जर तुम्हाला लग्न करायचे असेल आणि तुमच्याकडे त्यासाठी पैसे नाहीत तर चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कोणत्याही टेंन्शनशिवाय आता लग्न करु शकता ते सुद्धा अगदी धुमधडाक्यात. खरंतर लग्नासाठी बहुतांश लोक कर्ज ही घेतात आणि त्यानंतर ईएमआय प्रत्येक महिन्याला भरतात. आता पर्यंत ऑनलाईन शॉपिंग, घर सारख्या गोष्टींसाठी कर्ज घेतले जाते. यासाठी सुद्धा ईएमआय हा जसा व्याजदर असेल त्यानुसार द्यावा लागतो. (Marry Now Pay Later )
काही वेळेस आता घ्या आणि नंतर पैसे द्या असा सुद्धा पर्याय दिला जातो. हाच पर्याय लग्नासाठी सुद्धा ट्रेंन्ड बनला आहे. त्यामुळे Marry Now Pay Later ची सुविधा विवाहित इच्छुक जोडप्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मनी कंट्रोलच्या बातमीनुसार फिनटेक कंपनी Sankash ने या सुविधेसाठी रेडिनस हॉटेल सोबत करार केला आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, येणाऱ्या काळात ही सुविधा संपूर्ण देशात उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. या सुविधेत वेडिंग स्पेस रेडिसन हॉटेलमध्ये मिळतो. Sankash चे सीईओ आणि को-फाउंडर आकाश दहिया यांच्या मते आता पर्यंत त्यांच्याकडे फ्लाई नाऊ पे लेटर होते. त्यानंतर सेल नाउ पे लेटर आले.
रेडिसन सोबत मिळून त्यांनी स्टे नाउ पे लेटरची सुविधा सुरु केली. त्यानंतर त्यांना लग्नासंदर्भातील हा विचार आला. खरंतर रेडियनचा २० टक्के रेवेन्यू फूड अॅन्ड ब्रेवरेजमधून येतो. यामध्ये मॅरेज मार्केटची मोठी भुमिका आहे. कंपनीने दिल्ली-एनसीआर मध्ये या प्लॅनची सुरुवात केली होती. सध्या ही सुविधा राजस्थान आणि मध्य प्रदेशात ही उपलब्ध आहे.
कंपनीच्या मते ही योजना लवकरच संपूर्ण देशआत सुरु करण्याचा प्लॅन केला जात आहे. या वर्षाच्या अखेर पर्यंत ही सुविधा रेडिसनच्या सर्व हॉटेलमध्ये मिळण्यास सुरुवात होईल. कंपनीच्या मते, या योजनेअंतर्गत व्यक्ती कमीत कमी २५ लाखांपर्यंतचा फंड घेऊ शकतो. तो फंड सहा ते १२ महिन्यात भरण्याचा कालावधी दिला जातो.(Marry Now Pay Later)
हे देखील वाचा- ड्यु डेट नंतर सुद्धा पेनल्टीशिवाय करता येईल क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट
फंडासाठी चार ते सहा तासांमध्ये अप्रुवल मिळते. त्यानंतर कंपनी कस्टमरच्या नावाने पैसे रेडिसनला पेमेंट करते. सहा महिन्यासाठी फंडावर कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन केले जात नाही. कस्टमरने जर १२ महिन्यात रिपेमेंटचा कालावधी निवडला तर त्याला प्रत्येक महिन्याला एक टक्के व्याजाने पैसे भरावे लागतात.