आजकालच्या अनहेल्दी लाइफस्टाइलमध्ये बहुतांश मुल ही कमी वयातच लठ्ठपणाची शिकार होतात. त्यांच्या या समस्येमुळे पालक ही अधिक चिंता व्यक्त करतात. त्याचसोबत काही उपाय करुन ही मुलांमधील लठ्ठपणा कमी होण्याचे नाव घेत नाही. अशातच तुमच्या मुलाचे ही वजन वाढत असेल तर तुम्ही काही सोप्प्या टीप्स वापरुन मुलांचे वजन नियंत्रणात ठेवू शकता. मुलांच्या वाढत्या वयासाठी काही कारण ही जबाबदार असतात. त्यामुळे लठ्ठपणामुळे कमी वयातच काही गंभीर आजार ही होण्याची शक्यता असते. तर मुलाचे वेगाने वजन वाढत असेल तर पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा.(Child weight control)
-फिजिकल अॅक्टिव्हिटी करुन घ्या
घरात बसून मोबाईलवर गेम्स खेळण्यामध्येच बहुतांश मुलांचा वेळ जातो. अशातच तुम्ही तुमच्या मुलाला घराबाहेर जाऊन गेम्स खेळण्यास प्रोत्साहित करु शकता. घरात डान्स किंवा सोप्पे व्यायामाचे प्रकार शिकवत त्याच्या शरिराची हालचाल होईल असे काहीतरी करा.
-जंक फूड पासून दूर ठेवा
लहान मुलांना घरात बनवलेल्या हेल्दी खाण्याऐवजी बाहेरील तळलेले पदार्थ खाणे फार आवडते. अशातच ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते ते मुलांनी खाल्ल्यास त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढू लागतो. त्यामुळे मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यापासून दूर ठेवा. त्यांना पोषक तत्वे मिळतील असे पदार्थ जरुर द्या. जेणेकरुन त्यांचे वजन नियंत्रण राहण्यास मदत होईल.
-सकाळचा नाश्ता जरुर द्या
सकाळचा नाश्ता न केल्याने ही वजन वेगाने वाढू शकते. त्यामुळे मुलांना नियमितपणे सकाळचा नाश्ता खाण्याची सवय लावा. त्याचसोबत डॉक्टरांच्या सल्ल्याने सकाळी नाश्त्यात मुलांना राजमा, ब्रोकली, मटर, फूड ग्रेन पास्ता आणि ओटमील सारख्या गोष्टी खाण्यास द्या. तसेच यामध्ये फळांचा ही समावेश करा.(Child weight control)
-सातत्याने टीव्ही पाहण्यापासून दूर ठेवा
काही मुलं संपूर्ण दिवस सातत्याने टीव्हीवर कार्टून आणि त्यांच्या आवडीचे शो पाहत राहतात. अशातच खुप वेळ फिजिकल अॅक्टिव्हिटी न झाल्याने त्यांच्यात लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळेच मुलांना सातत्याने टीव्ही पाहण्यापासून दूर ठेवा.
हे देखील वाचा- थंडीच्या दिवसात वाढलंय वजन? वेट लॉससाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा
-पुरेशी झोप द्या
मुलांची झोप पूर्ण न झाल्याने वजन वाढण्याचे कारण ठरु शकते. अशातच मुलांना ७-८ तासांची झोप द्या. यामुळे मुलांचे वजन नियंत्रणात राहण्यासह ते अॅक्टिव्ह ही दिसतील.