इज्राइल (Israel) मधील ब्लॅक स्नॅक ड्रोन स्क्वाड्रनची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. हे स्क्वाड्रन इज्राइल डिफेंस फोर्सेजच्या अंतर्गत मिलिट्री ऑपरेशन करतात. हे युनिट एलबिट हेमीज ४५० ड्रोनचे संचालन करतात. त्याचसोबत वेस्ट बँक, गाजा आणि लेबनान वर दहशतवादीविरोधी अभियानात हवाई मदत करतात. संधी मिळताच हे ड्रोन गुप्त माहिती जमा करण्याव्यतिरिक्त दुश्मनांवर हल्ला करण्याचे ही काम करतात. ब्लॅक स्नॅक ड्रोन स्क्वाड्रनची ऐवढी दहशत आहे की, इज्राइलचे दुश्मन ही त्यांचे नाव ऐकून कापतात.
ब्लॅक स्नॅक ड्रोन स्क्वाड्रन मध्य इज्राइलच्या पामाचिप एअर बेसवर तैनात आहेत. इज्राइली वायु सैन्याचे एकूण ड्रोन उडवण्यासाठी या बेसची हिस्सेदारी ८० टक्के आहे. नुकत्याच या युनिटसाठी मीडियाला एक्सेस दिला गेला. मात्र ज्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले त्यांचे नाव गुप्त ठेवावे असे सांगितले गेले. बेसच्या एका डेप्युटी कमांडरने त्याचे नाव न सांगत असे म्हटले की, इग्राइली सैन ड्रोनवर खुप विश्वास ठेवते आणि बहुतांश कामात त्याचा वापर केला जातो. ड्रोनच्या माध्यमातून इज्राइल गुप्त मिशन्स पूर्ण केले जातात. येथून उडवण्यात येणारे ड्रोन संपूर्ण वेस्ट बँक, सीरिया आणि लेबनानच्या सीमेवर लक्ष ठेवतात. आकाशातून दुश्मनांवर या ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाते.
आयडीएफ कमांडरने असे सांगितले की, आता अधिकाधिक मिशनमध्ये लढाऊ विमानांऐवजी ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. इज्राइली वायुसेना समुद्रातील मिशनांच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोनचा वापर करते. अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, आलाकमान येथून मिशन मिळतात आणि त्यापूर्वी निश्चित क्षेत्रात काही मिनिटांत ड्रोन तैनात केले जातात. यामध्ये काही वेळेस सशस्र युएवीचा सुद्धा समावेश आहे, ज्यांना एखाद्या लक्ष्यावर हल्ला करण्याचे मिशन दिले गेले आहे. (Israel)
हे देखील वाचा- बनावट नोटांमुळे अर्थव्यवस्थेला फटका, कुठे केली जाते सर्वाधिक छपाई?
एलबिट हेमीज ४५० एक इज्राइली मीडिय कॅटेगरीतील मल्टी पेलोड अनमॅन्ड एरियल व्हेकल आहे. याला दीर्घकालीन मिशनसाठी तयार करण्यात आले आहे. हे ड्रोन टोही, लक्ष ठेवणे, कम्युनिकेशन आणि हल्ल्यासारख्या मिशन पूर्ण करतात. एलबिट हेमी ४५० ड्रोन एकावेळी २० तास उडू शकतात. या ड्रोनच्या पेलोडमध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड सेंसर, संचार आणि इलेक्ट्रिक इंटेलिजेंस, सिंथेटिक-एपर्चर रडार/ग्राउंड-मुविंग टारगेट इंडिकेशन, इलेक्ट्रॉनिक वारफेयर आणि हाइपरस्पेक्ट्रल सेंसरचा समावेश आहे.