Home » काँग्रेसला पक्ष चिन्ह मिळण्यामागील इंदिरा गांधी आणि देवराह बाबा यांच्यातील रहस्यमय कथा

काँग्रेसला पक्ष चिन्ह मिळण्यामागील इंदिरा गांधी आणि देवराह बाबा यांच्यातील रहस्यमय कथा

by Team Gajawaja
0 comment
Congress Party Symbol
Share

इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसची स्थापना केली गेली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस देशातील पहिला प्रमुख राजकीय पक्ष बनला गेला. कालांतराने काँग्रेसमध्ये फूट पडत गेली आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ही बदलले गेले. आता काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा आहे. काँग्रेसचे पक्ष चिन्ह निवडण्यामागे कोणाचा विचार असेल याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. याची एक रहस्यमय कथा आहे. दरम्यान, हाताचा पंजा निवडण्यापूर्वी काँग्रेसचे दोन आणि निवडणूक चिन्ह होते. कधी गाय-वासरु तर कधी बैलांची जोडी. मात्र इंदिरा गांधी यांनी १९७५ रोजी देशात इमरजेन्सी लागू केली. अशातच १९७४ मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु झाले. याचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केले खरं पण त्याला देशव्यापी ही बनवले. इमरजेन्सी लागू करण्याचे परिणाम १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेवेळी इंदिरा गांधी यांना पराभावाच्या रुपात भोगावे लागले. काँग्रेसचा ऐवढा वाईट पराभव झाला की, तो पक्ष पुन्हा उभा राहिल की नाही यावर लोकांना संशय वाटत होता. मात्र निवडणूकीचे चिन्ह बदलल्यानंतर पक्षाने जबरदस्त पुन्हा राजकरणात एन्ट्री केली. (Congress Party Symbol)

लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधी खुप नाराज झाल्या होत्या. त्यांना पक्षाला कसे पुन्हा करावे याबद्दल काहीच सुचत नव्हते. पराभवाची कारणं माहिती होती. पण राजकरणात पुन्हा येण्यासाठी काय करावे यावर सातत्याने विचार केला जात होता. याच दरम्यान, काँग्रेसच्या एका नेत्याच्या डोक्यात आले की, पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी आपण पक्ष चिन्हच बदलले पाहिजे. यासोबत त्या नेत्याने इंदिरा गांधी यांना उत्तर प्रदेशातील पूर्वांचल मध्ये राहणारे सिद्ध संत देवराह बाबा यांच्या दर्शनाचा सल्ला दिला होता.

यावरुन इंदिरा गांधी यांनी देवराह बाबा यांच्या दर्शनासाठी उत्तर प्रदेशातील त्यांच्या आश्रमात गेल्या. बाबांना जो कोणीही भेटायला यायचा त्याला ते आशीर्वाद द्यायचे. त्यांनी इंदिरा गांधींना ही आशीर्वाद दिला. असे सांगितले जाते की, येथून गेल्यानंतर काँग्रेस पक्षाचे चिन्ह हाताचा पंजा असावा म्हणून पक्षाने निवडणूक आयोगाला आग्रह केला. आयोगाने पंजा निवडणूक चिन्ह असेल असे काँग्रेसला सांगितले. आजपर्यंत हेच पक्षाचे चिन्ह राहिले आहे.

Congress Party Symbol
Congress Party Symbol

१९७७ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा ज्या प्रकारे पराभव झाला होता त्यामुळे त्यांना आपण पुन्हा जिंकू असा विश्वास नव्हता. देवराह बाबांचा आशीर्वाद आणि हाताचा पंजा पक्ष चिन्ह म्हणून मिळाल्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणूकांमध्ये इंदिरा गांधी यांनी दणदणीत विजय मिळाला.(Congress Party Symbol)

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचे चिन्ह खुप वेळा बदलले गेले. सुरुवातीला याचे चिन्ह बैलांची जोडी होती. इंदिरा गांधी यांना १२ नोव्हेंबर १९६९ रोजी पक्षाकडून काढून टाकले गेले. तेव्हा त्यांनी काँग्रेस (आर) नावाचा पक्ष स्थापन केला. काँग्रेस आर पक्षाचे निवडणूक चिन्ह हे गाय-वासरु होते. त्यानंतर हाच पक्ष काँग्रे आय असा बनला. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी झाली होती. याची स्थापनी इंग्रज एओ ह्युम यांनी केली होती. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होती. ज्यावेळी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा त्याचे उद्देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवणे होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचे उद्देश पूर्ण झाले. आता ते संपवले पाहिजे.

१९७७ मध्ये काँग्रेसची जी स्थिती होती तिच १९४ मध्ये विरोधकांची होती
इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या केल्यानंर काँग्रेसच्या पक्षाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला एकतर्फी बहुमत मिळाले होते. दरम्यान, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहिलेल्या वीपी सिंह यांनी बोफोर्स तोफ घोटाळ्यावरुन काँग्रेसशी बंड केले. यामुळे पक्षाला १९९८ मध्ये सत्तेतून बाहेर पडावे लागले. वीपी सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकत जनमोर्चा नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला. भाजप आणि डाव्या बाजूच्या पक्षांच्या आधारावर ते पंतप्रधान झाले. मंडळ आयोगाची सिफारिश लागू झाल्यानंतर भाजपने समर्थन मागे घेतले आणि वीपी सिंह यांचे सरकार कोसळले गेले. जनमोर्चा विखुरला गेला. जनमोर्चा तुटल्यानंतर जनता दल, जनता दल(यू). राजद, जद(एस), सपा सारखे काही पक्ष अस्तित्वात आले. (Congress Party Symbol)

हे देखील वाचा- महाराष्ट्रातील राजकरणात बड्या निर्णयांचे साक्षीदार राहिलेले ‘शिवसेना भवन’

काही नेत्यांनी बनवले स्वत:चे पक्ष
वेळोवेळी काँग्रेस मधून बाहेर पडत काही नेत्यांनी आपले स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस, आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रसे पक्ष (शरद पवार), छत्तीसगढ मध्ये स्व. अजीत जोगी यांचा जनता काँग्रेस, बीजू जनता दल सारखे दल आज ही आहेत. आणखी काही पक्ष स्थापन झाले. पण ते कालांतराने संपुष्टात आले. चौधरी चरणसिंह यांनी लोकदल बनवले. जे राष्ट्रीय लोकदल नावाने आजही आहे. काँग्रेसमधून विभक्त होत आपले आपले पक्ष स्थापन करणारे काही नेते नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. प्रवण मुखर्जी, अर्जुन सिंह, माधव राव सिंधिया, नारायणदत्त तिवारी. पी. चिदंबरम, तारिक अनवर सारखे प्रमुख नाव आहेत ज्यांनी काँग्रेसला आधी रामराम ठोकला पण नंतर पक्षात पुन्हा आले. ममता बॅनर्जी, शरद पवार, जगन मोहन रेड्डी, मुफ्ती मोहम्मद सईद सारख्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन करत त्याचे सर्वेसर्वा झाले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.