शेतीमध्ये सातत्यानं बदल करणे गरजेचे असते. आधुनिक संकल्पना आणि साधनांचा वापर केला तर शेतीमधूनही लाखोंचा फायदा मिळू शकतो, हेच एका शेतक-यानं सिद्ध केलंय. या शेतक-याच्या शेतात बाजारात उपलब्ध असलेला बटाटा (Potato) होत असे. पण या नेहमीच्या बटाट्याच्या ऐवजी शेतक-यानं लाल बटाट्याचे (Potato) पिक घेतले. हे पिक घेताना शेतक-यानं आपल्या नापिक असलेल्या जमिनीतही या बटाट्याच्या रोपांची लावणी केली होती. मात्र आश्चर्य म्हणजे, या नापिक जमिनीतूनही लाल बटाट्याची पैदास उत्तम झाली असून शेतक-याला डबल फायदा झाला आहे. विशेष म्हणजे हा लाल बटाटा (Potato) अत्यंत औषधी असा मानला जातो. नेहमी मिळणा-या बटाट्यापेक्षाही यामध्ये अधिक फायबरचे प्रमाण आहे. शिवाय हे बटाट्याचे पिक घेण्यासाठी मान्यवर चिप्स कंपन्या तयार असतात. या बटाट्यापासून तयार झालेल्या नारंगी रंगाच्या चिप्सना मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि पचन संस्था चांगली होण्यासाठी या लाल बटाट्यांचा (Potato) वापर होतो. त्यामुळेच शेतक-यानं केलेला हा बदल त्याच्या उत्पन्नात वाढ करुन गेला आहे.

शेत पिकामध्ये बदल करण्याचं हे धाडस केलं आहे राजस्थानमधील एका शेतक-यानं. सिरोही जिल्ह्यातील शेतक-यांनी नेहमीच्या बटाट्याऐवजी लाल बटाट्याची लागवड करण्यास पसंती दिली. हा बदल या शेतक-याला मालामाल करुन गेला आहे. त्यासोबतच लाल बटाट्याच्या गुणाची चर्चा होऊ लागली आहे. सुरुवातीला काही शेतक-यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आता या जिल्ह्यातील बहुतांशी शेतक-यांनी लाल बटाट्याची (Potato) लागवड शेतात सुरु केली आहे. या बटाट्याचे बाजार मुल्य जास्त आहे, त्याचा फायदा या शेतक-यांना मिळत आहे. शिवाय हा लाल बटाटा (Potato) थेट शेतात येऊनच घेतला जात आहे. या बटाट्यापासून तयार होणा-या चिप्संनाही मोठी मागणी आहे. त्यामुळे जे शेतकरी लाल बटाटा शेतात लावतात, त्यांचा शेतीमाल मोठ्या कंपन्या थेट शेतात येऊन विकत घेतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारातही जावे लागत नाही आणि त्यांना रोख रक्कम मिळत आहे.
साधारण 120 दिवसात हे लाल बटाट्याचे (Potato) पिक तयार होते. जमिन नापिक असेल तरीही त्यात लाल बटाट्याचे पिक चांगले आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा लाल बटाटा शेतक-यांसाठी जेवढा फायदेशीर आहे, तेवढाच हा बटाटा (Potato) जे सेवन करतात, त्यांच्यासाठीही तो फायदेशीर ठरत आहे. या बटाट्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. लाल बटाटा ह्दयविकारांसोबत कर्करोगासारख्या आजारांपासूनही बचाव करण्यास फायदेशीर ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाल बटाट्याचे फायदे भरपूर आहेत. अनेकवेळा बटाटा खाल्ला तर त्यामुळे वजन वाढते असे मानण्यात येते. पण हा लाल बटाटा वजन नियंत्रणात ठेवण्यास मदतशीर ठरतो. याशिवाय लाल रक्तपेशींची वाढ करण्यासही या लाल बटाट्याचा फायदा होतो. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल तर लाल बटाट्याचे नियमीत सेवन करावे. काही दिवसांनी हिमोग्लोबिनच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येते. शिवाय लाल बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनानं लोहाचे प्रमाणही वाढते.
========
हे देखील वाचा : श्रीरामाच्या भरोवशावर श्रीलंकेची अर्थव्यवस्था…
========
लाल बटाटा (Potato) हा शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. लाल बटाट्याचे सेवन केल्यास रक्तदाबाची पातळीही नियमीत रहाण्यास मदत होते. या बटाट्यातील पोटॅशियमचे प्रमाण 943 मिलीग्रामच्या जवळपास असते, हे प्रमाण केळीमध्ये आढळणाऱ्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे. बटाट्यातील फायबर रक्तप्रवाहातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील ताण कमी होतो पर्यायानं रक्तदाब कमी होतो. याशिवाय म्हणजे लाल बटाटे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. या बटाट्यातील (Potato) स्टार्च शरीरातील पाचक क्षमता वाढवण्यासही मदत करु शकतात. यासोबत स्मरणशक्तीवाढवण्यासही या लाल बटाट्याचा उपयोग होतो. लाल बटाट्याचा एवढा चांगला उपयोग असल्यामुळेच त्याची मागणीही जास्त आहे. आता हा लाल बटाटा कधी बाजारात दिसला तर नक्की घ्या…कारण त्याची किंमत थोडी जास्त असली तरी त्याचे फायदेही तेवढेच आहेत.
सई बने….
