Home » Benadryl Challenge मुळे युएसमधील १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Benadryl Challenge मुळे युएसमधील १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

by Team Gajawaja
0 comment
Benadryl challenge
Share

संयुक्त राज्य अमेरिकेचे एक शहर ओहियो मध्ये एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यासाठी बेनाड्रिल चॅलेंजला पूर्ण करत होता. हे चॅलेज पूर्ण करण्याच्या नादात त्याची प्रकृती ऐवढी बिघडली की तो ७ दिवस वेंटिलेटरवर होता. अखेरत त्याचा मृत्यू झाला.मुलाच्या वडिलांनुसार हॉल्यूसिलेशन जाणवण्यसाठी जॅकब स्टीवन आपल्या मित्रांसोबत मिळून हे चॅलेंज पूर्ण करत होता. यामध्ये बेनाड्रिलचे असे औषध घ्यायचे होते ज्यामध्ये अँन्टी हिस्टामाइन अधिक आहे. क्षमतेपेक्षा अधिक औषधांचे सेवन केल्यानेच त्याचा मृत्यू झाला. (Benadryl challenge)

काय आहे बेनाड्रिल चॅलेंज
बेनाड्रिल बद्दल तुम्ही ऐकले असेल. जेव्हा आपल्याला सर्दी-खोकला होतो तेव्हा ते घेतले जाते. हे चॅलेंज सुद्धा बेनाड्रिलशी संबंधितच आहे. यामध्ये सीरिप ऐवजी गोळ्यांचे सेवन करायचे होते. या त्या गोळ्या आहेत ज्यामध्ये अँन्टी हिस्टामाइन सॉल्ट असते. हे चॅलेंज अमेरिकेतील टिकटॉकवर ट्रेंन्डमध्ये आहे. यामध्ये १२ पेक्षा अधिक अँन्टी हिस्टमाइनच्या गोळ्या खायच्या होत्या. ज्याला हॉल्युसिलेशनसारखे वाटू लागते. त्यानंतर टिकटॉकवर त्याचा व्हिडिओ बनवून पोस्ट करायचा होता.

कशासाठी वापरतात अँन्टी हिस्टामाइन गोळी
सर्दी-खोकला होतो तेव्हा तुम्हाला त्याच्या ३-४ गोळ्या दिल्या जातात. यामध्ये एक गोळी ही अँन्टी हिस्टामाइनची सुद्धा असते. हे हिस्टामाइला कंट्रोल करण्यासाठी कामी येते. हिस्टमाइन शरिरात आढळणारे एक केमिकल असून दे आपल्या नर्वस आणि इम्युन सिस्टिमला प्रभावित करते. यामुळे शरिरात सूज, डोळ्यांत पाणी येणे, घसा खवखवणे, शिंका येणे किंवा अन्य एलर्जी होऊ शकतात. ती आरामासाठीच अँन्टी हिस्टमाइन गोळी दिली जाते. परंतु त्याचे अधिक सेवन धोकादायक ठरु शकते.

मुलाची तब्येत का बिघडली?
बेनाड्रिल चॅलेंजमध्ये मुलाला इतक्या अँटीहिस्टामाइन गोळ्या घ्याव्या लागल्या की तो भ्रमित होऊ लागला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्टीव्हने एकाच वेळी ठराविक प्रमाणापेक्षा जास्त गोळ्या खाल्ल्या होत्या. वैद्यकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की 6 ते 12 वयोगटातील मुले 24 तासांत जास्तीत जास्त 6 अँटीहिस्टामाइन गोळ्या सहन करू शकतात. यापेक्षा मोठी मुले आणि प्रौढ 24 तासांत 12 गोळ्या सहन करू शकतात, जरी डॉक्टर फक्त 3 ते 4 गोळ्या घेण्याची शिफारस करतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अँटीहिस्टामाइन औषधे ठराविक प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास चक्कर येण्याबरोबरच जीवही जाऊ शकतो.(Benadryl challenge)

हे देखील वाचा- नेदरलँन्डमध्ये मुलांच्या इच्छामरणासाठी तयार केलाय कायदा

कंपनीने काय म्हटले?
बेनाड्रिल चॅलेंज अमेरिकेत वेगाने सुरू आहे. यामुळे एका किशोरवयीन तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर औषध कंपनीने इशारा दिला असून असे आव्हान लवकरात लवकर थांबवण्याची मागणी अमेरिकेच्या आरोग्य प्रशासनाकडे केली आहे. कंपनीकडून ग्राहकांना इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अँटीहिस्टामाइन हे असे औषध आहे जे केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर दिले जाते, परंतु अमेरिकेत ते मुलांना कसे उपलब्ध होत आहे हा मोठा प्रश्न आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही कठोर होण्याचे आदेश दिले आहेत आणि लोकांनाही ते मुलांच्या आवाक्यांपासून दूर ठेवण्यास सांगितले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.