तुम्ही बहुतांश जणांना असे बोलताना ऐकले असेल की, माझं डोक खुप तापतं, माझ्याशी बोलू नकोस, मला ऐकटे सोड. लोक या वाक्याचा वापर तेव्हाच केला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीला खुप राग आलेला असतो. तेव्हा या वाक्यांचा वापर ते वारंवार करतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का, रागात खरंच व्यक्तीच डोक गरम होत असेल? व्यक्तीच्या मस्तकाचे तापमान हे अन्य अवयवांच्या तुलनेत अधिक असेल? तर याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.(Temperature of Brain)
शरिरापेक्षा डोक्याचे अधिक असते तापमान
नुकत्याच व्यक्तीच्या डोक्यासंदर्भात एक रिसर्च करण्यात आला. त्यामध्ये असे समोर आले की, आपल्या मस्तकाचे तापमान दिवसभरात काही वेळेस वाढते आणि कमी होत राहत असते. ब्रिटेनच्या एका रिसर्च ग्रुपच्या जर्नल ब्रेन मध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, आपल्या मस्तकाचे तापमान एका दिवसात खुप वेळा वाढते आणि कमी होत राहते. रिपोर्ट असे सांगते की, जर व्यक्तीचे डोक पूर्णपणे ठीक असेल तर त्याचे तापमान शरिराच्या अन्य अवयवांच्या तुलनेत अधिक असते. आपल्या शरिराचे सर्वसामान्य तापमान 37°C असते.
किती असते डोक्याचे तापमान?
रिपोर्टनुसार हेल्थी डोकं हे अन्य शरिराच्या अवयवांच्या तुलनेत अधिक गरम असते. आपल्या मेंदूचे जवळजवळ तापमान 38.5°C असते. जे अन्य अवयवांच्या तुलनेत 2°C अधिक आहे. ब्रिटेनच्या संशोधकांनी रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या डोक्याच्या तापमानाबद्दल काही गोष्टींसह खुलासा केला आहे. त्यानुसार आपले डोक्यातील खोलवरच्या हिस्स्याचे तापमान हे 40°C पर्यंत असते. पण ऐवढे तापमान जर शरिराचे झाल्यास तर डॉक्टर्स व्यक्तीला ताप आल्याचे सांगून त्याला औषध देण्यास सुरुवात करतो.(Temperature of Brain)
हे देखील वाचा- महिलांमध्ये Egg Freezing चा ट्रेंन्ड का वाढतोय?
महिला की पुरुष, कोणाचं डोक अधिक गरम असते?
संशोधकांनी असा खुलासा केला की, महिलांचे डोकं हे पुरुषांच्या तुलनेत अधिक गरम असते. डोक्याच्या खोलवरच्या हिस्स्यात पुरुषांचे तापमान 40°C असे. पण महिलांमध्ये हेच तापमान 40.90°C असते. यानुसार महिलांच्या डोक्याचे तापमान पुरुषांच्या तुलनेत 0.4°C अधिक असते. संशोधकांना असे वाटते की, याचा संबंध मासिक पाळीशी आहे. त्यांना असे सुद्धा कळले की, जसं जसं व्यक्तीचे वय वाढते तेव्हा त्याच्या मेंदूचे तापमान वाढू लागते. वाढत्या वयानुसार डोक्याच्या खोलवरच्या हिस्स्यातील तापमान ही अधिक वाढत जाते.