फ्रान्समधील इमॅन्युएल मॅक्रॉनच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सामाजिक अर्थव्यवस्था हाताळणाऱ्या महिला मंत्र्याने प्लेबॉय मासिकाच्या मुखपृष्ठासाठी मॉडेलिंग केल्यानं फ्रान्समध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे (Magazine Photo). आधीच फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याच्या सरकराच्या निर्णयाविरुद्ध संप आणि हिंसक निदर्शने सुरू आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉनच्या विरोधात मोठी नाराजी असताना त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्यानं थेट प्लेबॉय या मासिकासाठी मॉडेलिंग केल्यानं नाराजीत भर पडली आहे. फ्रेंच सरकारमधील सामाजिक अर्थव्यवस्था हाताळणाऱ्या मर्लिन शियाप्पा यांचे प्लेबॉय या वादग्रस्त मासिकाच्या मुखपृष्ठावर फोटो आल्यावर फ्रान्समध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्ले बॉय मासिकाच्या मुखपृष्ठावर मर्लिन शियाप्पा या 40 वर्षाच्या मंत्री शुभ्र पांढ-या रंगाच्या पोशाखात दिसल्या आणि फ्रांन्समधील वादळात आणखीनच भर पडली. (Magazine Photo)
मर्लिन शियाप्पा यांची ओळख फ्रान्समध्ये सुंदर, चतुरस्त्र महिला अशी आहे. मर्लिन या 40 वर्षांच्या असून त्या दोन मुलींच्या आई आहेत. मर्लिन या स्वतंत्र लेखिकाही आहे. तब्बल 28 हून अधिक कादंबऱ्या आणि लेख त्यांनी लिहिले आहेत. मर्लिन यांचे विचार प्रखर स्त्रीवादी मानले जातात. अर्थात त्यातील बरेच लेख हे वादग्रस्त ठरले आहेत. मर्लिन यांनी जास्त वजन असलेल्या लोकांना सेक्स टिप्स देण्यावर एक पुस्तक लिहिले आहे. यानंतर मर्लिन पहिल्यांदा वादात सापडल्या आणि चर्चेत आल्या. आताही प्लेबॉय सारख्या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर दिसल्याने आणि त्यासाठी फोटोशूट केल्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टिका होत आहे. फारकाय फ्रान्समधील आंदोलनांचे वातावरण आणि एका मंत्र्याचे असे वर्तन पाहून पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न आणि इतर मंत्र्यांनीही हे लज्जास्पद कृत्य असल्याचे म्हटले आहे. प्लेबॉय मासिकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या फोटोमुंळे ते बरेच वेळा वादात सापडले आहे. प्लेबॉय बर्याचदा त्याच्या मुखपृष्ठावर सुंदर मॉडेल्सचे उत्तेजक छायाचित्रांचा प्रकाशीत करते. प्लेबॉय मासिक काही दिवसांपूर्वी बंद झाले होते. नुकतेच ते पुन्हा सुरू करण्यात आले. जगातील नामांकित सेलिब्रिटींना या मासिकात येण्यास सहसा आवडत नाही असे म्हणतात. पण प्लेबॉय त्यासाठी प्रचंड मोठी रक्कम मोजते आणि त्या रक्कमेसाठी अनेक मॉडेल्स प्लेबॉय साठी नग्नही मॉडेलिंग करायला तयार होतात. (Magazine Photo)
आता फ्रान्सच्या 40 वर्षीय मंत्री मर्लिन शियाप्पा यांनी प्लेबॉयसाठी मॉडेलिंग केले तेव्हा एकच खळबळ उडाली आहे. मंत्री म्हणून त्यांनी वाईट उदाहरण घालून दिल्याची ओरड होत आहे. मर्लिन या स्पष्टवक्त्या आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या त्या निकटवर्ती मानल्या जातात. 2017 पासून, त्या त्यांच्यामुळे फ्रान्सच्या मंत्री आहेत. (Magazine Photo)
2015 मध्ये एका कार्यक्रमात त्या मॅक्रॉनला यांना पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भेटल्या मॅक्रॉन यांच्यावर तेव्हा मर्लिन यांची एवढी छाप पडली की मॅक्रॉन यांनी त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिले. अर्थात मर्लिन याआधी एका प्रांताच्या उपमहापौर म्हणून काम पाहत होत्या. त्या फ्रान्सच्या ज्युनिअर सेक्रेटरी म्हणजेच कनिष्ठ मंत्री होत्या आणि आता मंत्रिमंडळाच्या वरिष्ठ मंत्री आहेत. पण मर्लिन आणि वाद हे मात्र कायम आहेत. त्यांची वक्तव्ये, टीव्ही शो अनेक वेळा त्यांना वादात आणतात. प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर आल्यानंतर तर त्यांच्यावर अधिक टिका होऊ लागली आहे. अर्थात मर्लिन यांनी सर्व टिकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
========
हे देखील वाचा : पुतिन यांनी जेव्हा केजीबीला अंतानंतर पुन्हा स्थापित केले…पुस्तकातून हनी ट्रॅप संबंधित मोठे खुलासे
========
मर्लिन यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका जाहिरात कंपनीतून केली. त्याच काळात त्यांनी ऑनलाइन मासिक सुरू केले. स्त्रीवादी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. मग पूर्णवेळ लेखक होण्यासाठी जाहिरात कंपनीची नोकरी सोडली. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी लग्न केले. पण हे लग्न फार टिकले नाही. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी पुन्हा लग्न केले. मर्लिन यांनी समलैंगिक आणि महिला अधिकारांवर दिलेली मुलाखतही अशाच प्रकारे वादग्रस्त ठरली. त्यावेळीही त्यांच्यावर टिका करण्यात आली आणि त्यांनी या सर्व टिकाकारांना चोख उत्तर दिले होते. आता प्लेबॉयच्या छायाचित्रानंतर (Magazine Photo) उठलेल्या वादळालाही त्यांनी अशाच पद्धतीनं तोंड दिले आहे. महिलांच्या त्यांच्या स्वतःच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे. त्यांना त्यांच्या शरीरासोबत जे हवे ते करण्यास त्या स्वतंत्र आहेत. अशी पोस्ट मर्लिन यांनी सोशल मिडीयवर टाकली आहे. अर्थात त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे वाद अधिक वाढला आहे. आता मर्लिन या मंत्री आहेत. देशाचं प्रतिनिधित्व करतात. अशावेळी त्यांची प्रतिमा ही अशापद्धतीनं खराब झाल्यास त्याचा फटका फ्रान्सलाही बसेल अशी टिका विरोधकांनी केली आहे. यातच फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय वाढवण्याविरोधात अनेक आठवड्यांपासून हिंसक निदर्शने सुरू आहेत. ग्रीन पार्टीचे खासदार सँड्रीन रोसो यांनीही मर्लिनच्या या फोटोशूटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एका टीव्ही चॅनलला सांगितले की, ‘महिला कुठेही आपले शरीर दाखवू शकतात, मला त्यात काही अडचण नाही, पण सामाजिक परिस्थिती काय आहे, याची जाणीव त्यांनी ठेववी, आणि ती महिला जर मंत्री असेल तर त्यांनी ही जाणीव ठेवणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.