एकदा फुल देते आणि नंतर फळे देते. याचे फळ पातळ, उंच व हिरव्या रंगाचे असून झाडाच्या खोडाजवळ लटकलेले असते. सहजन वृक्षाचा प्रत्येक भाग अत्यंत गुणकारी असून जेवणाबरोबरच रोगांच्या उपचारासाठी ही त्याचा उपयोग होतो. तुम्हालाही या भाजीचे उपयोग आणि गुण माहीत नाही ना? मग आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.(Drumstick Benefits)
शेवग्याची शेंग दिसायला लांब आणि कडक असते. या शेंगा बरोबर त्याच्या बिया, पाने, फळे आणि मुळांचाही वापर केला जातो, जो आपल्या शरीरासाठी औषधाचे काम करतो. इतकंच नाही तर हे सुपरफूड म्हणून उपयुक्त मानलं गेलं आहे, कारण यामुळे हाडांना अधिक ताकद मिळते. त्यामुळे या ऋतूत आपण शेवग्याची शेंग खाल्ली पाहिजे. पानांच्या तुलनेत, शेवग्याच्या शेंगांमध्ये सामान्यत: जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असतात. तथापि, त्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते. एक कप ताज्या शेंगा मध्ये आपल्या दैनंदिन गरजेच्या 157% व्हिटॅमिन सी असते.भारतासारख्या देशांमध्ये लोकांच्या आहारात कधीकधी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिनांची कमतरता असते. या देशांमध्ये शेवग्याच्या शेंगा अनेक आवश्यक पोषक घटकांचा महत्त्वपूर्ण स्त्रोत असू शकतो.
लठ्ठपणा किंवा वाढत्या वजनाच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर आता तुम्हाला बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. शेवग्याची शेंग किंवा पानांचा हिरव्या भाज्यांच्या यादीत समावेश केल्यास वाढत्या वजनाच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. खरं तर यात क्लोरोजेनिक अॅसिड असतं, ज्यात अँटी-लठ्ठपणा गुणधर्म असतात, जे लठ्ठपणा किंवा वजनाच्या समस्येशी लढण्यास मदत करतात. आपण हे निरोगी खाद्यपदार्थ म्हणून आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो .
उच्च रक्तातील साखर ही आरोग्याची गंभीर समस्या असू शकते. खरं तर हे मधुमेहाचं मुख्य लक्षण आहे. कालांतराने, उच्च रक्तातील साखरेची पातळी हृदयरोगासह अनेक गंभीर आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढवते. या कारणास्तव, आपल्या रक्तातील साखर निरोगी श्रेणीत ठेवणे महत्वाचे आहे.विशेष म्हणजे, बर्याच अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की शेवग्याची शेंग रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. (Drumstick Benefits)
वाढत्या वयाबरोबर हाडांची काळजी घेणं आणि त्यांना निरोगी ठेवणंही तेवढच गरजेचं आहे. हाडे निरोगी ठेवण्यासाठी आपण शेवग्याची शेंगांचे सेवन करू शकतो. शेवग्याची शेंग कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत मानला जातो, जो हाडांसाठी आवश्यक पोषक आहे. या गुणधर्मांच्या उपस्थितीमुळे शेवग्याची शेंग हाडे निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. तसेच याव्यतिरिक्त यात अँटी-ऑस्टियोपोरोटिक गुणधर्म देखील आहेत, जे ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या रोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
=======================================
हे देखील वाचा: वजन वाढवायचयं? मग केळी बरोबर खा ‘हे’ पदार्थ ; वजन झपाट्याने वाढायला होईल मदत
=======================================
याबरोबरच शेवग्याच्या शेंग मध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करतात. याच्या सेवनाने नैराश्य, अस्वस्थता आणि थकवा दूर होतो. शेंगांमध्ये असलेले व्हिटॅमिन-बी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. शरीरात लोहाची कमतरता असेल तर पालकाऐवजी ही शेवग्याच्या शेंगांचे सेवन करता येते. याच्या याच्या सेवनाने रक्तही स्वच्छ राहते.
(डिस्क्लेमर: वरील लेख माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेली आहे.कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)