Home » मराठी राजभाषा दिवस का साजरा केला जातो?

मराठी राजभाषा दिवस का साजरा केला जातो?

by Team Gajawaja
0 comment
Marathi Bhasha Din
Share

आज मराठी भाषा दिवस साजरा केला जातोय. हा दिवस प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा करण्यामागील कारण असे की, प्रसिद्ध मराठी कवि विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज नावाने ही ओळखले जाते. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. ते एक प्रख्यात मराठी कवि, नाटककार, लघु कथाकार आणि मानवतावादी होती. त्यांनी कवितांचे १६ खंड, तीन उपन्यास, लघु कथांचे आठ खंड, निबंधाचे सात खंड, १८ नाटक आणि सहा एकांकिका लिहिल्या, ज्या सर्व स्वातंत्र्य, न्याय आणि गरिबी सारख्या सामाजिक विषयांवर आधारित होत्या. (Marathi Bhasha Din)

मराठी भाषा दिवस हा महाराष्ट्र आणि गोव्यातील काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कारण हा दिवस मराठी भाषिकांसाठी फार महत्वाचा असते. १९९९ मध्ये कुसुमाग्रांच्या निधनानंतर सरकारने २१ जानेवारी २०१३ रोजी कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती.

हा दिवस मराठी साहित्याची महानता आणि सन्मानार्थ साजरा केला जातो. मराठी भाषेत सर्व आधुनिक इंडो-आर्यन भाषांच्या काही जुन्या साहित्याचा समावेश आहे. मराठी भाषा ४२ अन्य भाषांसह भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ज्यामध्ये विदर्भी, कोंकणी, खानदेशी अशा विविध प्रकारे ती बोलली जाते. भाषा आणि व्याकरणाची वाक्य रचना ही प्राकृक आणि पाली मधून आली आहे.

प्राचीन काळात भाषेला महारथी, महाराष्ट्री, मराठी किंवा मल्हती अशा नावाने ओळखले जायचे. मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच मराठी साहित्याला प्रोत्साहन देणाऱ्यांचा सन्मान ही केला जातो. (Marathi Bhasha Din)

हे देखील वाचा- तिरुपती शहर, जेथे २.६ लाख कोटींचे मंदिरच नव्हे तर ‘या’ आहेत खास गोष्टी

मराठी भाषेसंदर्भातील काही तथ्य
-जवळजवळ ९० मिलियन लोक हिंदी आणि बंगाली नंतर मराठी भारतात तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे
-मराठीमध्ये विविध ४२ प्रकार आहेत, जसे की, अहिरानी, खानदेशी, वरहादी, मालवणी, तंजौर मराठी असे
-मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. दरम्यान, मराठी भाषेची स्वत:ची आपली लिपी असून त्याला मोदी लिपि असे म्हटले जाते
-या प्राचीन मोदी लिपीला संरक्षित करण्यासाठी भारत सरकारद्वारे इंडिया पोस्टाच्या माय स्टॅम्प नावाची योजनेअंतर्गत एक पोस्टाचे तिकिट ही जारी केले होते
-सर्वात प्रथम सापडलेले मराठी ग्रंथ हे ११ व्या शतकातील आहेत. ते तांब आणि दगडांवर मोदी लिपितील शिलालेख आहेत


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.