Home » सौदी अरब मध्ये लॉ प्रोफेसरला सजा-ए-मौत; ट्विटर आणि व्हॉट्सअॅप वापरल्याची मिळाली शिक्षा

सौदी अरब मध्ये लॉ प्रोफेसरला सजा-ए-मौत; ट्विटर आणि व्हॉट्सअॅप वापरल्याची मिळाली शिक्षा

by Team Gajawaja
0 comment
Death Sentence in Saudi
Share

सौदी अरबमध्ये लॉ चे एक प्रसिद्ध प्रोफेसर यांना मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. प्रोफेसरला ही शिक्षा केवळ ट्विटरवर अकाउंट असणे आणि राज्याच्या विरोधातील बातम्या शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केल्याने काही अपराधांसाठी दिली आहे. ६५ वर्षीचे अल-करनी यांना २०१७ मध्ये नवा क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान याच्या नेतृत्वाखाली सौदी सरकारद्वारे असहमतिच्या विरोधात एक कारवाईत अटक केली होती. (Death Sentence in Saudi)

द गार्डियनच्या रिपोर्ट्नुसार, सौदी नियंत्रित मीडियात अल-करनीला एक धोकादायक उपदेशकाच्या रुपात सांगितले गेले. परंतु विरोधकांचे असे म्हणणे आहे की, अल-करनी सोशल मीडियात महत्वपूर्ण आणि प्रसिद्ध बुद्धिजीवी होते. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर २० लाख फोलोअर्स होते. अल करनी यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा खुलासा त्यांचा मुलगा नासेरने केला आहे. ज्याने सौदीतून पळ काढत युके मध्ये गेला.

मानवधकार अधिवक्त्ये आणि निर्वासन मध्ये राहणारे सौदी विरोधकांनी असा इशारा दिला आहे की, सौदी अरब साम्राज्या मध्ये अधिकारी सरकारचे आलोचक मानल्या जाणाऱ्या व्यक्तींवर एक नवी आणि गंभीर कारवाई करण्यामागे लागले आहेत. असे पहिल्यांदाच झालेले नाही की, जेव्हा क्राउन प्रिंसने एखाद्या सौदी विरोधातील व्यक्तीला निशाणा बनवले आहे.

यापूर्वी सुद्धा दिली गेलीयं अशी शिक्षा
गेल्या वर्षात लीड्स पीएचडी विद्यार्थी आणि दोन मुलांची आई सलमा अल-शहाब हिला ट्विटर अकाउंट असणे आणि विरोधक आणि अॅक्टिव्हिस्ट्सला फॉलो करण्यासह त्यांचे ट्विट रिट्विट केल्याने ३४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. आणखी एक महिला, नौरा अल कहतानी हिला ट्विटरचा वापर केल्याप्रकरणी ४५ वर्षांची तुरुंगाची शिक्षा सुनावली होती.

द गार्डियनने बचाव पक्षाच्या कागदपत्रांच्या हवाल्याने असे लिहिले की, प्रिंस मोहम्मद बिन सलमानच्या शासनकाळाच्या सुरुवातीनंतर सौदीत सोशल मीडिया आणि अन्य सचारचा वापर करणे गुन्हा असल्याचे ठरवले गेले आहे.(Death Sentence in Saudi)

हे देखील वाचा-६० वर्षात प्रथमच चीनची लोकसंख्या झालीय कमी, बर्थ रेटही घटला

या व्यतिरिक्त एका रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, याच महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरबन विकिपीडियात घुसखोरी करत वेबसाइटच्या कंन्टेटवर नियंत्रित करण्यासाठी दोन अॅडमिन यांना तुरुंगाची शिक्षा सुनावली होती. तर अॅक्टिव्हिस्टने सौदीसाठी जासूसी करण्याच्या आरोपात एक माजी ट्विटर कार्यकर्त्याला ही तुरुंगात पाठवल्यानंतर ही माहिती दिली. अॅक्टिव्हिस्टने असे म्हटले की, एका अॅडमिनला ३२ वर्ष आणि दुसऱ्याला ८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.