गांधीनगरच्या दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणातील आसाराम बापू यांना आजन्म कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बलात्काराच्या अन्य एका प्रकरणात त्यांना आधीच जोधपुरात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसाराम यांना ऑगस्ट २०१३ रोजी इंदौर मधून अटक करण्यात आली होती. एक काळ असा होता जेव्हा आसाराम हे चहाचे दुकान चालवायचे. लोक तेव्हा त्यांना आसुमल नावाने ओळखायचे. तेथूनच त्यांचा बाबा होण्यापर्यंतचा प्रवास सुरु झाला.(Asaram Bapu Life)
१७ एप्रिल १९४२ रोजी बरानी गाव, नवाबशाहमध्ये पेशाने व्यापारी थिउमल सिरुमलानी आणि मेंहगी बा यांच्या घरी जन्म झाला होता. त्यांचे नाव आसुमल असे ठेवले गेले होते. विभक्तीनंतर आसुमल यांचा परिवार भारतात आला. त्यांचा परिवार अहमदाबाद जवळील मणिनगर येथे राहण्यासाठी आला. परंतु आसुमल यांच्या वडिलांचे लवकर निधन झाले.तेव्हा बालपणीच घराची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. आसुमल मेहसाणाच्या वीजापुर येथे आले. जी त्यावेळी बृम्हमुंबई होती. गुजरात सुद्धा याच राज्याचा हिस्सा होता. ही १९५८-५९ मधील गोष्ट असेल.
आज ही आहे ते चहाचे दुकान
वीजापुरात आज ही एक असे चहाचे दुकान आहे जे मॅजिस्ट्रेट ऑफिसच्या बाहेर होते. आसुमलला ओळखल्या जाणाऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे की, या दुकानात आसुमल असायचा. हे दुकान आसुमलचे नातेवाईक राम यांचे होते. आसुमल यांनी हे दुकान दीर्घकाळ चालवले. त्याचदरम्यान, त्यांनी दाढी ही लांब ठेवण्यास सुरुवात केली होती. तेथे राहणारे वृद्ध अजून तो काळ विसरलेले नाहीत.
हत्येचा आरोप ही लावण्यात आलाय
भुतकाळ माहिती असणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवल्यास आसाराम यांचा वादविदांशी संबंध हा फार जुना आहे. स्थानिक लोकांच्या मते १९५९ मध्ये आसुमल आणि त्यांच्या नातेवाईकांवर दारुच्या नशेत हत्या केल्याचा आरोप ही लावण्यात आला होता. पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यामधून त्यांची सुटका झाली.(Asaram Bapu Life)
तेव्हा दारु बाजारात विक्री करुन मोठा नफा मिळवायचे
असे म्हटले जाते की, हत्येच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतर आसुमलने वीजापुर सोडले. अहमदाबाद मधील सरदारनगर परिसरात ते आले. ते ६० वे दशक होते. येथे सुद्धा त्यांना ओळखणारे काडूजी यांनी असे म्हटले की, आसुमल तेव्हा दारु विक्री करण्याचा धंदा करायचे. यामध्ये त्यांचे चार हिस्सेदार ही होते. काडूजी यांच्या मते सर्वजण त्यांच्याच दुकानातून दारु खरेदी करायचे आणि बाजारात विक्री करुन मोठा नफा मिळवायचे.
नंतर दुध, नोकरी आणि त्यानंतर बेपत्ता
काडुजी यांचे असे म्हणणे आहे की, आसुमल यांचा भुतकाळ कधीच विसरला जाऊ शक नाही. आसुमल हे सफेद बनियन आणि निळ्या रंगाची हाफ पॅंन्ट घालून दारु खरेदी करण्यासाठी यायचे. दारुचा पूर्ण गॅलन आपल्या खांद्यावरुन घेऊन जायचे. तीन-चार वर्ष त्यांना हा धंदा केला आणि त्यानंतर हे काम सोडले. त्यानंतर एका दुकानात केवळ ३०० रुपयांमध्ये नोकरी करु लागले आणि त्याच्या काही काळानंतर गायबच झाले.
आता आसाराम बापु बनून समोर आले
यानंतर काही वर्षांनी जगासमोर आसुमल नव्हे तर आसाराम बनून आले. असे आसाराम जे प्रवच द्यायचे, आता भक्तांच्या नजरेत त आध्यात्मिक गुरु झाले होते. दरम्यान, कोर्टाद्वारे दोषी सुनावल्यानंतर आता ते शिक्षेस पात्र ठरले आहेत. तुरुंगातून सुटण्याची शक्यता ही पुसट झाली आहे.
कसे आध्यात्मात आले
आसुमल हे एका सामान्य शहरातून असलेले आसाराम बापु कसे बनले? खरंतर ७० च्या दशकातील गोष्ट असेल असे बोलले जाते की, आध्यात्मच्या मार्गावर जाण्यापूर्वी त्यांनी काही धंद्यांमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रश्न वेळोवेळी असाच उपस्थितीत राहतो ते आध्यात्मच्या दिशेकडे कसे वळले?
यापूर्वी प्रवचनात माहिर नव्हते
खरंतर आसुमल यांची आई आध्यात्मिक होती. त्यामुळेच ते सुद्धा आध्यात्म्याच्या मार्गाने गेले. आसुमल आधी काही तांत्रिकांच्या संपर्कात आले. त्या तांत्रिकांनी त्यांना सम्मोहनाची कला ही शिकवली. ते प्रवचन ही देऊ लागले होते पण त्यात माहिर झाले नव्हते. अध्यात्म्यात त्यांचे मन रमत होते. गर्दी आणि भक्त त्यांना बापुजी असे बोलू लागले होते. आसुमल हे आध्यात्म्याच्या मार्गाने जात असल्याने घरातील मंडळी चिंतेत पडली. आसुमल यांचे लग्न करुन दिले गेले.
आसाराम यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार लग्न होऊ नये म्हणून त्यांनी घरातून पळ काढला. परिवाराला ८ दिवसानंतर ते भरुच मधील एका आश्रमात भेटले. अखेर परिवारासमोर आसुमल यांना झुकावे लागले आणि लक्ष्मी देवी यांच्यासोबत लग्न करावे लागले.(Asaram Bapu Life)
त्यानंतर एका गुरुसोबत आणि नवी ओळख बनली
आध्यात्म्यात आसुमल यांची आवड कमी झाली नव्हती. आसुमल हे एका गुरुच्या शोधात होते. असे सांगितले जाते की, त्यांना गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात लीला शाह बापुंच्या रुपात गुरु भेटले. त्यांच्याजवळ ते काही काळच राहिले. त्यांच्या नावात बदल करत आसाराम असे झाले. एक नवे नाव आणि नव्या ओळखीसह अखेर आसाराम हे अहमदाबाद मधील मोटेरा येथे आले.
हे देखील वाचा- ७५ हजारांपेक्षा अधिक गुन्ह्यांचा केलाय खुलासा, जाणून घ्या भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेराबद्दल…
भक्तांची गर्दी आणि आश्रम
साबरमतीच्या नदी किनाऱ्यावर आरासाम यांनी कच्चे आश्रम बनवले. हळूहळू आपल्या प्रवचनांमधून ते लोकप्रिय झाले. त्यांच्यासोबत अधिकाधिक भक्त जोडले जाऊ लागले. त्यानंतर आसाराम हे टेलिव्हिजनवर झळकू लागले. अधिक लोकप्रिय झाले. देभरातील भक्तांची अधिक गर्दी होऊ लागली. त्याचसोबत आश्रम ही वाढले गेले.