अल्पवयीन मुलांना आपण काय करतोय हे फारसे समजत नाही. अशातच जसे जसे वय वाढते तसे त्यांच्यामधील खोडकर वृत्ती कमी होऊ लागतेच पण त्यांच्या आयुष्यात ही काही बदल होतता. खासकरुन जेव्हा मुली तारुण्यात येतात तेव्हा त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तुमची मुलगी ही तारुण्यात आली असेल तर तिला पैशांबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही जरुर सांगितल्या पाहिजेत. (Tips for teenage girl)
तारुण्य आल्यानंतर मुलांसाठी काही गोष्टी नव्या असतात. त्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या मुलींना पैशांबद्दल काही गोष्टी सांगणे फार गरजेचे आहे. तर तुम्ही तुमच्या मुलींना बचत कशी करावी आणि आर्थिक सक्षम कसे रहावे याच बद्दलच्या टीप्स जाणून घेऊयात.
बँकिंगची माहिती द्या
शाळेनंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर बहुतांश मुलींना बँकिंग बद्दल फारसे काही माहिती नसते. अशातच तुम्ही तुमच्या मुलीचे बँकेत खाते कसे सुरु करावे ते डेबिट कार्डचा वापर कसा करावा हे शिकवले पाहिजे.
स्वत:साठी बजेट बनवण्यास शिकवा
काही मुलं आपल्याला पालक पॉकेटमनी देतात म्हणून खुप खर्च करतात. यामुळे त्यांना बजेट मॅनेजमेंट करता येत नाही. अशातच तुम्ही तुमच्या मुलीला महिन्याभराच्या खर्चाचे बजेट बनवण्याचा सल्ला द्या आणि त्यानुसारच तिला पैसे द्या. जेणेकरुन तिला ही पैसे बचत करण्याची सवय लागेल.
बचत करण्यास शिकवा
तरुण मुलींना बचत करण्याची सवय जरुर लावा. तिला प्रत्येक दिवशी थोडे पैसे बचत करण्याचा सल्ला द्या. याचसोबत योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास ही शिकवा. जेणेकरुन मुलीला बचत करण्याबद्दलच्या टीप्ससह तिचे भविष्य सुरक्षित राहण्यास मदत होईल.
आपत्कालीन फंड ठेवण्यास सांगा
मुलीला आपत्कालीन परिस्थितींसाठी पैसे बाजूला काढून ठेवण्यास शिकवा. त्याचसोबत शिक्षणासाठी असो किंवा वैद्यकिय कामांसाठी असो तेव्हा हा आपत्कालीन फंड ती कशी वापरु शकते याबद्दल ही तिला सांगा.(Tips for teenage girl)
हे देखील वाचा- क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ‘या’ चुका करणे टाळा, अन्यथा होईल नुकसान
क्रेडिट रेटिंग बद्दल सांगा
मुलींना काही काळानंतर कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी जर कर्ज घेण्याची वेळ आली तर काय करावे या बद्दल आधीच सांगा. त्यासाठी कोणते पर्यायी मार्ग आहेत त्या बद्दल ही समजावून सांगा. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मुलीला क्रेडिट रेटिंग बद्दल माहिती देऊ शकता. मुलीला सांगा की, क्रेडिट रेटिंग उत्तम असेल तर कर्ज आणि क्रेडिट कार्ड सहज मिळू शकते.