वास्तुशास्रात सर्व दिशा आणि सहा उपदिशांसह ग्रहांचे सुद्धा विशेष स्थान असते. ज्या प्रकारे प्रत्येक दिशेची एक देवता वेगवेगळी असते. त्याच प्रकारे एका ग्रहाचे घरात एक निश्चित स्थान ही असते. घर बांधताना दिशांसह सर्व नऊ ग्रहांबद्दल विचार करणे फार गरजेचे आहे. ज्या घरांची वास्तु संतुलित आणि वास्तुनुरुप असते तेथे नेहमीच सुख-समृद्धी आणि सकारात्मकता असते. जर घर बांधताना कोणत्याही प्रकारचा वास्तू दोष निर्माण झाल्यास काही प्रकारच्या समस्या मागे लागू शकतात. (Direction & Planet Relationship)
जाणून घेऊयात वास्तुत दिशा आणि ग्रहांमध्ये संबंध कसा असतो
-चंद्र
वास्तु शास्रानुसार वायव्य दिशेचा स्वामी चंद्र असतो. चंद्र मन, माता आमि संपत्तीचा कारक ग्रह आहे. वायव्य दिशेला किचन, अतिथी गृह आणि मुलींची खोली असणे अशुभ मानले जाते.
-सूर्य
सूर्यामुळे सर्व प्राणी आणि वनस्पतींचे जीवन पूर्ण होते. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य देव आहे. ज्योतिष शास्रात सुर्य देव उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि तेज प्रदान करणारा ग्रह आहे. या दिशेला वास्तु संबंधित दोष असल्यास व्यक्तीच्या मान-सन्मानात समस्या निर्माण होतात. वास्तुनुसार, या दिशेला जड सामान ठेऊ नये.
-मंगळ
दक्षिण दिशेचा स्वामी मंगळदेव आहे. या दिशेला यम देवता असते. मंगळ ग्रह साहस, पराक्रम आणि धनाची देवता मानले जाते. वास्तुनुसार, या दिशेला आरामाची खोली आणि स्टोर रुम असणे शुभ मानले जाते.
-बुध
बुध ग्रह उत्तर दिशेचे स्वामी आहे. ही दिशा धनाची देवता भगवान कुबेर या दिशेची देवता मानली जाते. बुध वाणी, लेखन आणि संपन्नतेचे ग्रह मानले जातात. या दिशेला तिजोरी आणि अभ्यासाची खोली असणे शुभ मानले जाते.
-गुरु
गुरु ग्रह उत्तर-पूर्व ज्याला ईशान्य कोन असे ही म्हटले जाते. या दिशेचा स्वामी ग्रह असतात. भगवान विष्णु या दिशेचे देवता मानले जातात. गुरु ग्रह अध्यात्म आणि सुख देणारा ग्रह आहे. या दिशेला पूजेचा देव्हारा ठेवणे फार शुभ आणि लाभकारी मानले जाते.(Direction & Planet Relationship)
–शुक्र
शुक्र ग्रह म्हणजे आग्नेय कोनचा अधिपति ग्रह असतो. या दिशेचा स्वामी अग्निदेव आहे. शुक्र ग्रह सौंदर्य, सुख-सुविधा आणि एशोआराम देणारा ग्रह मानला जातो. या दिशेला किचन, वीजेसंबंधित गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते.
-शनि
पश्चिम दिशेचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. या व्यतिरिक्त वरुण देव सुद्धा या दिशेचे स्वामी आहेत. पश्चिम दिशेला लाभ आणि आनंदाची ओळख होते. शनि ग्रह कर्म आणि न्यायाचा कारक ग्रह असतो. या दिशेला ड्रॉइंगरुम, बेडरुम, लायब्रेरी असणे शुभ मानले जाते.
हे देखील वाचा- शंकराच्या ‘या’ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दूर होतो पत्रिकेतील कालसर्प दोष
-राहु
राहुलाल अशुभ ग्रह मानले जाते. दक्षिण-पश्चिम दिशा किंवा नैऋत्य कोनाचा स्वामी राहु ग्रह आहे. या दिशेला बेडरुम, ऑफिस, बाथरुम अथवा स्टोर रुम असणे लाभदायक मानले जाते. पण या गोष्टीची काळजी घ्यावी की, या दिशेला कधीच चुकून हलक्या गोष्टी किंवा मोकळे ठेवू नये. ही दिशा राहु ग्रहाचा अधिपत्य आहे. त्यामुळे येथे जड वस्तू ठेवल्या तरी चालतात.