आपण डिटेक्टिव्ह सिनेमे काही वेळेस खुप मन लावून पाहतो. एखाद्या गुन्ह्याच्या मूळापर्यंत जाण्यासाठी कशा प्रकारे डोकी लढवली जातात याची उदाहरण त्या सिनेमांमधून मिळतात. तर खऱ्या आयुष्यात ही काही प्रसिद्ध डिटेक्टिव्ह अधिकाऱ्यांची नावे आपण ऐकली असतील. जेम्स बॉन्ड असो किंवा व्योमकेश बख्शी अथवा शेरलॉक होम्स. पण अशातच भारतात पहिल्या महिला गुप्तहेराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार ही मिळाला आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ७५ हजारांहून अधिक गुन्ह्यांना खुलासा केलाय. त्यांच्याचबद्दल आपण आज जाणून घेऊयात. (Rajani Pandit)
कोण आहेत पहिल्या भारतीय गुप्तहेर महिला?
रजनी पंडित असे त्यांचे नाव आहे. त्यांचे आयुष्य एखाद्या सिनेमातील कथेसारखेच आहे. त्यांना गुप्तहेरच्या प्रोफेशनमध्ये ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. याच दरम्यान, त्यांनी ७५ हजारांपेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल ही केली आहे. रजनी पंडित यांचे वडिल सीआयडी अधिकारी होते. रजनी मुंबईत राहणाऱ्या असून त्यांनी मराठी साहित्यात शिक्षण घेतले आहे.
महाविद्यालयातील आयुष्य
एका सीआयडी अधिकाऱ्यांची मुलगी असली तरीही रजनी पंडित यांना कधीच गुप्तहेर बनायचे नव्हते. त्यांचे महाविद्यालयीन आयुष्य हे फार सुंदर नव्हते. रजनी पंडित या महाविद्यालाय संपल्यानंतर एका ऑफिसमध्ये क्लर्कच्या रुपात काम करायच्या. एका सहकर्मचारी महिलेने रडत रडत एक किस्सा त्यांना सांगितला होता. त्या महिलेच्या घरी नवी वधू आल्यानंतर चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. अशातच रजनी यांनी काही दिवसांसाठी ऑफिसमधून ब्रेक घेत तपास करण्यामागे लागल्या. रजनी यांनी काही दिवस त्या महिलेच्या घरावर नजर ठेवली. तेव्हा त्यांना अखेर पुरावा मिळाला. त्यात महिलेचा लहान मुलगाच घरात चोरी करुन मित्राकडे ठेवत असल्याचे समोर आले. अशा प्रकारे आपली डिटेक्टिव्ह आयुष्यातील पहिली केस वयाच्या २२ व्या वर्षात सोडवली होती.तर त्या आधी पासूनच हुशार होत्या. याच कारणास्तव त्यानंतर भारतातील पहिल्या महिला डिटेक्टिव्ह झाल्या.(Rajani Pandit)
हे देखील वाचा- बेनजीर भुट्टो: पाकिस्तानच्या सैन्याविरोधात आवाज उठवणाऱ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान
फर्स्ट लेडी डिटेक्टिव्ह अवॉर्डने सन्मानित
रजनी पंडित यांना देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फर्स्ट लेडी डिटेक्टिव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार त्यांना महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला गेला. त्यांना पहिला पुरस्कार १९९० मध्ये मिळाला होता. त्यानंतर रजनी पंडित यांना काही पुरस्कार ही मिळाले आहेत. १९९१ मध्ये रंजनी पंडित यांनी डिटेक्टिव्ह सर्विसेज नावाने आपली खासगी कंपनी सुरु केली होती. ती काही दिवस उत्तम चालली. त्यानंतर त्यांनी जेव्हा दुरदर्शनवर मुलाखत दिली तेव्हापासून त्यांचे काम अधिकच वेगाने चालू लागले. त्यांनी आपल्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेले.