मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचा जगभरात वापर केला जातो. व्हॉट्सअॅपचे कोटींच्या संख्यने युजर्स चॅटिंग आणि मेसेज करण्यासाठी वापर करतात. व्हॉट्सअॅपकडून वेळोवेळी युजर्सला मेसेंजिंगमध्ये मजा येण्यासाठी नवे फिचर्स ही रोलआउट केले जातात. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी ही काही नवे फिचर्स व्हॉट्सअॅपने लॉन्च केले आहेत. मात्र याच्या पॉलिसी आणि कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर बंदी घातली जाते. अशातच समोर आले आहे की, व्हॉट्सअॅपने एका महिन्याभरातच ३६ लाखांहून अधिक भारतीय अकाउंट्स बंद केले आहेत. कंपनीने कंप्लायंस रिपोर्टमध्ये ही आकडेवारी शेअर केली आहे.(WhatsApp Banned)
मेटाच्या ओनरशिप असणाऱ्या प्लॅटफॉर्मने आयटी नियमस २०२१ अंतर्गत मंथली कंप्लायंस रिपोर्ट शेअर केला आहे. या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, व्हॉट्सअॅपचा चुकीचा पद्धतीने वापर करत असलेल्या लाखो अकाउंट्सवर योग्य कारवाई केली गेली आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे ४० कोटींहून अधिक युजर्स आहेत.
रिपोर्टमध्ये समोर आली ही आकडेवारी
डिसेंबर महिन्याच्या कंप्लायंस रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले की, १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान, व्हॉट्सअॅपने भारतात एकूण ३,६७७,००० अकाउंटवर बंदी घातली आहे. कंपनीने असे म्हटले की, यापैकी १,३८९.००० अकाउंट्स प्रो-अॅक्टिव्ह पद्धतीने युजर्सकडून रिपोर्ट करण्याआधी बंद केले गेले. म्हणजेच कंपनीने कोणत्याही तक्रारीशिवायच या अकाउंट्सच्या विरोधात कारवाई केली आहे.
युजर्सने पाठवल्या कंपनीला तक्रारी
डिसेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपचा ग्रीविएंस विभाला युजर्सकडून १६०७ तक्रारी पाठवण्यात आल्या. कंपनीने असे म्हटले की, तपासानंतर यापैकी १६६ तक्रारींवर कारवाई केली. तुम्हाला माहिती असेल की, आयटी नियम, २०२१ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, ५० लाखांहून अधिक युजरबेस असणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मला कंप्लायंस रिपोर्ट पब्लिश करावी लागते. या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, प्लॅटफॉर्मने कोणत्या तक्रारींचे निवारण केले आहे.(WhatsApp Banned)
हे देखील वाचा- फेसबुकवर फ्रेंन्ड नसला तरीही लोक पाहू शकतात तुमचे प्रोफाइल, आजच करा ‘हे’ काम
‘या’ चुका केल्यास बंद होईल व्हॉट्सअॅप अकाउंट
व्हॉट्सअॅप अकाउंट बंद होण्यामागील सर्वाधिक मोठे कारण स्पॅम मेसेजिंग आहे. म्हणजेच तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्पॅम मेसेज पाठवणे किंवा अन्य जणांना त्रास देण्यासाठी वापर करत असाल तर अकाउंट बंद केले जाते. अशाच प्रकारे कोणत्याही प्रकारच्या धमक्या, धार्मिक,हिंसा भडकवणार्या अफवांना प्रोत्साहन देणारा कंन्टेट शेअर केल्यास ही अकाउंट बॅन केले जाऊ शकते.