अस म्हणतात की, कलयुगात फक्त हनुमान देव जिवंत आहेत. जे नेहमी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्यावर आपली कृपा सदैव ठेवतात. अस ही म्हटले जाते, जिथे जिथे रामकथा होते तिथे तिथे हनुमान देवाचा वास असतो. ते कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तिथे उपस्थित असतात. ‘जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा’…जर तुम्ही हनुमान चालीसा बोलत किंवा ऐकत असाल तर तुम्हाला हा दोहा नक्की माहित असतील. याचा अर्थ असा की, जो कोणी हनुमान चालीसा वाचेल त्याला नक्की यश मिळणार. (Hanuman Chalisa)
हनुमान चालीसा वाचण्याचे अगणित फायदे आहेत. पण जेव्हा ते वाचने शक्य नसते तेव्हा तुम्ही ते ऐकू ही शकतात. हनुमान चालिसाने आपल्यावर हनुमनाची सदैव कृपा राहते म्हणूनच रोज लाखो करोडो लोक हनुमान चालीसा ऐकतात आणि हे आम्ही म्हणत नाही आहोत तर ते सिद्ध झालय. गुलशन कुमार आणि गायक हरिहरन यांच्या हनुमान चालीसा गाण्याने यूट्यूबवर मोठा विक्रम केला आहे. ‘श्री हनुमान चालीसा’ हे युट्यूबवर सर्वाधिक व्युज मिळवणारे भारतातील पहिले गाणे ठरले आहे. यूट्यूबवर आतापर्यंत या गाण्याला तब्बल 3 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.

मे २०११ रोजी गुलशन कुमार आणि गायक हरिहरन यांच्या हनुमान चालीसा गाण्याला यूट्यूब वर अपलोड करण्यात आले होते. त्या दिवसापासून आतापर्यंत या व्हिडिओला 3 अब्ज व्ह्यूज बरोबर तब्बल १२ लाख लाइक्स आलेले आहेत. ९ मिनिटे ४१ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये संपूर्ण हनुमान चालीसा आहे. 1983 मध्ये गुलशन कुमार यांनी टी-सीरिज कंपनी सुरू केली होती आणि आज या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू कोट्यवधीमध्ये आहे. हा व्हिडिओ टी सीरीजच्या भक्ति सागर या यूट्यूब चॅनेल वर अपलोड करण्यात आले असून या चॅनेलचे ५८.४ लाख सब्सक्राइबर आहेत. (Hanuman Chalisa)
या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल टी-सीरिजने गुरुवारी (9 मार्च 2023) लोकांचे आभार मानत ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिल आहे, “हनुमान चालिसाने 3 अब्ज लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केल्यामुळे उत्सव सुरू झाला आहे. यूट्यूबवर 3 अब्जपेक्षा जास्त वेळा पाहिला जाणारा पहिला भारतीय व्हिडिओ तयार केल्याबद्दल धन्यवाद.”
==========
ही वाचा: PATHAAN OTT RELEASE DATE: ‘या’ दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या सर्व माहिती
==========
गुलशन कुमार हे टी-सीरिज कंपनीचे संस्थापक होते. त्यांचे पूर्ण नाव गुलशन कुमार दुआ होते. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गुलशन कुमार यांनी अतिशय कमी वेळात खुप प्रगती केली. त्यांचे वडील दिल्लीच्या दरियागंज मार्केटमध्ये फळांचा रस विक्रेते होते. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी एक दुकान हाती घेतले आणि तेथे स्वस्त ऑडिओ कॅसेट विकायला सुरुवात केली होती .१२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील अंधेरी परिसरातील शिवमंदिरातून बाहेर पडताना गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांच्याकडे अंडरवर्ल्डने खंडणी मागितली होती, जी त्यांनी देण्यास नकार दिला होता आणि याच कारणामुळे डॉन अबू सालेमने गुलशन कुमार यांची हत्या केल्याचे बोलले जाते.