वडोदऱ्याच्या कंज्युमर फोरमने मेडिकल इंन्शुरन्स संबंधित एक मोठा निर्णय सुनावला आहे. फोरमच्या मते, मेडिकल इंन्शुरन्सचा क्लेम करण्यासाठी गरजेचे नाही की, एखादा व्यक्ती रुग्णालयात भर्ती झालेला असेल अथवा त्याला २४ तासात भर्ती केले पाहिजे. कंज्युमर फोरमकडून मेडिकल इंन्शुरन्स कंपनीला रुग्णालयाला पेमेंट करण्याचे आदेश दिले आहेत. (Health Insurance)
खरंतर वडोदरा मधील रमेशचंद्र जोशी यांनी २०१७ मध्ये कंज्युमर फोरममध्ये नॅशनल इंन्शुरन्स कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. जोशी यांचा असा दावा होता की, त्यांच्या पत्नीचे २०१६ मध्ये डर्मेटोमायोसाइटिस झाले होते. त्यांना अहमदाबाद मधील लाइफकेअर इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये भर्ती केले. उपचाराच्या दुसऱ्या दिवशी पत्नीला डिस्चार्ज दिला गेला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या मते, त्यानंतर जोशी यांनी कंपनीला ४४४६८ रुपयांच्या बिलाचे पेमेंट मागितले. मात्र इंन्शुरन्स कंपनीने जोशी यांचा दावा फेटाळून लावला. याच्याच विरोधात जोशी यांनी कंज्युमर फोरममध्ये तक्रार दाखल केली होती. इंन्शुरन्स कंपनीने क्लॉज ३.१५ चा हवाला देत जोशी यांचा अर्ज फेटाळला होता. कंपनीने असा तर्क लावला होता ही, रुग्णाला सातत्याने २४ तासापर्यंत भर्ती करण्यात आलेले नव्हते.
हे देखील वाचा- WhatsApp चॅट करण्याप्रकरणी महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक, सर्वेतून खुलासा
त्यानंतर जोशी यंनी मेडिकल इंन्शुरन्स कंपनीच्या विरोधात कंज्युमर फोरमकडे धाव घेण्याचा विचार केला. त्यांनी फोरमच्या समोर सुद्धा सर्व कागदपत्र सादर केले. त्यांनी दावा केला की, त्यांच्या पत्नीला २४ नोव्हेंबरला संध्याकाळी ५.३८ वाजता भर्ती केले होते. जेव्हा २५ नोव्हेंबर २०१६ संध्याखाली ६.३० वाजता तिला डिस्चार्ज दिला गेला. तर फोरम यांनी असे म्हटले की, भले हे मान्य केले जाईल की रुग्णाला २४ तासापेक्षा कमी वेळासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. तरीही तो मेडिकल इंन्शुरन्सच्या क्लेमसाठी हकदार आहे. आज आधुनिक युगात उपचारासाठी अन्य पद्धती आणि औषध विकसित झाली आहेत. अशातच डॉक्टर त्यानुसार उपचार करतात. दरम्यान, कंज्युमर फोरमने इंन्शुरन्स कंपनीवर याचिकाकर्त्याला मानसिक त्रास दिल्याने ३ हजार रुपये आणि खटल्यासाठी २ हजार रुपये देण्याचे आदेश सुद्धा जारी केले होते. (Health Insurance)
कोणते-कोणते असतात हेल्थ इंन्शुरन्स?
–कॅशलेस
या क्लेममध्ये बीमाकर्त्याला सर्व मेडिकल बिलांचे पेमेंट थेट रुग्णालयासोबत करता येते. दरम्यान, याच्या फायद्यासाठी ज्या व्यक्तीने इंन्शुरन्स क्लेम केला आहे त्याला रुग्णालयात भर्ती असणे आवश्यक आहे.
-रिम्बर्समेंट
यामध्ये पॉलिसीधारकाला डिस्चार्ज देण्याच्या वेळी रुग्णालयात भर्ती झाल्याचा संपूर्ण खर्च मिळतो. त्यानंतर रिम्बर्समेंटसाठी बीमा कंपनीला सांगितले जाते.