ऑनलाईन स्टोरच्या माध्यमातून आपण जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करतो तेव्हा लहान गोष्ट सुद्धा पारखून पाहतो. तसेच त्याच्या किंमतीची तुलना ही अन्य वेबसाइट्स सोबत करतो. मात्र आपण जेव्हा आपल्या आयुष्यातील सर्वाधिक मोठी खरेदी म्हणजेच घर खरेदी करायचे असेल तेव्हा तुम्हाला काही गोष्टी जरुर पाहिल्याच पाहिजेत. परंतु अशावेळी काही वेळा लोक अशी चुक करतात की, अधिक माहिती न काढता थेट बुक केल्यानंतर राहण्यासाठी जातात तेव्हा आपली फसवणूक झाल्यासारखे होते. अशातच बिल्डर जेवढा एरिया आणि नकाशा त्यांच्या ब्रॉशरमध्ये दाखवतात तसे वास्तवात नसते. त्यामुळे बिल्डरकडून घर खरेदी करताना किंवा पजेशन घेते वेळी काही गोष्टी पहा. बिल्डरला पुढील काही गोष्टी जरुर विचारा.(Buying flat tips)
-जमिनीच्या कागदपत्रांची पूर्णपणे पडताळणी
नेहमीच आपण बिल्डरच्या बोलण्यात येऊन गुंतवणूक करतो. पण वास्तवात प्रोजेक्ट पेपर्स तपासून पाहत नाही. अशातच गरजेचे आहे की, आपण डेवलपर किंवा बिल्डरला त्या जमिनीसंदर्भातील रजिस्ट्रेशन जरुर मागा जेथे प्रोजेक्ट तयार केला जात आहे. बँक अशाच जमिनींसाठी कर्ज देते जी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली नसते. या व्यतिरिक्त बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये किती टॉवर, किती फ्लॅट आणि किती मजले असणार आहेत त्यानुसार अथॉरिटीकडून मंजूर झालेला लेआउट मॅप सुद्धा पहा. बहुतांशवेळेला ही गोष्ट बिल्डर सांगत नाहीत.
-जमिनीचे लोकेशन आणि सॅम्पल फ्लॅट जरुर पहा
बिल्डरकडून जे ब्रॉशर दाखवले जाते ते वास्तवात वेगळे असते. अशातच ब्रॉशकवर नव्हे तर आपल्या डोळ्यांनी जे पहाल त्यावर विश्वास ठेवा. जेथे प्रोजेक्ट उभारला जात आहे तेथे स्वत: विजिट करा. येथे तुम्हाला फ्लॅटसाठी कोणत्या गोष्टी वापरल्या जात आहेत हे कळे. त्याचसोबत तुमच्या लोकेशनपासून हॉस्पिटल, शाळा, मार्केट, रेल्वे स्थान सारख्या गोष्टी सुद्धा तपासून पहा. या व्यतिरिक्त सॅम्पल फ्लॅट मध्ये काय सुविधा दिल्या जात आहेत हे सुद्धा पहा.
-तुमच्या फ्लॅटच्या मॅपची योग्य माहिती घ्या
काही वेळा ग्राहक फ्लॅटमध्ये लिहिलेल्या सुपर एरियाला पाहत तोच आपला फ्लॅट असणार असे मानत फ्लॅट बुकिंग करतात. खरंतर फ्लॅट यापेक्षा कमी असतो. अशातच ग्राहकांना बिल्टअप, सुपर आणि कार्पेट एरियाचे गणित सुद्धा कळले पाहिजे. कारपेट एरिया त्या एरियाला बोलले जाते ज्यावर कारपेट टाकू शकतो. या एरियात फ्लॅटच्या भिंतींचा समावेश नसतो. हे फ्लॅटमधील रिकामे स्थान असते. बिल्टअप एरिया म्हणजे फ्लॅटच्या भिंती सुद्धा मापल्या जातात. म्हणजेच कारपेट एरियासोबत पिलर, भिंती आणि बाल्कनीचा सुद्धा समावेश आहे. तर सुपर एरिया त्या एरियाला म्हटले जाते, ज्यामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये कॉमन वापराच्या गोष्टींचा समावेश केला जातो. जसे जनरेट रुम, पार्क, जिम, स्विमिंग पूल, लॉबी, टेनिस कोर्ट असे. सर्व बिल्डर्स फ्लॅटला सुपर एरियाच्या आधारावर विक्री करतात.(Buying flat tips)
–पेनल्टी आणि पेमेंट क्लॉजवर लक्ष द्या
ठरवलेल्या वेळे पर्यंत प्रोजेक्टवर पजेशन न दिल्यास डेवलपर्सला ग्राहकांना पेनल्टी द्यावी लागते. काही डेवलपर्स पजेशनपर्यंत ग्राहकांकडून एका तरी हप्ताचे पेमेंट न दिल्यास त्यांना पेनेल्टी लावली जाईल असे सांगतात. अशातच पेनेल्टी क्लॉज काळजीपूर्वक वाचा, गरज भासल्यास तज्ञांचा सल्ला घ्या. या व्यतिरिक्त तुम्हाला कशा प्रकारे पेमेट करायचे ते सुद्धा तपासून पहा. आजकाल १० टक्के बुकिंची रक्कम अन्य पजेशनवर 12/24/42 महिन्यांसाठी व्याज सूट, 20:80 स्किम, 20:80’ / ‘10:90’ / ‘8:92’ / ‘5:95 सारख्या स्किम अत्यंत लोकप्रिय आहे. ग्राहकांना प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी या सर्व गोष्टी बारकाव्याने तपासून पहा.
हे देखील वाचा- सोन्याला आधार कार्डप्रमाणे 6 अंकी कोड असणार म्हणजे नक्की काय?
-हिडन चार्जेस सुद्धा तपासून पहा
बिल्डर बुकिंगच्या वेळी सफेद पानांवर केवळ रक्कम आणि हप्तांची माहिती देते. मात्र यामगे कोणते कोणते चार्ज असतात हे स्पष्टपणे सांगत नाहीत. हिडन चार्जेस मध्ये पार्किंग चार्ज, सोसायटी चार्ज, पॉवर बॅक अप सारखे चार्जेसचा समावेश केला जातो. हे सर्व चार्जेस बद्दल बुकिंग करतवेळीच या गोष्टींबद्दल समजून घ्या, या व्यतिरिक्त लक्षात ठेवा की, बिल्डर प्राइस एस्केलेशन चार्जची अट घालत तर नाही ना. काही वेळेस डेवलपर प्रोजेक्टवर एक्स्लेशन चार्जेस लागतात. जसे सीमेंट आणि कच्चा मालाच्या किंमती वाढल्यानंतर डेवलपर ग्राहकांसाठी फ्लॅटच्या किंमतीत वाढ करतात.