जगभरात ट्विटरचे करोडोंच्या संख्येने युजर्स आहेत. त्यांच्यासाठीच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. कारण त्यांना आता आपल्या ट्विटरवरील अकाउंट सस्पेंशनच्या विरोधात आवाज उठवता येणार आहे. कंपनीने नुकतेच या बद्दल ट्विट केले आहे. त्यात त्यांनी १ फेब्रुवारी पासून ही सुविधा लागू होईल असे म्हटले आहे. (Twitter account suspension)
न्यूज एजेंसी रॉयर्सच्या बातमीनुसार, नव्या नियमाअंतर्गत ट्विटर अकाउंट्स केवळ गंबीर प्रकरणांमध्ये किंवा सध्याच्या नितींचे वारंवार उल्लंघन केल्याने निलंबित केले जाईल. सीरिय पॉलिसी वॉयलेशन मध्ये चुकीचा कंटेट किंवा हालचालींचा समावेश असेल, हिंसा किंवा धमकी देणे अशा गोष्टी असतील तर त्या गुन्हा म्हणून समजल्या जातील.
ट्विटरने पुढे असे म्हटले की, नव्या पॉलिसीअंतर्ग पुढे जाऊन अकाउंट सस्पेंशनच्या तुलनेत कमी गंभीर कारवाई केली जाईल. जसे ट्विटसचा रिच मर्यादित करणे, जर निती व नियमांचे उल्लंघन केल्यानंतर युजर्सला अकाउंटचा वापर करण्यापूर्वी ट्विट्स हटवण्यास सांगितले जाणार आहे.
याआधी डिसेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी काही पत्रकारांचे ट्विटर अकाउंट त्यांच्या विमानाविषयी सार्वजनिक डेटा प्रकाशित केल्याबद्दल निलंबित केले होते. परंतु नंतर वाद वाढल्यानंतर पत्रकारांना त्यांचे अकाउंट्स पुन्हा दिले होते.
दरम्यान, ट्विटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी या सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्त होण्यास स्वातंत्र्य असेल असे म्हटले होते. मस्क यांच्यानुसार, युजर्सला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. खरंतर जॅक डॉर्सी यांच्या कार्यालयातील काही ट्विटर युजर्सचे अकाउंट्स सस्पेंड्स केले होते. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांचा सुद्धा समावेश होता. पण ट्विटरवरील सस्पेंड अकाउंट्स पुन्हा दिल्यानंतर एल मस्क यांनी माफी मागितली होती. डोनाल्ड ट्रंम्प आता पुन्हा ट्विटरवर परतणार आहेत. (Twitter account suspension)
हे देखील वाचा- नेटफ्लिक्सचा पासवर्ड आता दुसऱ्यासोबत शेअर करता येणार नाही
मस्क यांनी सातत्याने अकाउंट बॅन करण्याचा केला विरोध
एलॉन मस्क ट्विटरच्या करारावेळी अकाउंट सस्पेंड करण्याचा विरोध केला होता. करार पूर्ण झाल्यानंतर काही पॉप्युलर ट्विटर अकाउंट्स रिस्टोर केले गेले आहेत, जे यापूर्वी बॅन किंवा सस्पेंड केले होते. नुकत्याच बॉलिवूड अभिनेत्री कंगन रनौत यांचे अकाउंट रिस्टोर केले होते. रनौत हिचे अकाउंट जवळजवळ दोन बॅन केले होते. तर एलॉन मस्क यांच्याकडून सातत्याने ट्विटरमध्ये काही बदल करण्यात येत आहेत.
प्लॅटफॉर्मवर आता तीन प्रकारचे वेरिफिकेशन बॅच दिले जात आहेत. त्यामध्ये शासकीय एजेंसी, अधिकारी आणि मंत्र्यांना ग्रे रंगाचा बॅच मिळतो. तर कंपन्यांना पिवळ्या रंगाचा आणि एका अकाउंट होल्डर्सला ब्लू टीक दिली जात आहे.