Home » मृत्यूनंतर पुन्हा आयुष्य मिळणार, अमेरिकन डॉक्टरांनी केले दावे

मृत्यूनंतर पुन्हा आयुष्य मिळणार, अमेरिकन डॉक्टरांनी केले दावे

by Team Gajawaja
0 comment
Stay alive after death
Share

मृत्यू हा आयुष्याचा शेवट मानला जातो. हे सत्य आहेच. जेव्हापासून पृथ्वीची निर्मिती झाली आणि त्यावर जनजीवन वसले तेव्हापासूनच मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती आपल्यामधून निघून गेल्याचे बोलले जाते. जो मृत्यू होतो त्याच्यासाठी जग संपते. तो संसारातून मुक्त होतो. सर्व नाती तेथेच संपतात. मात्र आता असे होणार नाही. कारण डॉक्टरांनी आता याबद्दलचे काही नवे दावे केले आहे. त्यांनी मृत्यूनंतर ही आयुष्य मिळू शकते असा दावा केला आहे. डॉक्टरांनी मृत व्यक्तीला पुन्हा जीवंत करण्याचा अनोखा दावा केला आहे.(Stay alive after death)

एका अमेरिकन डॉक्टरने हा प्रयोग केल्यानंतर असे म्हटले की, मृत झालेल्या व्यक्तीला जीवंत करता येऊ शकते. पण कसे? यावर डॉक्टरने असे म्हटले की, व्यक्तीच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणावेळी एका विधीचा वापर करुन मृत व्यक्तीला जीवंत करता येऊ शकते.

हैराण करणाऱ्या नव्या विधी बद्दल अभ्यास आणि दावा करणारे डॉक्टरांचे नाव डॉ. जाचरी पॅलेस असे आहे. जे न्यू यॉर्क मधील रिवरडेलमध्ये हिब्रु मध्ये मेडिकल डायरेक्टर आहेत. त्यांचे असे मानणे आहे की, आयुष्याच्या अखेरच्या क्षणावेळी विशेष सावधगिरी बाळगत करण्यात आलेल्या ऑपरेशननंतर मृत व्यक्तीला जीवंत केले जाऊ शकते.

डॉ. पॅलेस यांच्या मते जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यूच्या दारात उभा असतो तेव्हा त्याला दोन टप्प्यांमधून जावे लागते. सर्वात प्रथम हृदयाचे धडकणे बंद होते. शरिरातून रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यानंतर सहा मिनिटानंतर व्यक्ती जैविक मृत्यूची अवस्था मिळवतो. डॉक्टर असे म्हणतात की, असे तेव्हाच होते जेव्हा मस्तिष्कच्या कोशिका मृत पावतात.

तसेच मृत्यूपूर्वी सहा मिनिटांचा जो कालावधी असतो तेव्हा व्यक्तीला पुन्हा जीवंत केले जाऊ शकते. या दरम्यान डॉक्टर ऑपरेशनच्या माध्यमातून व्यक्तीला पुन्हा जीवंत करता येऊ शकते. डॉक्टरांच्या मते मृत्यूनंतर एका व्यक्तीचे हृदय काम करणे बंद करते. मात्र त्याची चेतना जागृत अवस्थेत असते. एका अभ्यासातून असे कळते की, लोक मृत्यूनंतर तीन मिनिट जागरुकतेचा अनुभव करत राहतात. पॅलेस यांनी खुलासा केला आहे की, या दरम्यान आयुष्य पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.(Stay alive after death)

हे देखील वाचा- जेव्हा चीनने खुलेपणाने केली होती चिमण्यांची हत्या…

दरम्यान, हे पहिल्यांदा असे केले जात नाहीय. पण डॉक्टर आणि रुग्णांना समान रुपात त्या गोष्टींबद्दल सांगितले जाते की, त्यांना मृत्यूवेळी काय अनुभव येतात. मृत्यूनंतर आणि त्यानंतर अभ्यास करणाऱ्या एका डॉक्टरांनी असा खुलासा केला आहे की, जेव्हा व्यक्ती मृत्यू पावतो तेव्हा वास्तवात काय होते आणि त्याला कसे वाटत असते. याची विस्तृत कथा लवकरच जगासमोर आणली जाणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.