नात्यात वाद होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहेच. पण एकमेकांना समजून घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. जर नात्यात समजूतदारपणा आणि विश्वास असेल तर सर्वकाही साध्य होते. असे कधीच करु नये की, पार्टनर जरी भांडला तरीही त्याच्या चुकांवर वारंवार बोट ठेवून त्याला हिणवावे. यामुळे तुमच्यातील भांडण अधिक चिघळू शकते. परिणामी नात्यात फूट पडून तुम्ही विभक्त होऊ शकतात. वैवाहिक रिलेशनशिप असो किंवा कपल्स असो त्यांनी नात्यात आल्यानंतर काही मर्यांदाचे पालन करणे फार आवश्यक असते. एकमेकांच्या समस्या समजून घ्या. तरीही नात्यात वाद मिटत नसेल तर पुढील काही टीप्स तुमच्या जरुर वाचा. (Relationship Tips for Couples)
-उत्तर देण्याऐवजी ऐका
जर तुम्ही पार्टनरचे ऐकून घेण्याऐवजी उत्तर देत असाल तर तुमच्यामधील वाद अधिक वाढू शकतो. त्यामुळे हे बेस्ट असेल की, तुम्ही पार्टनरचे संपूर्ण ऐकून घेण्याचा प्रयत्न करुन घ्या. असे समजून घ्या की, नक्की पार्टनर कोणत्या गोष्टींमुळे नाराज आहे. हे ऐकल्यानंतर त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
-बोलणं व्यवस्थित ठेवा
जर तुम्ही पार्टनरशी भांडताना वाईट शब्दांचा वापर करत असाल तर ते मिटण्याऐवजी अधिक वाढले जाईल. यामुळेच बोलताना सुद्धा आपण काय बोलत आहोत याचा विचार करा. कारण तोंडातून बाहेर पडलेला शब्द पुन्हा मागे घेता येत नाही. एकमेकांचा आदर करा आणि जर तुम्हाला पार्टनरचे पटत नसेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगा.
-ब्रेक घ्या
तुम्हाला वाटत असेल तर भांडणात तुम्ही अधिक इमोशनल होत आहात किंवा तुमचा अजूनही रागात असेल तर थोडा ब्रेक घ्या. खुल्या ठिकाणी फिरण्यास जा. असे केल्याने तुमचा राग ही शांत होईल आणि स्वत:वर कंट्रोल ही करु शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला सावरण्यासाठी ही वेळ मिळेल. तुम्ही दोघे शांत झाल्यानंतर या विषयावर चर्चा करु शकता.(Relationship Tips for Couples)
हे देखील वाचा- भुतकाळात केलेल्या चुकांमधून काही लोक का शिकत नाहीत?
-एकमेकांसाठी उभे रहा
जर तुम्ही असा विचार करत असाल की, आयुष्यात तुम्हीच कॉम्प्रोमाइज केले आहे तर ते चुकीचे आहे. कारण जेव्हा कपल्स रिलेशनशिप मध्ये येतात तेव्हा एकमेकांचे वागणे, बोलणे वेगळे असते. त्यामुळे पार्टनरशी समरुप होण्याची एकमेकांना फार गरज असते. अशातच तुम्हाला वाटत असेल तुम्हीच पार्टनरसाठी सर्वकाही करत असाल तर यामुळे गैरसमज निर्माण होती. उलट तुम्ही एकमेकांसाठी उभे राहिलात तर काही गोष्टींवर तोडगा सुद्धा निघू शकतो.