Home » नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात रोबोट, माणसांसाठी धोका… बिल गेट्स यांनी AI बद्दल दिला इशारा

नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात रोबोट, माणसांसाठी धोका… बिल गेट्स यांनी AI बद्दल दिला इशारा

by Team Gajawaja
0 comment
Artificial Intelligence
Share

जगभरात वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर वाढत चालला आहे. यामुळे आयुष्य ही सोप्पे होत चालले असले तरीही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी या संदर्भात एक इशारा दिला आहे. त्यांचे असे मानणे आहे की, केवळ फायद्याबद्दल बोलले जात आहे. मात्र यामुळे काही धोका सुद्धा आहे. सरकार वेगाने बनवत असलेल्या रोबोट्सला नियंत्रणात ठेवले पाहिजे. जगभरात वेगाने वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलीजेंस तंत्रज्ञानाचा विस्तार केला जात आहे. अशातच बिल गेट्स यांनी एआय बद्दल नक्की काय इशारा दिला आहे हे समजून घेऊयात.(Artificial Intelligence)

-शत्रू बनू शकते तंत्रज्ञान
बिल गेट्स यांनी असे म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधुनिक होत चालली आहे. ते प्रोत्साहन देत आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि लाफस्टाइल सारख्या सेक्टरमध्ये फार महत्वाची भुमिका बजावत आहे. मोठा बदलाव आणत आहे. ऐवढेच नव्हे तर यामुळे जगभरातील असमानता आणि गरिबी दूर होत आहे. बिल गेट्स यांनी असा धोका व्यक्त केला आहे की, जर आर्टिफिशियल इंटेलिजेंस चुकीच्या हातात गेल्यास तर ते एका शत्रू प्रमाणे काम करु शकते.

-नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात मशीन्स
त्यांचे असे म्हणणे आहे की, सुपर इंटेलिजेंसमुळे मशीन्स नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. त्या आपल्या मर्जी नुसार ठरवु शकतात की, व्यक्ती सुद्धा एक धोका आहे. अशा प्रकारे व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. एकेकाळी रोबोटची तारीफ केली जात होती. मात्र आता त्याच्यापासूनच्या धोक्याबद्दल ही बोलले जात आहे. नुकत्याच टर्मिनेटरचे डायरेक्टर जेम्स कॅमरुन यांनी याबद्दल एक मोठे विधान केले होते.

-रोबोट व्यक्तींना करतोय कंट्रोल
रोबोट्सच्या वाढत्या वापरामुळे जेम्स कॅमरुन यांनी असे म्हटले की, तो व्यक्तींना सुद्धा कंट्रोल करत आहे. त्यानंतर बिल गेट्स यांनी आपले मत मांडले. बिल गेट्स यांनी असे म्हटले की, अशी शक्यता आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. सुपर इंटेलिजेंट एआयला विकसित केले गेल्यास व्यक्तीच्या मेंदूच्या तुलनेत अधिक पटीने काम करेल. ते प्रत्येक अशी गोष्ट करु शकते जो व्यक्तीचा मेंदू करतो.(Artificial Intelligence)

-आणखी विकसित होईल एआय
ते असे म्हणतात की, सुपर इंटेलिजेंट एआय वेळेनुसार अधिक मजबूत होईल. जरा विचार करा दोन्ही एकत्रित आल्यास. खरंच आपल्याला एआयला अधिक मजबूत होण्यापासून थांबवले पाहिजे का? बिल गेट्स यांचे असे म्हणणे आहे की, जगातील एक असा नियम विकसित करण्याची गरज आहे जो याच्या धोक्यांपासून बचाव करु शकतो आणि याचे फायदे समोर आणेल. जेणेकरुन लोकांना याचे अधिक फायदे मिळतील.

हे देखील वाचा- भारतात प्रथम कंप्युटरच्या माध्यमातून काढल्या जाणाऱ्या तिकिटाबद्दल आठवतयं का?

-कुठे- कुठे वापर केला जातोय एआयचा?
सोप्प्या शब्दात बोलायचे झाल्यास एआय म्हणजेच आर्टिफिशिल इंटेलिजेंसचा अर्थ असा होतो की, विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे. याला कंप्युटर सायन्स मधील सर्वाधिक आधुनिक आणि विकसित रुप मानले गेले आहे. यामुळे मशीनला एखाद्या मेंदू प्रमाणे विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन ते अधिकाधिक व्यक्तींप्रमाणे विचार करेल. सध्या याचा वापर लॅग्वेज प्रोसेसिंग, विजन सिस्टिम, स्पीच रिकग्निशन आणि रोबोट तयार करण्यासाठी केला जात आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.