Home » झोपली तेव्हा ३२ वर्ष पण जाग येताच झाली होती १७ वर्षाची, मुलाऐवजी प्रियकराला शोधू लागली

झोपली तेव्हा ३२ वर्ष पण जाग येताच झाली होती १७ वर्षाची, मुलाऐवजी प्रियकराला शोधू लागली

by Team Gajawaja
0 comment
Canada
Share

तुम्ही कधी असा विचार केला आहे का, एखादी महिला ३२ वर्षाची आहे. पण झोपून जाग आल्यानंतर ती वयाच्या अर्ध्या वर्षाची झाली असेल? हे अशक्यच आहे. पण ही घटना खरंच घडली आहे. कारण कॅनडातील टोरंटो मधील एक ३२ वर्षीय महिला नेल्श हिला एक दिवस अशी झोप आली की, जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिचे वय १७ वर्ष झाले होते. (Canada)

अर्ध आयुष्य विसरली महिला
द मिरर मध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, नेल्श आपल्या बेडवर शांत झोपली होती. पण जेव्हा ती जागी झाली तेव्हा १६-१७ वर्षाच्या एका तरुणीप्रमाणे वागू लागली. तिला ना आपल्या परिवाराबद्दल आठवत होता ना मुल किंवा आपले आधीचे आयुष्य, ६ वर्षाच्या मुलीची आई असलेली नेल्श स्वत:ला एक तरुणी मानत होती. तिने आपल्या मुलीला ओळखले सुद्धा नाही.

आपल्याच नवऱ्यावर झाले पुन्हा प्रेम
नेल्श हिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या मते, घरातील मंडळी जेव्हा तिला रुग्णालयात घेऊन आले तेव्हा ती खुप गोंधळलेली होती. दोन-चार दिवस तिच्यावर लक्ष ठेवणे आणि चाचण्या केल्यानंतर तिला विसरण्याचा आजार असल्याचे समोर आले. परिवाराशी बातचीत आणि मेडिकल रिपोर्टमध्ये असे समोर आले की, बालपणात तिच्या सोबत एक घटना घडली होती. ज्यामुळे तिच्या मेंदूला इजा झाली होती. त्याच कारणामुळे तिची स्मरणशक्ती गेली असावी.

त्यानंतर नवऱ्याने तिचीसाथ दिली आणि तिची स्मरणशक्ती पुन्हा येण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत होता. याच दरम्यान, नेल्शला पुन्हा एकदा आपल्या पार्टनरवर प्रेम जडले. म्हणजेच, या प्रकरणात खास गोष्ट अशी की, भले तिला आपले अर्ध आयुष्य आठवत नसले तरीही तिला आपल्याच नवऱ्यावर पुन्हा प्रेम जडले होते. (Canada)

हे देखील वाचा- सोन्याची जीभ आणि हृदय असलेल्या Mummy च्या रहस्यमय गोष्टी

पुन्हा केले लग्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात २० जानेवारीला नेल्शने आपल्या पार्टनर सोबत पुन्हा एकदा लग्न केले आहे. अद्याप तिची स्मरणशक्ती पुन्हा परत आलेली नाही. डॉक्टरांनी तिला कॉफी, अल्कोहोल आणि मानसिक ताणापासून दूर राहण्यास सांगितले आहे. असे सांगितले जात आहे की, तिला आता ही डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होतो. तिचा नवरा आणि मुलगी दोघे ही तिची खुप काळजी घेतात. एक लाइफ पार्टनरच्या संघर्षाची ही कथा सोशल मीडियात ट्रेन्ड करत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.