उत्तर प्रदेशाप्रमाणे आता मध्य प्रदेशात ही नाव बदलण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भोपाळ जवळ असलेले एक गाव इस्लामनगरचे नाव बदलले गेले आहे. मध्य प्रदेश सरकारने या गावाचे नाव बदलण्यासाठी एक परिपत्रक जाहीर केले. परंतु याचा इतिहास सांगतो की, हे गाव ३०८ वर्षापासून इस्लामनगर म्हणून ओळखले जायचे. मात्र सरकारच्या परिपत्रकामते आता ते गाव जगदीशपुर नावाने ओळखले जाईल. स्थानिक लोक असे म्हणतात की, या गावाचे नाव बदलण्याची मागणी दीर्घकाळापासून सुरु होती. २०२२ मध्ये खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी नाव बदलण्याची मागणी केली होती.(Islamnagar History)
इस्लामनगरचा इतिहास
इतिहासाची पानं चाळून पाहिली तर इस्लामनगर यापूर्वी जगदीशपूर नावाने ओखळले जायचे. असे मानले जाते की, यापूर्वी जगदीशपुर गावाची स्थापना राजपूतांच्या सरदारांनी केली होती. हे भोपाळ जवळच आहे, केवळ तो भोपाळच्या रियासतचा हिस्सा राहिला. इतिहासात त्याचा एकेकाळी थाट होता.
असे सांगितले जाते की, मोहम्मद खान मुघल शासक औरंगजेबच्या फौजेत होता. मात्र जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा तो पळून भोपळा जवळील गोंडा राजाची रियासत जगदीशपुर येथे आला. जगदीशपुर पासून इस्लामनगर पर्यंतची त्याची कथा अत्यंत खतरनाक आहे. ही कथा एखाद्याच्या अंगावर काटे उभे करण्यासारखी आहे. इतिहासाच्या पानांवर रक्तपाताच्या रुपात त्याची कथा लिहिली गेली आहे.
भोजनाच्या नावावर हत्येचा कट
सन् १७१५ पूर्वी येथील राजा हिंदू होते. राजा देवरा चौहान तेथील राजा होते. या परिसरात त्यांचा दबदबा होता. लोक त्यांची यशोगाधा आवर्जून सांगायचे. पण जेव्हा त्यांच्याबद्दलचे किस्से भोपाळचे नवाब दोस्त मोहम्मद खान यांच्यापर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. त्याने राजाला नदीच्या किनाऱ्याला भोजनाचे निमंत्रण पाठवले. राजा देवराज त्यासाठी आले. मात्र तेव्हाच त्यांच्यावर हल्ला केला गेला. त्यानंतर जगदीशपुराचे नाव बदलून इस्लामनगर असे केले गेले.(Islamnagar History)
दरम्यान, सन् १७२३ मध्ये दोस्त मोहम्मद खान यांनी भोपाळ आणि इस्लामनगरची घेराबंदी करत तेथील किल्ला निजाम-उल-मुल्क यांना दिला. त्यानंतर इस्लामनगरला सन् १८०६ ते १८१७ पर्यंत सिंधिया घराण्याच्या ताब्यात होता.
इतिहासाच्या खुणा
इस्लामनगर किल्ला आफल्या वास्तुकलेसाठी फार प्रसिद्ध आहे. येथील इमारती सौंदर्य आणि इस्लामी वास्तुकलेचा उत्तम उदाहरण आहे. येथील राणी महल, गोंड महल, चमन महल, नक्कशीदार दगड आणि खुला मैदान पाहण्यासारखे आहे. वर्तमानात इस्लामनगर भोपाळ जिल्ह्यातील एक ग्राम पंचायत आहे. हा जिल्हा हुजूर मधील फंदा ब्लॉक अंतर्गत येतो. येथे खुप लोक येत राहतात.
हे देखील वाचा- हिंदू धर्मात अतिथी देवो भव: का म्हटले जाते?
परदेशातून येतात पर्यटक
इस्लामनगरचा थाट आणि किल्ल्याचे दरवाजे भिंती पाहण्यासाठी परदेशातून ही खुप पर्यटक येत राहतात. असे सांगितले जाते की, कोविड पूर्वी येथे दररोज शंभर पर्यटक यायचे. भारतीय पुरातत्व विभागाने येथे पर्यटकांसाठी काही सुविधा उपलब्ध आहेत.