नुकत्याच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे प्रमुख मुत्सद्दी वांग यी यांची भेट झाली. या भेटीनंतर जगाचे खासकरुन पश्चिमी देशांचे लक्ष हे पुतिन यांच्या या भेटीवर होती. यावर पुतिन यांनी असे म्हटले की, दोन्ही देशांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्थिती स्थिर करण्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. पुतिन यांचे हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा चीन एक तटस्थ भुमिका साकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे, अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहत आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया एकट्या पडलेल्या रशियाला चीनचा आधार मिळणार का? (Russia-China relation)
युक्रेनवर चीनची स्थिती
चीनकडून अशी अपेक्षा केली जात आहे की, या प्रवासादरम्यान चीन युक्रेन वादावर आपली स्थिती स्पष्ट करणार आहे. आता पर्यंत चीनने स्वत:ला युक्रेन प्रकरणी तटस्थ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांनी रशियासोबत आपले जवळचे संबंध कायम ठेवले आहेत. तर नाटो आणि अमेरिकेने शंका व्यक्त केली आहे की, चीन रशियाला हत्यारांची पुर्तता करु शकतो. ज्यामुळे रशियाला युक्रेन विरोधातील युद्धासाठी मदत मिळेल.
संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न
पुतिन सोबत भेट झाल्यानंतर वांग यी यांनी असे म्हटले की, रशियासोबत आम्ही आमची धोरणात्मक भागीदारी आणि मदतीला अधिक मजबूत करण्यासाठी तयार आहोत. त्यांनी जोर देत असे ही म्हटले की, दोन्ही देशांमध्ये भागीदारी ही कोणत्याही तिसऱ्या देशाच्या विरोधात नाही आणि त्यांचा असा ही उद्देश नाही की, एखाद्यावर दबाव टाकावा.(Russia-China relation)
पश्चिम देशांना चिंता
पश्चिम देशांना पुतिनने दिलेल्या विधानामुळे चिंता वाटू लागली आहे. पुतिन यांनी असे म्हटले होते की, चीनचे राष्ट्रपति शी जिनपिंग रशियाच्या दौऱ्यावर येऊ शकतात. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, चीन रशियाच्या युतीमुळे रशियाला हत्यार मिळू शकता. जेणेकरुन युक्रेन युद्धाची स्थिती आणखी खराब होऊ शकते. ज्यामुळे नाटो समर्थित युक्रेनच्या विरोधात रशिया आणि चीन होऊ शकतात. अमेरिकेचे असे म्हणणे आहे की, आता पर्यंत असे ही दिसून आलेले नाही. मात्र निश्चित रपात हत्यारांबद्दल चर्चा झाली असेल.
हे देखील वाचा- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे विवेक रामास्वामी कोण?
अमेरिकेची चिंता वाढली
अमेरिकेला सर्वाधिक मोठी चिंता अशी आहे की, जर चीन आणि रशिया यांचे संबंध प्रस्थापित झाल्यास तर दोन्ही बाजूंनी समस्यांचा सामना करावा लागेल. एका बाजूला युक्रेन युद्धात तो नाटोचे नेतृत्व करत आहे. ताइवान प्रकरणी रशियाची साथ चीनच्या पक्षाला मजबूत आणि मुद्द्यांला अधिक वादग्रस्त करु शकतो.याशिवाय अनेक मुद्द्यांवर अमेरिका चीन आणि रशिया या दोघांशी आधीच ठाम आहे.