भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. ट्रेनमध्ये ठेवलेले सामान चोरी होणे सर्वसामान्य आहे. परंतु आता असे झाल्यास यासाठी रेल्वे जबाबदार असणार आहे. यासाठी रेल्वेला प्रवाशाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. याबद्दलचा निर्णय कंज्युमर कोर्टाने नुकताच सुनावला आहे. कोर्टाने गेल्या काही काळात झालेल्या चोरीच्या प्रकरणी रेल्वेला जबाबदार धरत प्रवाशाला सामानाची पूर्ण रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.(Luggage Theft in Railway)
खरंतर चंदीगढं स्टेट कंज्युमर कमीशनने ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाजूने एक मोठा निर्णय सुनावला आहे. त्यानुसार त्यांनी असे म्हटले की, जर ट्रेनच्या रिजर्वेशन डब्ब्यातून प्रवाशाचे सामान चोरी झाल्यास तर त्याची पूर्ण नुकसान भरपाई ही रेल्वेला द्यावी लागेल. तर चोरी प्रकरणी कोर्टाने प्रवाशाला ५० हजारांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.
चंदीगढं येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने कंज्युमर कोर्टात रेल्वेच्या प्रवासादरम्यान आपल्या पत्नीची पस्र अंबाला स्थानकात एका व्यक्तीने चोरली. पर्समध्ये पैसे आणि मौल्यवान गोष्टी होत्या. त्या व्यक्तीने आधी जिल्हा ग्राहक कोर्टात धाव घेतली होती. परंतु त्याचे तेथे हे प्रकरण फेटाळून लावले. त्यानंतर व्यक्तीने असे म्हटले की, रिजर्वेशन असलेल्या कोचमध्ये काही संशयित व्यक्ती फिरत होत्या. याची सुचना टीटीईला सुद्धा दिली होती. त्यांनी मात्र याकडे कानाडोळा केला. जसे अंबाला स्थानक आले तेव्हा ते संशयित लोकांनी बायकोची पर्स चालत्या ट्रेनमधून खेचून घेत तेथून पळ काढला.
कंज्युमर कोर्टाने या संपूर्ण प्रकरणी रेल्वेला दोषी मानले. त्यांनी असे म्हटले की, ट्रेनच्या मधील प्रवासी आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही रेल्वेची आहे. कमीशनने पीडित प्रवाशाला १.०८ लाख रुपये आणि ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. (Luggage Theft in Railway)
हे देखील वाचा- जगातला तिसरा मोठा रोपवे आता काशी नगरीमध्ये
यापूर्वी सुद्धा छत्तीगढच्या ग्राहक कोर्टाने रेल्वेच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई केली होती. तेव्हा कोर्टाने त्यांच्या निर्णयात एसी कोचमधील प्रवाशाचे सामान चोरी झाल्याने त्यासाठी पूर्णपणे जबाबदार रेल्वेला धरले होते. ग्राहक फोरमने आपल्या निर्णयात असे म्हटले होते की, आरक्षित कोचमध्ये अनधिकृत लोकांच्या प्रवेशावर टीटीईने बंदी घातली पाहिजे. जर त्यांच्या चुकीमुळे प्रवाशाचे नुकसान झाल्यास त्यासाठी रेल्वेच जबाबदार असेल. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कधी असा अनुभव आल्यास तुम्ही सुद्धा या संदर्भात ग्राहक कोर्टात तक्रार करुन नुकसान भरपाई मिळवू शकता.