ब्रिटेनचे नवे राजा होणाऱ्या चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकावेळी महाराणीच्या मुकुटावर कोहिनूर हिरा नसणार आहे. या राज्याभिषेकापूर्वी तीन महिन्या आधीच शाही घराण्याने हा निर्णय घेतला होता की, किंग चार्ल्स तृतीय यांची पत्नी कॅमिला यांच्या मुकुटावर कोहिनूर हिऱ्याचा वापर करण्यात येणार नाही. असे सांगितले जात आहे की, शाही परिवाराला वादापासून दूर रहायचे आहे. इतिहासात हे पहिल्यांदाच होणार आहे की, महाराणी यांच्या मुकुटावर कोहिनूर हिरा नसणार आहे. (Kohinoor Diamond)
भारत-ब्रिटनचे संबंध चांगले असताना, राज्याभिषेकाच्या वेळी राजघराण्याला भारतासोबत कोणताही राजनैतिक वाद नको आहे. हा मौल्यवान हिरा ऐकेकाळी भारताचा होता. त्यामुळे तो भारताला मिळावा म्हणून वारंवार मागणी केली जाते. कोहिनूर हिऱ्याऐवढा मौल्यवान आणि अद्वितीय आहे तेवढाच तो वादग्रस्त ही राहिला आहे. हा हिरा शापित असल्याचे ही बोलले जाते.
कोहिनूर हिऱ्याला शापित असे बोलण्यामागे काही कारणे आहेत. असे सांगितले जाते की, हा हिरा ज्याच्या जवळ राहिला आहे त्याची पडझडच झाली. कोहिनूर हा फारसी शब्द असून कूह-ए-नूर, याचा हिंदीत अर्थ होतो की, प्रकाशाचा पर्वत. मात्र या हिऱ्याचे उलट परिणाम दिसले. हा हिरा जिथे कुठे गेला तेथे विध्वंस झाला. सुल्तानांची सल्तनत गेली, राजांचे शासन गेले. दरम्यान, अशा काही मान्यतेच्या आधारावर हे सांगितले जाते. याच आधारावर १३ व्या शतकापासून कोहिनूर हिरा हा शापित असल्याचे बोलले जाते.
सल्तनतचा अंत
कोहिनूर बद्दल विविध घटनांच्या आधारावर कथा सांगितल्या जाता. या हिऱ्याचा प्रवास सुरु झाला तो म्हणजे काकतीय वंशापासून. तेथून तो तुघलक वंशाकडे, त्यानंतर हा हिरा मुघलांच्या हाती लागला. इतिहास साक्षीदार आहे की, कोहिनूर हिरा ज्याच्याकडे गेला आहे त्याचे खुप वर्चस्व राहिले पण अखेरीस त्यांना सर्वकाही गमवावे लागले.
मुघल बादशाह शाहजहाने कोहिनूर हिरा आपल्या मयुर सिंहासनात बसवला होता. त्याने खुप वर्ष राज्य केले. परंतु अखेर शाहजहाचे काय झाले? प्रथम पत्नीने सोडले आणि नंतर मुलानेच त्याला नजरकैद करुन राजगादीवर बसला.
जेव्हा नादिर शाह हिरा घेऊन पळाला
भारतावर आक्रमण करणाऱ्या नादिर शहाने १७३९ मध्ये हा अद्वितीय हिरा मिळवला. असे सांगितले जाते की, नादिर शाहने मुघलांना हिरा देत नंतर आपल्याकडे मिळवला आणि तो घेऊन पर्शियाला गेला. दरम्यान तेव्हा हिऱ्याचे नाव हे वेगळेच होते. पण नादिर शाहने त्याची सुंदरता पाहिली आणि त्याला कोहिनूर असे नाव दिले. कोहिनूर हिरा (Kohinoor Diamond) घेऊन पळाल्याच्या काही वर्षांतच नादिर शाहची हत्या सुद्धा केली गेली.
