लॉन्ग डिस्टेंन्स रिलेशनशिप म्हणजे दूरवर राहत असून ही नात्यात असणे. सध्याच्या दिवसात कपल्स मध्ये असे नाते अगदी सहज पहायला मिळते. मात्र असे नाते टिकवून ठेवणे फार कठीण असते. लहानसहान गोष्टींवरुन या नात्यात भांडण झाल्यास तर नाते तुटण्याची शक्यता फार अधिक असते. एकमेकांवर खुप प्रेम करतो हे खरं असलं तरीही वेळ भासल्यास एकमेकांची मदत मिळाली नाही तर गैरसमज निर्माण होतात. यामध्ये संशयात्मक वृत्ती मागे लागू शकते. अशात लॉन्ग डिस्टेंन्स रिलेशनशिपमध्ये (Long Distance Relationship) तुम्ही राहत असाल तर पुढील काही गोष्टींपासून दूरच राहिलेले बरे.
-वेळोवेळी संशय घेण्यापासून दूर रहा
लॉन्ग डिस्टेंन्स रिलेशनशिपमध्ये संशय हा एक तुमच्यामधील अविश्वासाचा फॅक्टर ठरु शकतो. यामुळे नात्यातील खुप काही गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळे पार्टनरवर वेळोवेळी संशय घेण्यापासून दूर रहा. जर काही तसे असेल तर एकमेकांशी बोलून तुमचे प्रॉब्लेम्स सोडवा.
-असुरक्षिततेची भावना
जर तुमच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास तर नाते तुमचे तुटू शकते. तुम्हाला वेळोवेळी वाटत राहिल की, तुमचा पार्टनर तुमच्याबद्दल अधिक गंभीर नाही अथवा त्याचे दुसरीकडे अफेअर तर सुरु नाही ना? या भीतीला मनातून घालवा. असा विचार केल्यास तर प्रत्येक वेळी नकारात्मक पद्धतीने तुम्ही पार्टनर सोबत वागाल.
-कधीच खोटं बोलू नका
जर तुम्ही लॉन्ग डिस्टेंन्स रिलेशनशिपमध्ये आहात तर कधी ही कोणत्याही गोष्टीवरुन खोटं बोलू नका, कारण एक खोटं बोलल्यानंतर तुम्हाला ते लपवण्यासाठी आणखी खोटं बोलावे लागेल. अशातच पार्टनरच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो.
-अधिक अपेक्षा करु नका
काही लोक आपले लॉन्ग डिस्टेंन्स रिलेशनशिपला निगेटिव्ह पद्धतीने घेतात. त्यांना प्रत्येक वेळी पार्टनरची तक्रार करायची असते. ऐवढेच नव्हे तर दोघांमधील दूराव्यामुळे चिंतेत राहतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे असे रिलेशनशिप दीर्घकाळ टिकवून ठेवायचे असेल तर समोरच्या व्यक्तीकडून अधिक अपेक्षा करु नका. (Long Distance Relationship)
हे देखील वाचा- लिव्ह-इन-रिलेशनशिप की लग्न? तुमच्या एका निर्णयाने बदलेल आयुष्य
-तुलना करु नका
कधीच कोणत्याही नात्यात एकमेकांची तुलना करु नये, जर अन्य कपल प्रत्येक दिवशी एकमेकांसोबत दिसतात अथवा भेटतात तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपची तुलना आपल्या नात्यासोबत करु नका. असे केल्याने तुम्हीच दुखावले जाता. निराश होता. यामुळे तुमच्या नात्यात काही वेळेस वाद ही निर्माण होऊ शकतात.