ऑस्कर सोहळा सर्वार्थांनं वेगळा ठरला. भारताला या सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाले. ‘नाटू नाटू’ गाण्यावर अख्ख्या जगानं ताल धरला. आपल्या दिपिका पादुकोणच्या रॅमनं सर्वांची मनं जिंकली. ऑस्करच्या या सोहळ्यात आणखी एका महिलेनं उपस्थितांची मनं जिंकली आहेत. ती म्हणजे गायिका, अभिनेत्री असलेली रिहाना (Rihanna). रिहानानंही ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत होती. सोबतच तिचा परफॉर्मन्सही सादर होणार होता. याच परफॉर्मर्सच्या वेळी गरोदर असलेल्या रिहानाला बघून अनेकांना आश्चर्य वाटलं. ऑस्करच्या स्टेजवर परफॉर्मन्स देताना काळा ड्रेस घातलेल्या रिहानानं आपलं गरोदरपण लपवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. उलट तिच्या या बिंधास्तपणानं उपस्थितांची मनं जिंकली. रिहानाने (Rihanna) 95 व्या अकादमी पुरस्कारांच्या रेड कार्पेटवर तिच्या बेबी बंपसह परफॉर्म करून सर्व प्रसिद्धी मिळवली. ती ऑस्कर जिंकू शकली नाही, पण तिने तिच्या चाहत्यांची मनं नक्कीच जिंकली.

ऑस्कर सोहळ्यात आलेली गायिका रिहाना (Rihanna) तिच्या एन्ट्रीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकत होती. गर्भवती असलेल्या रिहानाने (Rihanna) आपल्या दमदार परफॉर्मन्सने चाहत्यांची आणि उपस्थित लोकांची मने जिंकली. रिहानाने हिऱ्यांनी जोडलेला सुंदर काळा पोशाख घातला होता. या पोशाखात रिहानाचं (Rihanna) सौदर्य अधिक खुललं होतं. रिहानाने मार्वलच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ या चित्रपटातील तिचे ‘लिफ्ट मी अप’ हे गाणे सादर केले. ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हरचे ‘लिफ्ट मी अप’ हे गाणे ऑस्कर 2023 साठी सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत नामांकन झाले होते. रिहानाला (Rihanna) हा पुरस्कार मिळाला नाही. पण तिच्या जबरदस्त परफॉर्मन्सने त्याची कसर भरुन काढली. रिहाना आणि रॉकी हे लवकरच आई-बाबा होणार असून त्यांचा पहिलं बाळ काही दिवसातच जन्माला येणार आहे. अशा अवस्थेत रिहानानं ऑस्करमध्ये सादर केलेल्या गाण्यानं सर्वांनीच तिचं कौतुक केलं आहे.
रॉबिन ही एक बार्बाडियन गायिका, अभिनेत्री आहे. त्यासोबतच रिहानानं यशस्वी व्यावसायिका म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. 2005 पासून रिहानानं गायिका म्हणून ओळख मिळवली. तिच्या “अम्ब्रेला” या गाण्यानं तिला पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळवून दिला. तिच्या संगीत कारकिर्दीत, रिहानाने (Rihanna) ड्रेक, एमिनेम, जे-झेड, कान्ये वेस्ट, ने-यो आणि शकीरा यांसारख्या अनेक मान्यवर कलाकारांसोबत काम केले आहे. जगभरात 250 दशलक्ष पेक्षा जास्त रेकॉर्डच्या विक्रीसह, रिहाना ही आजवरची दुसरी सर्वाधिक यशस्वी महिला संगीत कलाकार आहे. नऊ ग्रॅमी पुरस्कार, 13 अमेरिकन संगीत पुरस्कार, 12 बिलबोर्ड संगीत पुरस्कार, सहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, आणि अकादमी पुरस्कार नामांकन नावावर असलेल्या रिहानानं (Rihanna) कायम तरुणांच्या मनावर राज्य केलं आहे. टाइमने 2012 आणि 2018 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून रिहानाचा गौरव केला आहे. फोर्ब्सने 2012 आणि 2014 मध्ये तिला टॉप टेन सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये स्थान दिले आहे. आतापर्यत ती सर्वात श्रीमंत महिला संगीतकार म्हणून ओळखली जाते.
======
हे देखील वाचा : RRR मधील Natu Natu गाण्याला मिळाला ऑस्कर
======
संगीताव्यतिरिक्त रिहानाचे नाव फॅशन उद्योगात मानानं घेतले जाते. नानफा संस्था क्लारा लिओनेल फाऊंडेशन, कॉस्मेटिक्स ब्रँड फेंटी ब्युटी या फॅशन हाऊसची संस्थापक आहे. बॅटलशिप, होम, व्हॅलेरियन अँड द सिटी ऑफ अ थाउजंड प्लॅनेट या चित्रपटात भूमिका करुन रिहानानं (Rihanna) अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. गाणं, अभिनय आणि व्यवसाय या तिनही क्षेत्रात रिहानाचं नाव अग्रक्रमावर आहे. बालपणात वाढलेल्या रिहानाचं (Rihanna) लहानपण अतिशय कष्टात गेलं आहे. आरोग्य समस्यांचाही तिला सामना करावा लागला. शाळेतच असतांना रिहानाने तिच्या दोन वर्गमित्रांसह गाण्याचा एक ग्रुप तयार केला होता. लहानपणापासून जपलेला हा छंद आता रिहानाला ऑस्करच्या स्टेजपर्यंत घेऊन गेला आहे. तिला ऑस्करनं हुलकावणी दिली असली तरी तिच्या गाण्यानं आणि धिटाईनं तिच्या चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत.
सई बने