नुकत्याच उद्धव सेनेला मोठा झटका लागला आहे. कारण निवडणूक आयोगने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या अधिकारासंर्भात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात वाद सुरु होता. मात्र या दोन गटांमधील वाद हा गेल्या वर्षापासून सुरु असल्याचे आपण सर्वांनी पाहिले. (Shiv Sena Rift)
याच पार्श्वभूमीवर एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी असे म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काहीच फरक पडत नाही. कारण जनता त्यांचे नवं चिन्ह स्विकारेल. शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेना मित्रपक्ष आहेत.
शरद पवारांनी असे ही म्हटले की, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने १९७८ मध्ये नवे चिन्ह निवडले होते. मात्र त्यामुळे पक्षाला नुकसान नाही झाले. पवार यांनी शिंदे यांच्या गटाला वास्तविक शिवसेनेच्या रुपात मान्यता देणे आणि त्यांचे मुळ चिन्ह धनुष्यबाण दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी उद्धव सेनेला दिला सल्ला?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ठाकरे गटाला असा सल्ला दिला की, जेव्हा एखादा निर्णय येतो तेव्हा चर्चा करु नये. त्याला स्विकार करा. नवे चिन्ह घ्या. यामुळे काहीही फरक पडत नाही.
अजित पवारांची प्रतिक्रिया
एनसीपीचे वरिष्ठ नेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला वास्तविक शिवसेनेच्या रुपात मान्यता देण्यासंबंधित निवडणूक आयोगाच्या निर्णयाला अनपेक्षित असे म्हटले आहे. त्यांनी असा ही प्रश्न उपस्थितीत केला की, निवडणूक आयोगाने हा निर्णय सुनावण्यास घाई का केली? अजित पवार यांनी असे ही म्हटले की, शिवसेनेचे सामान्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत उभे राहतील.(Shiv Sena Rift)
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सत्य आणि लोकांचा विजय असल्याचे म्हटले. त्यांनी आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करत मीडियाशी बोलताना असे म्हटले की, मी निवडणूक आयोगाचे धन्यवाद मानतो. लोकशाहीत बहुमताला फार महत्व असते. हे सत्य आणि लोकांचा विजय आहे. त्याचसोबत बाळासाहेबांचा आशीर्वाद ही आहे. आमची शिवसेना वास्तविक शिवसेना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी असे म्हटले की, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना लक्षात ठेवत गेल्या वर्षात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीसोबत मिळून सरकार स्थापन केले.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
फडणवीस यांनी असे म्हटले की, आता हे खरं झाली आहे एकनाथ शिंदे खऱ्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहे. त्यांनी असे म्हटले की, हा निर्णय गुण-दोषाच्या आधारावर करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस, शिक्षण ते राजकीय प्रवासाबद्दल जाणून घ्या
उद्धव ठाकरे यांच्या गटाची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राउत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला लोकशाहीची हत्या असे म्हटले आहे. त्यांनी असे म्हटले की, निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही जाणार आहोत. आम्ही निर्णयाला आव्हान देणार आहोत. अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती. हे सर्व दबावाखाली झाले आहे. मला निवडणूक आयोगावर भरोसा नाही.