पहिल्या जागतिक महायुद्धात १९१७ मध्ये रशियात बोल्शेविक क्रांती झाली आणि त्यानंतर जारचे शानस संपले. त्याचसोबत तेथे सोवियत संघाचे गठन झाल्यानंतर साम्यवादी शासन व्यवस्थेने रुप घेतले. क्रांतीसाठी शिल्पकार आणि सोवियत संघाचे वास्तुकार व्लादिमीर लेनिन होते. त्यांनीच रशियन कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली होती. ते सोवियत राज्याचे पहिले प्रमुख ही बनले होते. त्यांना मार्क्सनंतर सर्वाधिक मोठे क्रांतिकारी नेते आणि विचारक मानले जाते. २१ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू गंभीर आजानंतर झाला खरा पण मृत्यूचे खरं कारण कधीच कळले नाही. (Vladimir Lenin Death)
खुप कालावधीनंतर आपलेसे केले लेनिन नाव
लेनिन यांच्या नावाने लोकप्रिय व्लादिमिर इल्चिच उल्यानोव यांचा जन्म २२ एप्रिल १९७० रोजी रशियातील सिंविर्स्क मध्ये झाला होता. त्यानंतर या ठिकाणाचे नाव लेनिन यांच्या सन्मार्थात उल्यानोवस्क ठेवले गेले. १९०१ मध्ये त्यांनी एक गुप्त पार्टीसाठी काम करत लेनिन हे आडनाव निवडले आणि तेव्हापासून ते याच नावाने ओळखले जातात. त्यांचा परिवार शिक्षित होता आणि त्यांना सहा भावंड होती व ते त्यामधील तिसरे मुलं होते.
समाजवादी राजकरण आणि कायद्याचा अभ्यास
जेव्हा व्लादिमीर १७ वर्षांचे होते तेव्हा मोठ्या भावाला मृत्यूची शिक्षा मिळाल्यानंतर त्यांनी रशियातील क्रांतिकारी समाजवादी राजकरण आपलेसे केले. रशियातील जार सरकारच्या विरोधात सक्रिय भाग घेतल्याने त्यांना कजन इंपीरियल युनिव्हर्सिटीतून काढून टाकले. मात्र त्यानंतर काही वर्षातच त्यांनी कायद्याची डिग्री घेतली आणि १८९३ मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे निघून गेले. तेथए ते एक मार्क्सवादी कार्यकर्ते झाले. परंतु १८९७ मध्ये त्यांना अटक करत निर्वासित केले गेले.
बोल्शेविक क्रांतीनंतर
निर्वासनानंतर लेनिन हे पश्चिम युरोपात गेले आणि सामाजिक डेमोक्रेटिक लेबर पार्टीच्या बोल्शेविक गटाचे नेतृत्व केले. १९१७ च्या फेब्रुवारी क्रांतीनंतर जेव्हा रशियात जारला हटवले गेले. तेव्हा ते रशियात परतले जेव्हा तो रशियाला परतला तेव्हा त्याने ऑक्टोबर क्रांतीमध्ये प्रमुख भूमिका बजावली आणि बोल्शेविकांनी नवीन राजवट उलथून टाकली आणि नवीन राजवटीने सोव्हिएत युग सुरू केले.
९ महिन्यांपूर्वी प्रकृती बिघडण्यास झाली सुरुवात
मार्च १९२३ रोजी लेनिन यांना तिसरा स्ट्रोक आला. ज्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते. त्याच महिन्यात त्यांच्या डाव्या भागात आंशिक पॅरालिसिल अटॅक आला आणि नंतर ते सेंसरी अफासियाचे लक्षण दिसून यायले लागले. त्याच वर्षात मे मध्ये त्यांची प्रकृती सुधारली. त्यामुळे ते चालू ही लागले होते. त्यानंतर बोलण्यासह लिहिण्यासाठी येणारी समस्या ही कमी झाली. अशातच ऑक्टोंबर मध्ये त्यांना क्रेमलिनचा अखेर प्रवास केला. (Vladimir Lenin Death)
प्रथम कोमा आणि नंतर निधन
२१ जानेवारी १९२४ रोजी लेनिन कोमात गेले आणि त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण जे दिले गेले त्यानुसार त्यांचा मृत्यू रक्ताच्या धमन्यांमध्ये एखादा गंभीर आजार झाल्याने झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूची घोषणा केली गेली. त्यांचे शव ट्रेनच्या माध्यमातून मास्कोत आणले गेले आणि नंतर लोकांच्या दर्शनासाठी तीन दिवसांपर्यंत ठेवले गेले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोक कडाक्याच्या थंडीत ही रांगेत उभे राहून वाट पाहत होते.
हे देखील वाचा- कश्मीरी पंडित इकबाल यांनी मुस्लिमांसाठी नव्या राष्ट्राची का मागणी केली होती?
दफन न करण्याचा निर्णय
२७ जानेवारीला त्यांचे शव अंत्यसंस्कारासाठी लाल चौकात आणला गेला. यावेळी हजारो लोक ही जमा झाले होते. त्यांचे शव खुप दिवस लोकांच्या दर्शनासाठी लाल चौकाच्या समाधिवर संरक्षित करण्यात आले होते. त्यानंतर शलल अधिक थंड ठिकाणी ठेवले गेले. या स्थितीत शव संरक्षित राहिल्यावर तत्कालीन सोवियत शासक स्तालिन यांनी त्यांना दफन करण्याचा निर्णय बदलला. परंतु पत्नी नेज्दका क्रुप्सकाया यांना वाटचत होते की, त्यांच्या पतीला दफन करावे पण स्तालिन यांनी त्यांचे ऐकले नाही. तर आज ही त्यांची समाधि लाल चौकात लोकांच्या दर्शनासाठी उपलब्ध आहे.