Home » मारबर्ग वायरस ठरतोय जीवघेणा, जाणून घ्या लक्षणं

मारबर्ग वायरस ठरतोय जीवघेणा, जाणून घ्या लक्षणं

by Team Gajawaja
0 comment
Marburg Virus
Share

अफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनी मध्ये मारबर्ग वायरसने (Marburg Virus) हाहाकार माजवला आहे. येथे आतापर्यंत या वायरसच्या कारणास्तव ९ जणांचा जीव घेतला आहे. मारबर्ग वायरस किती धोकादायक आहे हे अशावरुनच कळते की, डब्लूएचओने प्रभावित क्षेत्रांच्या ठिकाणी आपत्कालीन तज्ञ आणि संक्रमण रोखणाऱ्या टीमला तैनात केले आहे. आपत्कालीन बैठक ही झाली आहे. डब्लूएचओने असे म्हटले आहे की, आता पर्यंत ९ जणांचा मारबर्ग वायरसमुळे मृत्यू झाला आहे. १६ संशयित रुग्ण ही समोर आले आहेत. त्यांचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवले गेले आहेत.

मारबर्ग वायरस किती धोकादायक?
डब्लूएचओनुसार, मारबर्ग वायरसच्या कारणास्तव फणफणून ताप येणे. यामुळे मारबर्गला हेमोग्राफिक फीवर असे ही म्हटले जाते. याच्या संक्रमणामुळे मृत्यूच्या धोका ५० टक्के असतो. गंभीर स्थितीत हा धोका ८८ टक्क्यांवर पोहचतो. हा वायरस काही मर्यादेपर्यंत इबोला वायरस सारखाच आहे. मारबर्ग वायरस हा वटवाघळांच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये पोहचतो. त्यानंतर व्यक्तींच्या शरिरात त्याचा फैलाव होतो. संक्रमाणानंतर सर्वात प्रथम रुग्णाच्या शरिरात पाण्याचा स्तर कमी होऊ नये म्हणून प्रयत्न केला जातो.

या लक्षणामुळे अलर्ट केले जाते
संक्रमणानंतर याची लक्षण दिसून येण्यासाठी २ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो. यामध्ये खुप ताप येणे, डोकं दुखणे ही याची प्रमुख कारणे आहेत. या व्यतिरिक्त आजाराच्या सुरुवातीला रक्तपेशींमध्ये दुखणे, डायरिया, पोटात दुखणे, उलटी सारखी लक्षण दिसतात. रुग्णाला खुप थकल्यासारखे वाटत राहते.

डब्लूएचओचे असे म्हणणे आहे की, गंभीर स्थितीत रुग्णाची गुद्दद्वार, नाक आणि तोंडातून रक्त येऊ शकते. या प्रकरणात नर्वस सिस्टिम ही प्रभावित होऊ शकते. त्यामुळे रुग्णाची मानसिक स्थिती बिघडली जाते. त्याला अधिक राग येऊ शकतो. शरिराला रक्तचा पुरवठा कमी होऊ लागतो.(Marburg Virus)

पहिल्यांदा १९६७ मध्ये समोर आले होते प्रकरण
इबोला प्रमाणेच मारबर्ग सुद्धा वटवाघळांच्या माध्यमातून पसरला जातो. संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर तो दुसऱ्याला होण्याची शक्यता असते. संक्रमित पृष्ठभाग किंवा सामानाला जरी हात लावला तरीही दुसऱ्या व्यक्तीला होता. पहिल्यांदा हा वायरस १९६७ मध्ये शोधून काढण्यात आला होता.

हे देखील वाचा- कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसत नाही लक्षणं, अशा पद्धतीने करा निदान

आता पर्यंत यावर कोणतीही विशिष्ट लस किंवा औषध उपलब्ध नाही. दरम्यान, रुग्णाच्या शरिरात पाण्याची कमतरता पूर्ण करणे आणि काही औषधांच्या माध्यमातून वायरसची लक्षण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या व्यतिरिक्त संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाच्या आसपास असाल तर हात सॅनेटाइज करण्यास सांगितले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.