Home » फोनची स्क्रिन लॅाक असेल तरीही पाहता येतील YouTube चे व्हिडिओ

फोनची स्क्रिन लॅाक असेल तरीही पाहता येतील YouTube चे व्हिडिओ

by Team Gajawaja
0 comment
YouTube
Share

व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्युब जगभर प्रसिद्ध आहे. युजर्सच्या सुविधेसाठी युट्युबने प्रीमियम सर्विस ही सुरु केली आहे. या सर्विसमध्ये युजर्सला कोणत्याही जाहिरातीच्या अथळड्याशिवाय गाणी किंवा व्हिडिओ पाहता येतात. सामान्यपणे युट्युबचे प्रीमियम सब्सक्रिप्शन नसेल तर एखादा व्हिडिओ सुरु असतानाच त्यामध्ये एखादी जाहिरात सुरु होते. मात्र प्रीमियम वर्जनमध्ये असे होत नाही. भारतात युट्युबच्या प्रीमियम सब्सक्रिप्शनसाठी १२९ रुपये मोजावे लागतात. अशातच युजर्स युट्युब प्रीमियम खरेदी करत नाहीत. मात्र तुम्ही काळजी करु नका. कारण तुम्हाला युट्युबच्या प्रीमियमशिवाय फोनमध्ये तुमच्या आवडीचे व्हिडिओ फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरु ठेवू शकता. त्याचसोबत दुसरे काम ही करु शकता.(YouTube Trick)

उदाहणार्थ जर तुम्हाला युट्युबवर एखादा व्हिडिओ पहायचा आहे आणि त्याचसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट ही करायचे आहे तर तुम्ही ही दोन्ही काम एकाच वेळी फोनवर करु शकता.

-सर्वात प्रथम तुम्ही तुमचे ब्राउजर सुरु करत youyube.com वर जा
-आता एखादा व्हिडिओ सुरु करा
-असे केल्यानंतर स्क्रिनवर उजव्या बाजूला कोपऱ्यात क्लिक करा
-आता डेक्सटॉप व्यू (डेस्कटॉप वर्जन) सुरु करा
-आता व्हिडिओ पुन्हा सुरु करा आणि स्क्रिन मिनिमाइज करा
-तुमच्या स्क्रिनवर वरती नोटीफिकेशन पॅनलला स्क्रॉल करा, येथे प्ले च्या ऑप्शनवर क्लिक करा
-या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचा व्हिडिओ बॅकग्राउंडवर सुरु राहिल आणि तुम्ही व्हॉट्सअॅप चॅटिंग किंवा अन्य दुसरे काम करु शकता
-ही ट्रिक तुम्हाला अशावेळी उपयोगी येणार आहे जेव्हा तुम्ही युट्युबवर गाणी ऐकता

भारतातील ४७ कोटी लोक पाहतात युट्युब
२०२२ मध्ये या अॅपला १५४ मिलियन युजर्सने डाउनलोड केले आहे.युट्युबच्या मते, जवळजवळ २ बिलियन महिन्याभराचे युजर्स हा अॅप वापरतात. १०० पेक्षा अधिक देशांमध्ये जवळजवळ ८० पेक्षा अधिक भाषा आणि ५०० तासांचा कंटेट प्रत्येक मिनिटाला युट्युबवर अपलोड केला जातो. Statista च्या एका रिपोर्टनुसार, प्रेक्षकांच्या प्रकरणात भारत या लिस्टमध्ये टॉपवर आहे. अशातच भारताचे ४६७ मिलियन लोक युट्युब पाहतात. (YouTube Trick)

हे देखील वाचा- आता फुकटात Netflix वरील मनपसंद वेबसीरीज पाहण्यासाठी करा हे’ काम करा

दरम्यान, युट्युबवर पहिल्यांदा व्हिडिओ हा २३ एप्रिल २०१५ रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यावेळी त्याचे एक को-फाउंडर जावेद करीम यांनी सॅन डिएगोच्या प्राणिसंग्रहालयाचा व्हिडिओ होता. सुरुवातीला युट्युबला ट्युन इन हुक अप नावाच्या एक व्हिडिओ डेटिंग साइटच्या रुपात तयार केले होते. आता युट्युब गुगल नंतर जगातील सर्वाधिक दुसरा मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.