Home » पुतिन यांच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

पुतिन यांच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

by Team Gajawaja
0 comment
Vladimir Putin Life
Share

युक्रेन सोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. मुलांच्या अधिकारांच्या प्रकरणी वर्ल्ड कोर्टाने पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने या बद्दल माहिती देत असे सांगितली की, कोर्टाने युक्रेनी मुलांना बेकायदेशीर पद्धतीने देशातून काढल्या प्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे. (Putin Warrant)

अशाप्रकारे आरोपांवरुन रशियाच्या बाल अधिकार आयुक्त मारिया लावोवा-बेलोवाच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तर दुसऱ्या बाजूला मॉस्को नेहमीच या आरोपाचे खंडन करतो. मात्र त्याने अटक वॉरंटवर लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोर्टाने युक्रेनमध्ये युद्धाच्या अपराधांसाठी सुद्धा पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, रशियाने युद्ध अपराधांचे आरोप फेटाळून लावले आहेत. वॉरंटवर युक्रेन कडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. युद्धग्रस्त देशाने असे म्हटले की, ही केवळ सुरुवात आहे. वॉरंटनंतर पुतिन यांच्यासमोर आणखी काही आव्हान येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयसीसीने काय म्हटले?
आयसीसीने असे म्हटले की, त्यांच्याकडे हे मानण्यासाठीचे योग्य पुरावे आहेत की, पुतिन यांनी केवळ हे अपराधच नव्हे तर दुसऱ्यांची सुद्धा मदत केली. कोर्टाने असे म्हटले की, पुतिन यांनी मुलांचे अपहरण रोखण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर केलेला नाही. त्यांनी मुलांना डिपोर्ट करणारे अन्य लोकांना थांबवले नाही, कारवाई केली नाही.

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर लगेच आयसीसी प्रॉसिक्युटर करीम खान यांनी युक्रेन मध्ये संभावित युद्ध अपराध, मानवतेच्या विरोधातील अपराध आणि नरसंहारचा तपास सुरु केला होता. दोन्ही देशांमध्ये अद्याप युद्ध सुरुच आहे.

मीडिया रिपोर्ट्सनसार, पुतिन यांना अवैध रुपात लोकांना खासकरुन मुलांना देशातून काढले आणि युक्रेनच्या ताब्यातील क्षेत्रातून रशियन फेडरेशन मध्ये अवैध रुपात ट्रांन्सफर करण्यासाठी जबाबदार मानले आहे. आयसीसीने असे म्हटले की, हा गुन्हा २४ फेब्रुवारी २०२२ पासूनचा आहे. म्हणजेच तेव्हापासूनचा जेव्हा हे युद्ध सुरु झाले. (Putin Warrant)

युद्ध अपराध म्हणजे काय?
-युद्धासाठीचे काही नियम असतात. या नियमांना जिनेवा कन्वेंशन, हेग कन्वेंक्शन आणि अन्य आंतरराष्ट्रीय कायदे आणि कराराअंतर्गत तयार करण्यात आले आहे.
-युद्ध अपराध युद्ध नियमांचे उल्लंघन आहे. त्यानुसार मुद्दाम नागरिकांना मारणे अथवा यातना देणे, बांधून ठेवणे, नागरिक संपत्तीला अनावश्यक रुपात नष्ट करणे, युद्धा दरम्यान हिंसा, लूटपाट, सैन्यात मुलांना भरती, नरसंहार अशा गुन्हांचा समावेश आहे.
-युएनच्या नुसार, सर्वात प्रथम २०व्या शतकाच्या सुरुवातीला युद्धाचे नियम तयार करण्यात आले होते. या नियमांना हेग कन्वेंक्शन १८९९ आणि १९०७ आणि १८६४ ते १९४९ च्या दरम्यान जिनेवा कन्वेंशन अंतर्गत झालेल्या चार कराराअंतर्गत ठरवण्यात आले होते.
-हेग कन्वेंक्शन जेथे युद्धाच्या वेळी काही घातक हत्यारे जसे की, अँन्टी पर्सनल लँन्डमाइंस आणि केमिकल अथवा बॉयोलॉजिकल शस्रांच्या वापरावर बंदी घालणे. तर जिनेवा कन्वेंशन युद्धाच्या दरम्यान करण्यात येणारे वॉर क्राइमचे नियम निर्धारित केले जातात.

हे देखील वाचा- जापान आणि दक्षिण कोरियातील दुश्मनी दूर होणार का? ‘या’ मुद्द्यांवरुन सुरु आहे वाद

रशियाच्या दौऱ्यावर जाणार चीनचे राष्ट्राध्यक्ष
दरम्यान, ही बातमी अशावेळी समोर आली आहे की जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तीन दिवस म्हणजेच २० मार्चला रशियाच्या दोन दिवस दौऱ्यावर येणार आहेत. याचवेळी ते पुतिन सोबत युक्रेन सोबत युद्ध संपण्याबद्दल चर्चा करु शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.