Home » पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, ज्यांना देशातील मुकेश अंबानी बोलले जाते

पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, ज्यांना देशातील मुकेश अंबानी बोलले जाते

by Team Gajawaja
0 comment
Pakistani Richest Person
Share

पाकिस्तानावर आर्थिक संकट कोसळे आहे. येथे डाळ, तांदूळ, पीठ, बटाट्याच्या किंमतीत तुफान वाढ झाली आहे. सामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांना पाकिस्तानातील मुकेश अंबानी बोलले जाते. मियां मुहम्मद मंशा असे त्यांचे नाव आहे. मियां मुहम्मद मंशा आजच्या तारखेला पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. ते पाकिस्तानातील सर्वाधिक टॉप उद्योगपति आहेत.(Pakistani Richest Person)

पाकिस्तानातील मुकेश अंबानी
पाकिस्तान जबरदस्त आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथे डॉलरच्या तुलनेत रुपया खुप खाली घसरला गेला आहे. पाकिस्तानात एका डॉलरची किंमत २५० रुपयांवर पोहचली आहे. तर पेट्रोल २४९ रुपये लीटर झाले आहे. मात्र ही स्थिती असली तरीही पाकिस्तानात व्यावसायिकांचे दिवस अधिक उत्तमच आहेत. मियां मुहम्मद मंश पाकिस्तानातील आशेचा किरण आहे. ज्यांना नेहमीच पाकिस्तानातील मुकेश अंबानी असे बोलले जाते.

भारतीय उद्योगपति मुकेश अंबानी एशियातील सर्वाधिक अमीर व्यक्तींपैकी एक आहेत. ते देशाच्या आर्थिक प्रगतीचे पर्याय समजतात. त्यांनी आपल्या उद्योगातील देशातील अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. मंशा यांना सुद्धा अशा प्रकारचे पाकिस्तानातील मुकेश अंबानी समजले जातात.

कोण आहेत मियां मुहम्मद मंशा?
मियां मुहम्मद मंशाचे वडील उद्योगपती होते. वडिलांचा सुती कापडांचा व्यवसाय होता. मियां मुहम्मद लंडन येथून ग्रॅज्युएट झाले आहेत. सध्या निशात टेक्सटाइल्स मिल्स उद्योगाच्या मालकाच्या रुपात प्रसिद्ध आहेत. बँकिंग, बीमा, सीमेंट आणि उर्जेच्या व्यवसायात प्रयत्न केले आहेत. ते आणि त्यांच्या परिवाराचे सदस्य पाकिस्तानातील सर्वाधिक मोठे करदाते आहेत. त्यांच्या लंडनमध्ये काही महागड्या प्रॉपर्टीज ही आहेत.

फोर्ब्समध्ये समावेश
वर्ष २००५ मध्ये मियां मुहम्मद मंशा यांचे नाव पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिक म्हणून आहे. त्यानंतर वर्ष२०१० मध्ये फोर्ब्स मध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंत पुरुषांच्या सूचीत स्थान मिळाले आहे. तेव्हा मियांचे नाव ९३७व्या स्थानावर आहेत. मात्र ते वर्ष २०१९ मध्ये पाकिस्तानात तिसऱ्या क्रमांकावर पोहचले आणि २०२२ पर्यंत ते तेथील पहिल्या क्रमांकाचे व्यवसायिक झाले.

हे देखील वाचा- उत्तर कोरियातील नागरिक घरात कैद, ‘या’ कारणास्तव हुकूमशाहने लावला लॉकडाऊन

परदेशात ही व्यवसाय
वर्ष २००८ मध्ये मंशा यांनी मलेशियात मेबँक सुरु केली आणि नंतर एमसीबी बँकेची. त्यांचे सध्या नेटवर्थ ५ अरब डॉलर आहे. आता ते पाकिस्तानातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानातील अंबानी असे म्हटले जाते. अंबानी यांचे नेटवर्थ सध्या ८० अरब डॉलरपेक्षा अधिक आहे.(Pakistani Richest Person)

भारताशी आहे नाते
मियां मोहम्मद मंशा यांचा जन्म १९४७ मध्ये झाला होता. स्वातंत्र्यापूर्वी त्यांचा परिवार मुळ रुपात अविभाजित भारतातील कोलकाता येथे राहणारा होता. परंतु विभाजनानंतर त्यांचा परिवार पाकिस्तानातील पंजाबमध्ये गेल आणि तेथूनच प्रवास सुरु झाला. त्यांच्याकडे मर्सिडीज ईक्लास, जॅग्युआर कन्वर्टिबल, पोर्श, बीएमडब्लू ७५०, रेंज रोवर आणि वोक्सवॅगनसह काही शानदार गाड्या सुद्धा आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.