जर तुमच्या घरात सुद्धा मुलं असतील आणि त्यांच्यासोबत तुमचे संबंध उत्तम नसतील तर यामागील कारण असू शकते तुम्ही ओवर रिअॅक्ट करत असाल आणि तुमच्या चुका स्विकारत नसाल. नेहमीच आपण असा विचार करतो की, माफी मागण्याचे काम हे मोठ्यांचे नसते. परंतु तुमचा हा विचार पुर्णपणे चुकीचा आहे. यामुळे तुमचे मुलं तुमच्यापासून दूर होऊ शकते. खरंतर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार असता आणि तुम्ही ती व्यवस्थितीत करत नाहीत तर परिणामी मुलांना स्ट्रगल करावा लागतो. त्यांच्यासोबत घडलेल्या काही गोष्टींमुळे ते दुखावले जाऊ शकतात. अशातच तुम्ही जर कधी चुकलात तर माफी मागा. पण मुलांशी माफी कशी मागावी याची खंत तुमच्या मनात असेल तर याच संदर्भातील काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(How To Apologize Your Kids)
-चुकांची जबाबदारी घ्या
मुलांना आपल्या पालकांच्या चुकांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागते. अथवा त्यांना स्ट्रगल करावा लागतो. अशातच मुलाला असे कधीकधी वाटते की, आपल्या पलकांना त्यांनी केलेल्या चुका जाणून घ्याव्यात आणि त्या सुधाराव्यात. त्यांना आपल्या पालकांनी आपले ऐकले पाहिजे असे नाही तर चुक असल्यास मोठ्या मनाने आणि योग्य पद्धतीने माफी सुद्धा मागावी.
-कारण सांगा
जर तुम्ही तुमच्या मुलाशी चुकीचे वागत असाल तर हे गरजेचे आहे की, त्याच्या समोर तुम्ही कुठे चुकत आहात ते त्याला स्पष्ट करुन सांगा. तुमच्या समस्येवर तोगडा काढण्यासाठी तुम्ही मुलाला काही गोष्टी सांगू शकता. अन्यथा तुमचा राग हा मुलावर निघेल आणि तुमचे मुलं तुमच्याशी बोलणे कमी करेल. अशातच तुम्ही का असे वागताय त्यामागील नेमकं कारण काय हे स्पष्ट करुन सांगा.(How To Apologize Your Kids)
हे देखील वाचा- मुलांना लहानपणापासून बचत करण्याची सवय लावण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी
-स्पष्ट आणि संक्षिपत रुपात सांगा
तुम्ही संक्षिप्त आणि इमानदारीने मुलांना समजून सांगा ही प्रत्येकजण चुका करतो. चुका या सर्वांकडून होत राहतात. चुका झाल्यानंतर माफी मागून त्या सुधारु शकतो हे सुद्धा मुलाला सांगा. अशाप्रकारे तुम्ही जर मुलासोबत चुकीचे वागला असाल तर माफी मागू शकता. यामध्ये तुमचा खालीपणा होणार नाही. माफी मागितल्यानंतर काही गोष्टी सुधारल्या ही जातील आणि तुमचे नाते ही उत्तम होईल.