भारतात प्रत्येक चार कोसानंतर भाषा, परंपरा बदललेली दिसते. अशा प्रकारे देशातील काही राज्यांमध्ये लग्न सोहळे ते सणांबद्दल ही आपल्या- आपल्या परंपरा आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील मथुरात होळीचा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र राजस्थान मधील बांसवाडा जिल्ह्यात होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. येथे होळीपूर्वी दोन मुलांचे एकमेकांसोबत लग्न लावून दिले जाते. (Boys marriage)
देशात जेथे होळी साजरी करण्यासाठी मॉर्डन पद्धत वापरली जाते. तर काही ठिकाणी अद्याप ही परंपरांगत चालत आलेल्या विधी-पूजा फॉलो केल्या जातात. राजस्थान मधील बडोदिया गावात होळीपूर्वी मुलांचे लग्न करण्याची परंपरा ही प्रत्येक वर्षी मोठ्या दिमाखात पार पाडली जाते. गावात पूर्वजांची ही परंपरा होळीच्या एक दिवस आधीच्या रात्री पार पाडतात. यामध्ये वधू-वर हे दोघेही अल्पवयीन मुलं असतात. लग्नासाठी संपूर्ण गाव उपस्थितीत असतो.
कोणत्या मुलांचे लग्न केले जाते?
बडोदिया गावात मौजमजेसह केवळ परंपरेचे पालन करण्यासाठी कोणतीही दोन मुलं यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. यासाठी गरजेचे असते की, दोन्ही मुलांचे यज्ञोपवीत संस्कार झालेले नसेल. सोप्पा शब्दात बोलायचे झाल्यास जनेऊ संस्कार केलेली दोन मुलं या मध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. येथील लोक लग्नाला गोरिया असे म्हणतात. परंपरेनुसार चतुर्दशीच्या रात्री गावातील प्रमुख दोन मुलांना लग्नासाठी निवडतात आणि संपूर्ण गावाच्या उपस्थितीत मौजमजेसह लग्न केले जाते. रात्रभर नाचणे-गाणे सुरु असते. त्यानंतर सकाळी एकमेकांवर रंगांची उधळण करत होळी साजरी करतात.
कोणाला मुलं शोधण्याचे काम दिले जाते?
होळीपूर्वी लग्नासाठी मुलांचा शोध घेण्याचे काम एका खास समूहाला दिले जाते. गावातच राहणारे गोरिया समूहा दोन अशा यज्ञोपवीत संस्कार न झालेल्या मुलांचा शोध घेतात. जेणेकरुन त्यांचे लग्न लावले जाईल. जेव्हा दोन मुलं भेटतात तेव्हा त्यांना खांद्यावर बसून मंदिरात आणले जाते. यामध्ये पहिला मिळालेला मुलगा हा नवरदेव आणि दुसरा मुलगा नवरी मानला जातो. दोघांना नवरा-नवरीसारखे तयार केले जाते. दोघांना मंडपात बसवले जाते. त्यानंतर पंडित दोघांचे परंपरेनुसार लग्न लावून देतात. (Boys marriage)
का साजरी केली जाते ही परंपरा?
दोन्ही मुलांच्या लग्नात ७ फेरे आणि सात वचन यांचा सुद्धा समावेश असतो. दोन्ही मुलं संपूर्ण विधि-विधानासह अग्नीला साक्षी मानून फेरे घेतात. लग्न झाल्यानंतर सकाळी दोघांना एका बैलगाडीत बसवून संपूर्ण गावात फिरवले जाते.स्थानिक लोक याला वधू-वराची शोभायात्रा असे म्हणतात. संपूर्ण गाव नवदांपत्याला आशीर्वाद देतात.
हे देखील वाचा- ६ महिन्यांच्या सुट्टी शिवाय ‘या’ अधिकारांच्या हकदार आहेत महिला
लोकांचे असे म्हणणे आहे की, बडोदिया गावात खुप आधीपासूनच एक नाला होता. जो गावाला दोन हिस्स्यामध्ये विभागतो. लोकांनी बडोदियाच्या दोन हिस्स्यांमध्ये बंधूभाव कायम रहावा म्हणून विचित्र पद्धत शोधून काढली. त्यांनी गावातील दोन हिस्स्यातील एक-एक मुलाला निवडले आणि त्या एकमेकांचे लग्न लावून दिले. तेव्हापासून या गावात होळीपूर्वी दोन मुलांचे लग्न लावण्याची परंपरा सुरु आहे.