छत्तीसगढची राजधानी रायपुर मध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरु आहे. रायपुरमध्ये काँग्रेस अधिवेशनादरम्यान पक्षाच्याअध्यक्षा सोनिया गांधी यांनी भावुक भाषण दिले. सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) काँग्रेस अध्यक्षाच्या रुपात आपल्या प्रवासाचा उल्लेख केला आणि मदतीसाठी सर्वांचे आभारही मानले. या दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रवास आणि पक्षाच्या योगदाना संदर्भातील एक व्हिडिओ ही दाखवला गेला.
सोनिया गांधी यांच्या भाषणानंतर अशा प्रकारची चर्चा सुरु झाली आहे की, आता त्यांनी राजकरणातून एक्झिट घेतली आहे. खरंतर काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात एक व्हिडिओ दाखवला गेला. ज्यामध्ये सोनिया गांधी यांनी पक्षासाठी काय काय केले हे दाखवले गेले. त्यानंतर सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्ष आणि युपीए शासनाच्या वेळी आपल्या कार्यकाळात सांगण्यात आलेल्या गोष्टींबद्दल आभार मानले. त्यांनी हे सुद्धा सांगितले की, १९९८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळल्यानंतर आता २५ वर्षात आम्ही खुप मोठ्या संधी मिळवल्याच पण निराशेचा काळ ही पाहिला. सोनिया गांधींनी २००४-२००९ च्या लोकसभा निवडणूकीत मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या विजयाला एक मोठी संधी असल्याचे म्हटले.
सोनिया गांधी यांनी पुढे असे म्हटले की, यामुळे मला व्यक्तिगत समाधान मिळते. पण जी गोष्ट माझ्यासाठी सर्वाधिक समाधानकारक आहे ती म्हणजे माझा प्रवास भारत जोडो यात्रेसह समाप्त होऊ शकतो. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनाचे सुद्धा कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
भाजपवर जोरदार हल्लाबोल
सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) आपल्या भाषणादरम्यान, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी असे म्हटले की, संवैधानिक संस्थांवर भाजप-आरएसएसचा ताबा आहे आणि सरकार संवैधानिक मुल्यांना पायदळी तुडवत आहेत. भारत जोडो यात्रेने जनतेला जीवंत केले आहे. त्याचसोबत आज देश आणि काँग्रेससाठी एक आव्हानात्मक काळ आहे. दलित-अल्पसंख्यांक आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. तरीही सरकार सर्वकाही उद्योगपतींच्या हातात देत आहे.
सोनिया गांधी यांनी राहुल गांधींच्या आंदोलनाचे कौतुक केलेच. पण कठीण असलेले आंदोलन राहुल गांधींनी शक्य करुन दाखवले याचाही आनंद व्यक्त केला. त्यांना कार्यकर्त्यांना त्यांची ताकद आहे आणि देशाच्या हितासाठी लढणार आहे असेही म्हटले. त्याचसोबत मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जरुर यशस्वी होऊ.
हे देखील वाचा- चीन आणि रशियामधील संबंध जगात स्थिरता आणतील का?
या विधानावरुन आता सोनिया गांधी खरंच राजकरणातून एक्झिट घेणार का याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचसोबत जेव्हा ही चर्चा सुरु झाली तेव्हा काँग्रेसने ही गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न केला. सोनिया गांधींच्या विधानावर छत्तीसगढच्या प्रभारी कुमारी शैलजा यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सोनिया गांधीच्या राजकरणातील एक्झिटच्या चर्चेला पूर्णविराम दिला आणि म्हटले की, हे विधान त्यांचे अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याबद्दलचे होते.