महाराज रणजीत सिंह यांची अमानत
नादिर शाहनंतर कोहिनूर अफगाणिस्तानातील सुल्तान अहमद शाह दुर्रानी वंशाचे शाह शुजा दुर्रानी यांच्याकडे आला. योगायोग असा की, हिरा हाती लागल्यानंतर दुर्रानी यांची सल्तनत संपुष्टात येऊ लागली. शुजा दुर्रानी हिरा घेऊन अफगाणिस्तानात पळाला आणि नंतर पंजाबला पोहचला. येथए त्याने कोहिनूर हिरा शीख साम्राज्याचे राजा रजणतीत सिंह यांच्या ताब्यात दिला. काही दिवसानंतर रणजीत सिंह यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर हा हिरा रणजीत सिंह यांचा मुलगा दलीप सिंह याला विरासतमध्ये मिळाला.
इंग्रजांकडे कसा पोहचला कोहिनूर?
कोहिनूर हा शीख साम्राज्याचा खजिना होता. इंग्रजांनी महाराजा रणजीत सिंह यांच्या साम्राज्यावर हल्ला केला. शीख साम्राज्याच्या पराभवानंतर हा हिरा इंग्रजानी आपल्या ताब्यात घेतला. कथा अशी सांगितली जाते की. त्यांना हा हिरा भेट म्हणून दिला गेला. पण हे खरं नाही. १८५१ मध्ये हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांना दिला गेला. महाराजा रणजीत सिंह यांचा मुलगा दलीप सिंह तेव्हा लहान होता. इंग्रज त्याला सुद्धा आपल्या सोबत घेऊन गेले. तो राणी व्हिक्टोरियाच्या देखरेखीखाली वाढला.
त्याला बालपणातच त्याच्या मायभूमीपासून दूर केगे गेले आणि पुन्हा परत जाण्याची परवानगी ही नव्हती. दरम्यान, त्याला हे कळत होतो की हिरा हा शीख साम्राज्याची संपत्ती आहे. त्याने खुप वेळा तो पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले. १८९३ मध्ये प्रिंस दलीप जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा त्याला पंजाब मध्ये प्रवेश करण्यापासून रोखले गेले. अखेर तो पॅरिसमध्ये स्थायिक झाला आणि तेथेच १८९३ मध्ये निधन होईपर्यंत तेथे राहिला. (Kohinoor Diamond)
इंग्रजांचे शासन संपले
कोहिनूर हिऱ्याचा असा इतिहास पाहता त्याच्या परिणामांपासून दूर राहण्यासाठी इंग्लंडच्या महाराणीने असा नियम बनवला की, कोणतीही महिला तो घालणार नाही. असे सांगितले जाते की, यामुळे त्याचा वाईटपणा कधीच गेला नाही. एक काळात असे म्हटले जायचे की, ब्रिटीश शासनाचा कधीच अंत होणार नाही. कारण अर्ध्यापेक्षा अधिक जगावर त्यांचे वर्चस्व होते. मात्र अखेर जगभरात पसरलेल्या इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली.
हे देखील वाचा- आपला कोहिनूर आणि ब्रिटनची राणी….
कोहिनूर हिऱ्यावरुन वाद
१८४६ मध्ये जेव्हा पंजाबवर इंग्रजांनी हल्ला करत साम्राज्य मिळवले तेव्हा कोहिनूर हा तत्कालीन ब्रिटिश गवर्नर जनरल यांना दिला गेला. दरम्यान, असे सांगितले जाते की, तेव्हा लॉर्ड डलहौजीने ज्या लाहौर कराराअंतर्गत पंजाबला मिळवले होते, ते पंजाबचे महाराज दलीप सिंह यांच्यासोबत झाला होता. त्यावेळी दलीप सिंह यांचे वय केवळ ५ वर्ष होते. ज्या परिस्थितीत कोहिनूर हिरा हा इंग्रजांकडे गेला तेव्हापासून त्यावरुन वाद होत राहिला. नेहमीच वादात राहिला आणि भारतात तो पुन्हा आणावा अशी मागणी ही केली जाते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही या हिऱ्यावर दावा केला आहे.