Home » जनगणनेत चीनला टाकले मागे, वाचा भारताच्या लोकसंख्येवरील हा रिपोर्ट

जनगणनेत चीनला टाकले मागे, वाचा भारताच्या लोकसंख्येवरील हा रिपोर्ट

by Team Gajawaja
0 comment
India Population
Share

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्राच्या ‘द स्टेट ऑफ पॉप्युलेशन’ रिपोर्ट, २०२३ च्या आकडेवारीनुसार भारताने चीनला जनसंख्येत मागे टाकले आहे. या रिपोर्टनुसार भारतातील सध्याची लोकसंख्या ही १४२.८६ कोटींवर पोहचली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटींवर गेली आहे. दोन्ही देशांच्या लोकसंख्येत केवळ २९ लाखांचा फरक आहे.(India Population)

खरंतर UNFPA च्या द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनच्या रिपोर्ट, २०२३ हा डेमोग्राफिक इंडिकेटर्स श्रेणीनुसार दिला गेला आहे. भारताची लोकसंख्या १९५० नंतर चीनपेक्षा वाढत गेलीच आहे. संयुक्त राष्ट्राने जनसंख्येचा डेटा एकत्रित करण आणि जारी करण्यास सुरुवात केली होती. युएनएफपीएचे मीडिया सल्लागार अन्ना जेफरीज यांनी असे सांगितले की, हे कळत नाहीय की अखेर कधी ही लोकसंख्या चीनपेक्षा अधिक वाढली गेली.

भारतात अधिक तरुणांची संख्या
भारताची लोकसंख्येसंदर्भात युएनचा हा रिपोर्ट असे सांगतो की, भारतात २५ टक्के लोकसंख्या ही ०-१४ वर्षामधील आहे. त्यानंतर १०-१९ वर्षाचे १८ टक्के आणि १०-२४ वयोगटातील लोकांची संख्या ही २६ टक्के आहे. परंतु भारतात १५-६५ दरम्यानची लोकसंख्या ही जवळजवळ ६८ टक्के आहे. रिपोर्ट्सनुसार भारतात अधिक तरुणांची संख्या आहे.(India Population)

या रिपोर्टमध्ये असे ही समोर आले आहे की, भारतात एकूण प्रजनन दर ०.२ आहे. भारतीय पुरुषांसाठी एवरेज आयुष्य ७१ वर्ष आहे. तर महिलांचे ७५ वर्ष आहे. दरम्यान हा रिपोर्ट १९७८ पासून प्रकाशित होत आहे. या प्रकरणी UNFPA इंडियाच्या प्रतिनिधींनी असे म्हटले आहे की, आता जगाची लोकसंख्या ८ अरबवर पोहचली आहे.

हे देखील वाचा- समलैंगिक लग्नासंबंधित मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

युएनच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटलेकी, आम्ही भारतातील १.४ कोटी लोकांना तेवढ्याच संख्येने संधीच्या रुपात पाहू. त्याचसोबत भारत हा एक शक्तिशाली देश आहे. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता, आर्थिक विकासाच्या प्रकरणी सातत्याने तो पुढे जात आहे. आपण तंत्रज्ञानाच्या जगात दररोज नवे रेकॉर्ड्स करत आहोत.(India Population)

वाढत्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देण्याचे आव्हान 

भारतातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असल्याचे लक्ष्य घेऊन चालत आहोत. दरम्यान, त्याचसोबत काही गोष्टी या चिंतेत पाडतात. भारतासमोर मोठी समस्या अशी आहे की, वेगाने काम शोधणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे. पण या तरुणांमध्येच त्यांच्या डिग्री या त्यांना काम मिळवून देण्याच्या मार्गात अडथळा करत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार सर्वाधिक मोठी समस्या योग्य लोकांची आहे. रोजगाराची संधी आहे. कंपन्यांना गरजसुद्धा आहे. पण कॉर्पोरेट जगातील लोकांना उत्तम कौशल्य असलेली लोक मिळत नाही आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.