आपण बऱ्याच वेळा पाहतो की, दुसऱ्यांना जांभई देताना पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा येते. असे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असते. जगातील बहुतांश लोकांच्या सोबत हेच होते. वैज्ञानिक भाषेत याला संक्रमण जांभई असे म्हटले जाते. पण यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण हे काही एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस संक्रमण नव्हे. याचा संबंध मेंदूशी आहे. तर याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.दीर्घकाळापर्यंत वैज्ञानिकांनी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. रिसर्च दरम्यान हे कळले की अखेर दुसऱ्यांना जांभई देताना पाहिल्यानंतर आपल्याला असे का होत असावे.(Science behind yawing)
इटलीतील वैज्ञानिकांनी सांगितले कारण
एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहिल्यानंतर तसेच आपल्यासोबत का होते? यामागील कारण इटलीतील वैज्ञानिकांनी सांगितले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, यामागील कारण असे की मिरर न्यूरॉन. या न्यूरॉनचा संबंध काहीतरी नवीन शिकणे, सहानुभूती दाखवणे किंवा नक्कल करण्यासंबंधित आहे.
मिरर न्यूरॉनचा शोध १९९६ मध्ये इटलीतील न्यूरोबायोलॉजिस्टिक जियाकोमो रिजोलाटी यांनी लावला होता. जियाकोमो आणि त्यांच्या टीमने मिळून एका माकडाच्या डोक्यावर रिसर्च केला. माकडाच्या डोक्यावर होणाऱ्या या न्यूरॉनच्या अॅक्टिव्हिटीला रेकॉर्ड करण्यात आले. प्रयोगादरम्यान असे दिसले की, ते दुसऱ्या जनावरांसारखी कोणती अॅक्टिव्हिटी कॉपी करुन करतात.
व्यक्तीमध्ये सुद्धा काम करते मिरर न्यूरॉन
माकडांनंतर व्यक्तींवर प्रयोग केल्यानंतर हे समोर आले की, मिरर हार्मोन व्यक्तींमध्ये सुद्धा त्याच प्रकारे काम करतात. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास तर जेव्हा आपण एखाद्याला पायऱ्या चढताना पाहचोतेव्हा त्या संबंधित न्यूरॉन्स अॅक्टिव्ह होतात. त्यामुळे जो ती पाहतो त्याला सुद्धा तिच क्रिया करण्यासाठी सांगितले जाते.(Science behind yawing)
अशा प्रकारे व्यक्ती जेव्हा एखाद्याला जांभई देताना पाहतो तेव्हा त्याचा डोक्यातील मिरर न्यूरॉन अॅक्टिव्ह होतात. तर त्याला सुद्धा तसेच करण्यास सांगितले जाते, जसे दुसरा व्यक्ती करत आहे. मिरर न्यूरॉन हे डोक्याच्या चार हिस्स्यांमध्ये असतात. प्री मोटर, इंफीरियर फ्रंटल गायरस, पेराइटल लोब आमि सुपीरियर टेम्पोरल सुलक. हे प्रत्येक वेगवेगळे हिस्सा विविध प्रकारच्या कामांसाठी ओळखळे जातात. त्यांची काम करण्याच्या क्षमतेवर मिरर न्यूरॉनचा परिणाम होते.
हे देखील वाचा- वयाच्या चाळिशीनंतर गुघडे दुखीच्या समस्येमुळे त्रस्त… ‘या’ टीप्सने हाडं बनवा मजबूत
रिसर्चमध्ये असे समोर आले की, काही अशा स्थिती निर्माण होतात जेव्हा हे मिरर न्यूरॉन प्रभावित होतात आणि त्याप्रकारे काम करत नाही जसे त्यांनी केले पाहिजे. ऑटिज्म, सीजोफ्रेनिया आणि मेंदू संबंधित आजारात ते प्रभावित होऊ लागतात. जसे ऑटिज्मच्या रुग्णाच्या प्रकरणी जांभई देण्याचा परिणा तशा प्रकारचा दिसत नाही जसे दुसऱ्यांना होते. त्यामुळे पुढील वेळी जेव्हा दुसऱ्यां पाहून जांभई देताना लक्षात ठेवा की, यामागे मिरर न्यूरॉन्सचे गणित आहे. तो व्यक्तीच्या मेंदूला कॉपी करण्यास सांगतो.