Home » UAN क्रमांकाशिवाय तपासता येते PF खात्यातील रक्कम

UAN क्रमांकाशिवाय तपासता येते PF खात्यातील रक्कम

by Team Gajawaja
0 comment
UAN Number
Share

जर तुम्ही ईपीएफ खातेधारक आहात आणि आपल्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम किती आहे हे तपासून पहायचे असेल तर तुम्ही ते अगदी सहज करु शकता. यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज ही भासणार नाही. केवळ तुम्हाला एक मिस्ड कॉल किंवा एसएमएसच्या माध्यमातून पीएफ खात्यातील रक्कमेबद्दल कळू शकते. ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खात्यातील रक्कम तपासून पहायची असेल तर पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा. (EPFO Account)

ईपीएफओ खातेधारकांना वेळोवेळी असे सांगितले जाते की, पीएफ खात्यात जमा रक्कम काही दिवसा-दिवसांनी तपासून पाहिली पाहिजे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याच्या स्थितीत खातेधारकाला याची माहिती कळते. दरम्यान, पीएफ खात्यातील रक्कम तपासून पाहण्यासाठी तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता.

इंटरनेटशिवाय अशा प्रकारे तपासून पहा जमा रक्कम
जर तुमचे युएएन ईपीएफओ जवळ रजिस्ट्रेशन असेल तर तुमच्या लेटेस्ट कॉन्ट्रिब्युशन आणि पीएफ बॅलेसची माहिती एका मेसेजच्या माध्यमातून मिळते. त्यासाठी तुम्हाला 7738299899 वर EPFOHO UAN ENG लिहून पाठवावे लागेल. अखेरची तीन अक्षर ही तुमच्या भाषेसाठी आहेत. जसे की हिंदीत माहिती हवी असेल तर EPFOHO AN HIN असे लिहून पाठवावे. मात्र लक्षात ठेवा ही माहिती तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रर क्रमाकांवरच मिळणार आहे.

मिस्ड कॉलच्या माध्यमातून
तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक 011 22901406 वर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर ईपीएफओ कडून तुम्हाला एक मेसेज येईल. त्यामध्ये तुम्हाला पीएफ खात्याची माहिती मिळेल. यासाठी गरेजेचे आहे की, युएएनला बँक खाते. पॅन-आधार कार्ड लिंक असावे. (EPFO Account)

EPFO च्या माध्यमातून
-यासाठी प्रथम ईपीएफओवची अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in येथे जावे
-येथे Employee Centric Services वर क्लिक करा
-आता View Passbook वर क्लिक करावे
-आता पासबुक पाहण्यासाठी UAN वर लॉगइन करा

हे देखील वाचा- PDF फाइलचा पासवर्ड काढायचा असेल तर ‘ही’ ट्रिक वापरा

उमंग अॅपच्या माध्यमातून
-तुमचे उमंग अॅप सुरु करत ईपीएफओवर क्लिक करा
-आता एक अन्य पेजवर इम्पलॉयी सेंट्रिक सर्विसवर क्किल करावे लागेल
-येथे व्यू पासबुकवर क्लिक करा
-आपला युएएन क्रमांक आणि पासवर्ड क्रमांक द्या
-ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर येईल
-त्यानंतर तुम्ही तुमचा पीएफ बॅलेन्स तपासून पाहू शकता


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.