Home » केसांपेक्षा पण पातळ फॅब्रिक तयार करणारी Raymond कंपनी, वाचा यशाची कथा

केसांपेक्षा पण पातळ फॅब्रिक तयार करणारी Raymond कंपनी, वाचा यशाची कथा

by Team Gajawaja
0 comment
Share

कोणत्याही कंपनीची टॅलाईन ही फार महत्वपूर्ण असते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे रेमंड. काळानुसार कंपनीने कशा प्रकारे प्रगती केली आणि प्रत्येक वेळी आपली टॅगलाईन बदलून नवा इतिहास ही रचला. ‘द कंप्लीट मॅन’ ते ‘फील्स लाइक हेवन’ पर्यंत प्रत्येक वेळी याच टॅगलाइनमुळे लोक त्यांना जोडली गेली. याच कारणास्तव आज ही कंपनी केवळ टेक्सटाइल नव्हे तर इंजिनिअरिंग ते रियल स्टेट पर्यंत विस्तारली गेली आहे.(Raymond Success Story)

रेमंड हा असा एक ब्रँन्ड आहे जो प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. एक काळ असा होता की, केवळ कपड्यांचा अर्थ म्हणजे रेमंड असे झाले होते. सुरुवातीला कंपनीने श्रीमंतांना लक्षात घेत त्यानुसार कपडे तयार केले होते. मात्र नंतर सर्वसामान्यांसाठी सुद्धा त्यांनी ते तयार केले. आपल्या मेहनत आणि ब्रँन्ड वॅल्यूच्या जोरावर आज रेमंड जगातील सर्वाधिक मोठी टेक्सटाइनल कंपनी आहे. या कंपनीचे ६०० शहरांमध्ये १५०० पेक्षा ही अधिक आउटलेट्स आहेत. कंपनीच्या नावाच्या जोरावरच पातळ फॅब्रिक तयार केला जात असल्याचा रेकॉर्ड ही आहे.

रेमंडची स्थापना १९०० मध्ये झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील ठाण्यात याची एका वुलन मिलच्या रुपात सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे नाव वाडिया मिल होते. त्यानंतर महाराष्ट्रातीलच सासून खाघराने यांनी त्याची खरेदी केली आणि अधिकृतरित्या त्याला १२५ मध्ये रेमंड वुलन असे नाव दिले. त्यानंतर कंपनीला कानपुर मधील सिंघानिया फॅमिली सुद्धा येऊन मिळाली. १९४० मध्ये सिंघानिया परिवाराने रेमंडला खरेदी केले. जेके ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक कैलास पत सिंघानिया यांनी रेमंडला खरेदी केल्यानंतर वुलन कपडे तयार करण्यास सुरुवात केली होती.

कैलाशपत सिंघानिया यांनी रेमंडवर लक्ष केंद्रित केले. ही मिल पुढे नेण्यासाठी अपडेट केले. 1960 पर्यंत, रेमंड ही देशातील अशी पहिली गिरणी बनली होती, जिथे कापड परदेशी मशीनपासून बनवले जात होते. 1966 मध्ये कंपनीने रेडिमेड कपड्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर 1969 मध्ये जॅकेट्सही तयार केले जाऊ लागले, जे हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरले. (Raymond Success Story)

हे देखील वाचा- कोला किंगच्या नावावर चालतात भारतातील पेप्सीची दुकानं

सर्वोत्कृष्ट फॅब्रिकचा विक्रम रेमंडच्या नावावर आहे. कंपनीचे सूटिंग फॅब्रिक सर्वाधिक पसंत केले जाते. विशेष बाब म्हणजे कंपनीने 11.4 मायक्रॉनचे असे फॅब्रिक तयार केले होते जे मानवी केसांपेक्षा पातळ होते. त्याची नोंदही कंपनीच्या नावावर आहे. आता रेमंड हे केवळ कापडापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता ते अभियांत्रिकी आणि रिअल इस्टेटपर्यंत पसरले आहे. विशेष बाब म्हणजे पार्क एव्हेन्यू ब्रँडचे नाव जे तुम्ही ऐकता ते रेमंडचे ब्रँड आहे, आजही हा ग्रुप सिंघानिया कुटुंबाकडे आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.