स्वप्न बघणे आणि स्वप्न पडणे या दोन्ही गोष्टी खुप वेगवेगळ्या आहेत. आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवयं जे मिळवायच आहे त्याची आपण ठरवून आणि आपल्याला हवी तशीच गोष्ट विचार करण म्हणजे आपण ते स्वप्न बघतोय. मात्र स्वप्न पडणे तस नसते. स्वप्न पडताना आपल्याला कोणत्याही गोष्टी कशाही दिसु शकतात. बऱ्याचदा आपल्याला पडलेली स्वप्न सकाळी आठवतही नाहीत. कारण आपण खुप गाढ झोपेत असताना ती पडलेली असतात. पण तुम्हाला माहित आहे का की स्वप्नांचे ही ठराविक असे अर्थ असतात. जर आपल्याला सतत एकच स्वप्न सारखे पडत असेल तर त्याचा ही काही अर्थ असतो. अशा मार्गाने स्वप्न आपल्याला काही गोष्टींची पूर्वसूचना देत असतात. आपल्यातील अनेकांना आपले मेलेले पूर्वज किंवा आपल्या जवळची मृत व्यक्ती स्वप्नात दिसते. काही लोक अशा स्वप्नांना घबरतात. मात्र मृत व्यक्ती स्वप्नात दिसण्यामागे ही काही कारण आहेत. आणि ती कोणती हेच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.(Dead People Dream Meaning)
सतत एखादे स्वप्न पडत असेल तर मग ते कोणतेही असो त्या प्रत्येक स्वप्नाचे स्वतःचे असे काही महत्त्व असते. प्रत्येक स्वप्न आपल्याला जीवनातील घडामोडींची जाणीव करून देते. आपल्यातील प्रत्येक जण मरणाला घाबरतो पण ज्याचा जन्म झाला आहे त्याचा अंत हा मृत्युनेच होणार हे ही तितकेच सत्य आहे. असे मानले जाते की जेव्हा एखादी मृत व्यक्ती स्वप्नात येते तेव्हा त्याला आपल्याला काही तरी सांगण्याची इच्छा असू शकते किंवा कदाचित तो काही आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींचे किंवा समस्येचे संकेत देते. जाणून घेऊयात या स्वप्नांचे नेमके काय अर्थ असू शकतात.
– तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आजारी असल्यामुळे मृत पावली असेल आणि ती जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचा जन्म आता चांगल्या ठिकाणी झालेला आहे.आणि तुम्ही त्यांचा विचार करुन चिंतित होऊ नये असा त्याचा अर्थ असतो.
– जर तुमच्या जवळची किंवा घरातली मृत व्यक्ती स्वप्नात तुमच्यावर रागावलेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे. कदाचित त्या व्यक्तीची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला तुमच्या माध्यमातून पूर्ण करायची असेल. किंवा हे स्वप्न असेही सूचित करते की, आपण काहीतरी चुकीचे करत आहात, ज्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर रागावले आहेत आणि ते आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत आहेत.
– जर मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात नग्न अवस्थेत किंवा अनवाणी आणि भूकेलेला दिसत असेल तर तो स्वप्नातून त्या गोष्टींची इच्छा प्रकट करत असतो. अशा वेळी कोणत्याही ब्राह्मणाला त्या गोष्टी दान कराव्यात.(Dead People Dream Meaning)
– जर मृत व्यक्ती तुम्हाला स्वप्नात खुप आनंदी दिसत असेल तर तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत समजले जातात. जर ती मृत व्यक्ती रडताना दिसली तर काळजी करुन घाबरू नका कारण ते स्वप्न ही शुभ संकेत समजले जातात.
– जर मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला काही तरी मोठे यश मिळणार आहे.
============================
(हे देखील वाचा: पायात किंवा हातात काळा धागा का बांधतात? जाणून घ्या काय असतात धागा बांधण्याचे नियम)
============================
– जर तुमच्या आयुष्यात काही कठीण काळ सुरु असेल आणि त्या दरम्यान एखादी मृत व्यक्ती वारंवार आपले नाव घेत असल्याचे स्वप्न तुम्हाला पडत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो आपल्याला काहीतरी अप्रिय गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. किंवा येणाऱ्या संकटांची चाहुल देत आहे.
– जर स्वप्नातील मृत व्यक्ती तुम्हाला सतत काही सांगत असेल मात्र तुम्हाला ते ऐकू येत नसेल तर याचा अर्थ असा होतो की लवकरच एखादी चांगली बातमी येत आहे.
आपल्यातील प्रत्येकाला झोपताना अनेकदा अनेक प्रकारचे स्वप्न पडतात. बऱ्याचदा आपण ही स्वप्ने विसरतो, त्यामुळे अशी अनेक स्वप्ने असतात जी आपल्या मनात अनेक प्रश्न सोडतात. मात्र स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाला काही ना काही अर्थ असतो.त्यामुळे अशा वेळी एखाद स्वप्न जर सतत तुम्हाला पडत असेल तर घाबरून न जाता त्यामागील अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा.
(डिस्क्लेमर: वरील माहिती खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. हा लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे.)