Home » रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

0 comment
Immunity Booster Food
Share

तब्बल दोन-अडीच वर्ष सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या नुसत्या आठवणीने सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. त्या दिवसात आपल आयुष्य जणू पोज झाल होत अस म्हंटल तर वावग ठरणार नाही. या महामारीने अनेकांचे आयुष्य कायमचे संपवून टाकले तर अनेक कोरोना होऊन गेलेल्यांना आज ही काही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतोय.जसे केस गळणे, लगेच थकवा येणे, अंग दुखणे अशा अनेक तक्रारी आजही ऐकायला मिळतात.कोणत्याही व्यक्तीला आजारी पडायला आवडत नाही पण दुर्भाग्य आहे की आपण आजाराशी  लढणाची प्रतिक्षाशक्ति अशी एक दिवसात किंवा आपण पडलो की लगेच निर्माण नाही करू शकत तर त्यासाठी आपल्याला नेहमीच काळजी घेतली पाहीजे. कोरोना महामारीने आपल्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजावली आणि ती हीच की कोणत्याही आजाराचा, शारीरिक व्याधींचा प्रभाव कमी किंवा नाहीसा करेला असेल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी स्ट्रॉन्ग असणे खुप महत्वाचे आहे. अगदी लहान मुलांची सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवली गेली पाहिजे.आणि इम्युनिटी स्ट्रॉन्ग करण्यासाठी तुम्हाला सतत औषध घेण्याची गरज नाहीये तर आपल्या रोजच्या आहारात काही ठराविक गोष्टींचे सेवन केल्यानेही तुमची रोगप्रतिकार शक्ती  वाढण्यास मदत होईल.आश्चर्य वाटल ना पण हे खर आहे.आणि आपण आजच्या लेखात याच महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. (Immunity Booster Food)


चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत ज्याचे सेवन तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतील. 


– पालक : 

पालकसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी कमी असतात आणि कोल्ड-बस्टिंग झिंक, अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन ए ने भरपूर असते. पालक डोळ्यांच्या तक्रारी कमी करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, मुरुमांवर उपचार करते, हाडे मजबूत करते, पचनास मदत करते, हृदयास मदत करते आणि वजन कमी करण्यास सुद्धा पालक उपयुक्त आहे. 


– गाजर :

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजराचे सेवन हा एक उत्तम पर्याय आहे. गाजरामध्ये आजाराशी लढण्यासाठी उपयुक्त असणारे व्हिटॅमिन त्याबरोबरच  व्हिटॅमिन ए  आणि कैरोटीनॉयड ची भरपूर मात्रा असते. व्हिटॅमिन ए आपल्या आतड्यांमधील ऊती आणि आपली श्वसन प्रणाली, पोट आणि तोंड मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

Immunity Booster Food
Immunity Booster Food

– अंड :

प्रोटीन आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी नेहमी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. आजाराशी लढण्यासाठी अंड हे उत्कृष्ट स्त्रोत आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि व्हिटामिन ए आहे जे तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर अंड हे कोलीनचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. एका अंड्यात किमान १०० मिलिग्राम एवढे कोलीन असते जे तुमच्या मेंदूतील पडद्याला मजबूत करण्यसाठी मदत करते.


– आंबट फळे :

लिंबू, संत्री, आवळा, द्राक्ष यातले तुम्ही तुमचे आवडते कोणतेही फळ निवडू शकता. हे सर्व फळे कमी कैलरीज चे असतात आणि या सर्वांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात. यामध्ये आवश्यक ते खजिने आणि व्हिटामिन आढळतात.(Immunity Booster Food)

– लसूण :

लसुन प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये लसूणचा वापर करण्यात येतो. लसूण मध्ये अॅलिसिन आणि सल्फर हे मोठ्या प्रमाणावर आढळते जे तुमचे पाचन तंत्र सुधारते. त्यामुळे डॉक्टर ही बऱ्याचदा रोज किमान लसणाची एक कळी सेवन करण्याचा सल्ला देतात.  

Immunity Booster Food
Immunity Booster Food


– बीट : 

बीट व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहे. जे आतड्याच्या चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतात. यात कॅलरी आणि चरबी कमी असतेत्याबरोबरच ते  रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते. बीट आपले पाचन तंत्र सुधारते त्याबरोबर बीट वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. 

– टोमॅटो : 

स्वयंपाकामध्ये असा एक ही पदार्थ नाही ज्यात टोमॅटोचा वापर केला जात नाही. टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते जे  रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते, हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी करते,रक्तदाब नियंत्रित करते तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. 


============
हे ही वाचा: सामान्य खोकला आणि टीबी खोकला यामधील फरक जाणून घ्या !
============


वरील सर्व पदार्थ तुम्ही लहन मुलांना सुद्धा खायला देऊ शकता. पण लक्षात ठेवा कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाणे हे आपल्यासाठी चांगले नाही, जरी ते निरोगी असले तरीही. या पदार्थाचे सेवन योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे.


(Disclaimer : वरील माहिती खरी असण्याचा आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. हा लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे.)  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.