राजस्थानमधील (Rajasthan) देगाना, नागौर येथे लिथियमचे साठे सापडले आहेत. या लिथियमला व्हाईट गोल्ड म्हटलं जाते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात एक टन लिथियमचे मूल्य सुमारे 57.36 लाख रुपये आहे. या लिथियमचा सर्वाधिक वापर बॅटरीवर चालणा-या सर्व उपकरणात होतो. भारतातच याचा वापर जास्त होत आहे. लिथियमची वाढती मागणी बघता, गेली काही वर्ष भारत चीनकडून सर्वात जास्त लिथियम आयत करत असे. त्याचा भारताच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत होता. शिवाय चीनच्या काही अटीही मान्य कराव्या लागत होत्या. मात्र गेल्या वर्षी जम्मू काश्मिरमध्ये हे लिथियमचे साठे सापडले आणि भारताला मोठा आशेचा किरण दिसला. आता तर राजस्थानच्या (Rajasthan) नागौरमध्ये जम्मू काश्मिरपेक्षाही अधिक लिथियमचे साठे सापडल्यानं भारताला कोणाकडूनही लिथियमची आयात करावी लागणार नाही. तर भारतच जगभरातील मागणीनुसार लिथियमची निर्यात करु शकणार आहे.
लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू मानला जाते. बॅटरीवर चालणाऱ्या प्रत्येक उपकरण या धातूवर चालते. लिथियम हा जगातील सर्वात मऊ आणि हलका धातू आहे. पाण्यात जरा हा धातू टाकला तरी तो वर तरंगले, इतका तो हलका असतो. या धातून रासायनिक ऊर्जा साठवली जाते आणि तिचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर होते. या धातूला जगभरातून प्रचंड मागणी असते. मागणीनुसार त्याचे मुल्य बदलते. बहुधा ते वाढतच असते. सध्या लिथियमचे जागतिक मुल्य एका टनासाठी 57.36 लाख रुपये आहे. भारताला आतापर्यत लिथियमची आयात करावी लागत होती. आता राजस्थानमध्ये (Rajasthan) सापडलेल्या लिथियमच्या साठ्यामुळे भारताच्या एकूण मागणीपैकी 80 टक्के मागणी येथून पूर्ण होऊ शकणार आहे. आतापर्यंत भारत लिथियमसाठी चीनवर अवलंबून आहे. आता चीनची ही मक्तेदारी संपुष्ठात येईलच शिवाय राजस्थानच्या सोन्याच्या गतीनं विकास होण्याची चिन्हे आहेत. कारण या एका धातूच्या खाणीमुळे जगभराचे लक्ष राजस्थानवर केंद्रीत झाले आहे. लिथियमचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. भारत सध्या मोबाईल आणि लॅपटॉप निर्मितीतही अग्रेसर होत आहे. त्यापाठोपाठ लिथियम सापडल्यामुळे जगभरात भारताची अर्थव्यवस्थाही अग्रेसर ठरणार आहे.
राजस्थानमधील (Rajasthan) नागौर येथे हे लिथियमचे साठे सापडले आहेत, तिथे ब्रिटीश राजवटीत टंगस्टन खनिजाचा शोध लागला होता. येथून एकेकाळी देशाला टंगस्टन खनिज पुरवले जात होते. इंग्रजांनी या रेणवटच्या टेकडीवर ब्रिटिशांनी टंगस्टन खनिजाचा शोध लावला होता. त्याचा वापर पहिल्या महायुद्धात ब्रिटीशांनी युद्ध साहित्य बनवण्यासाठी केला होता. स्वातंत्र्यानंतरही देशातील ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रात सर्जिकल उपकरणे बनवण्याच्या त्याचा वापर होत होता. या खाणींवर सुमारे हजार कामगार काम करत असल्याच्या नोंदी आहेत.
========
हे देखील वाचा : घरबसल्या बदलता येईल बोर्डिंग स्टेशन, केवळ ‘या’ सोप्प्या टीप्स करा फॉलो
========
मात्र 1992 नंतर चीनमधून हे खनिज अधिक स्वस्त दरात आणण्यात आले. त्यामुळे या खाणी बंद करण्यात आल्या. चीनच्या पुरवठ्यामुळे हे डोंगर ओसाड पडले होते. आता तिथूनच लिथियमचे साठे सापडले आहेत आणि पुन्हा हा परिसर मोठ्या औद्योगिक क्रांतीचे केद्र ठरले आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2050 सालापर्यंत लिथियम धातूची जागतिक मागणी 500 टक्क्यांनी वाढणार आहे. या दृष्टिकोनातून, राजस्थानमधील (Rajasthan) हे लिथियमचे साठे भारतासाठी मोठ्या आर्थिक फायद्याच्या ठरणार आहेत. सध्या बोलिव्हिया हा सर्वात मोठा लिथियमचा निर्यात करणारा देश आहे. जगातील सर्वात मोठा, 21 दशलक्ष टनांचा लिथियमचा साठा बोलिव्हिया देशात आहे. यानंतर अर्जेंटिना, चिली आणि अमेरिकेतही मोठे साठे आहेत. मात्र 5.1 दशलक्ष टन लिथियमचा साठा असलेल्या चीनची जागतिक बाजारपेठेत मक्तेदारी आहे. भारत 53.76 टक्के लिथियम चीनकडून आयात करतो. 2020-21 या वर्षात भारताने 6 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे लिथियम आयात केले आहे. त्यापैकी 3 हजार 500 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे लिथियम चीनकडून खरेदी केले आहे. अशावेळी भारतातच लिथियम मिळाल्यामुळे चीनची ही दादागिरी पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राजस्थानमधील बाडमेर, जैसलमेरसह अन्य काही ठिकाणीही लिथियमचा साठा असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार सर्वक्षण करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.
सई बने