जगभरात राहणाऱ्या विविध धर्मतील अनुयायी आपल्या-आपल्या पद्धतीने आयुष्य जगतात. लोक आपल्या धर्माचा, संप्रदायाचा परंपरेने चालत आलेल्या प्रथांनुसार नामकरण, विवाह आणि दुसऱ्या काही गोष्टी करतात. तर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याबद्दलच्या ही प्रत्येकाच्या आपापल्या परंपरा आहेत. तर जैन मुनींचे अंत्यसंस्कारावेळी प्रत्येक टप्प्यात बोली लावतात आणि त्यामधून आलेली रक्कम ही लोकांच्या मदतीसाठी वापरली जाते. जगातील बहुतांश संप्रदाय असे आहेत जेथे अंत्यसंस्कार केल्यानंतर संपूर्ण परिवार त्या व्यक्तीच्या राखेचे सूप बनवून पितात. बुद्ध धर्मात अंत्यसंस्काराबद्दल वेगळी परंपरा आहे.(Buddhist Monk Cremation)
जगातील बहुतांश धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो अथवा पुरला जातो. पण अंत्यसंस्कारासाठी जुन्या काळातील काही परंपरा आज ही काही धर्मात फॉलो केल्या जातात. अशाच एका परंपरेअंतर्गत बुद्ध धर्मातील संत आणि साधुंसोबत होते. जे सर्वसामान्य लोकांवर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रक्रियेपेक्षा फार वेगळी आहे. त्यांच्यावर मृत्यूनंतर ना अंत्यसंस्कार केले जात ना ते दफन केले जाते.
बुद्ध धर्मातील व्यक्तीचा मृतदेह हा एका उंच ठिकाणी घेऊन जातात. या धर्मातील लोकांचे असे म्हणणे आहे की, मृत व्यक्तीवर अंत्यसंस्काराची प्रक्रिया ही आकाशात पूर्ण होते. यासाठी मृतदेह फार उंचावर घेऊन जातात. तिबेटन बुद्ध धर्मातील अनुयायांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आधीपासूनच एक जागा आहे. मृतदेह येथे पोहचण्यापूर्वी बुद्ध भिक्षु किंवा लामा अंत्यसंस्कारासाठी त्या ठिकाणी पोहचतात. त्यानंतर मृतदेहाची स्थानिक परंपरेनुसार पूजा केली जाते. त्यानंतर एका विशेष कर्मचारी मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतो. या विशेष कर्मचाऱ्याला बुद्ध धऱ्मातील अनुयायी रोग्यापस असे म्हणतात.
रोग्यपास शवाचे तुकडे केल्यानंतर जवाच्या पीठाचे गोळे करतो. त्यानंतर तुकडे त्यामध्ये भरले जातात. हेच तुकडडे तिबेटन पर्वतांवर आढळणाऱ्या गिधाडांना खाण्यासाठी दिले जाता.जेव्हा गिधाड त्या तुकड्यांवरील मास खातात तेव्हा राहिलेल्या हाडांचा चूरा केला जातो. या चुऱ्याला नंतर पुन्हा जवाच्या पीठाच्या गोळ्यात टाकत पक्ष्यांना खाण्यासाठी दिले जातात.(Buddhist Monk Cremation)
हे देखील वाचा- 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या ‘या’ मंदिराची पौराणिक कथा
तिबेटमध्ये बुद्ध धर्माच्या अनुयायांच्या अशा अंत्यसंस्कारामागे एक जटील परंपरा मानण्यामागे काही कारणं आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तिबेट फार उंचीवर असल्याने येथे फारशी झाडं उगवत नाहीत. अशातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं जमा करणे शक्य होत नाही. त्याचसोबत तिबेटमध्ये खडकाळ जमीन असल्याने दफन करणे ही मुश्किल होते. या सर्व व्यवहारिक कारणास्तव बुद्ध धर्मात एख मान्यतेच्या कारणास्तव अंत्यसंस्काराची एख विचित्र परंपरा आजही फॉलो केली जाते. खरंतर बुद्ध धर्मात मृत्यूनंतर शरिर हे रिकामे भांड असल्याचे मानले जाते. शवाचे लहान लहान तुकडे कापून पक्ष्यांना खायला दिल्यास भलं होत. अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रियेला बुद्ध धर्मात आत्म बलिदान असे म्हटले जाते.
